मुंबईत डिसेंबर महिन्यांत ५५७ बांधकामांना कारणे दाखवा नोटीस

मुंबईतल्या २३३ ठिकाणच्या बांधकामांना काम थांबवण्याची नोटीस


मुंबई(विशेष प्रतिनिधी) : बांधकामामुळे निर्माण होणा-या धुळीसाठी, नियमांचे पालन न करणा-या बांधकाम प्रकल्पांना प्रारंभी लेखी सूचना , दिल्यानंतर 'कारणे दाखवा नोटीस'आणि 'काम थांबवण्याची नोटीस' देण्यात येते. त्‍यानुसार ०१ डिसेंबर २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत ५५७ बांधकामांना कारणे दाखवा नोटीस, तसेच २३३ ठिकाणी 'काम थांबवण्याची नोटीस' देण्यात आली.


मुंबई महानगरपालिकेच्या 'पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग' यांच्याद्वारे कळविण्यात आल्यानुसार हिवाळ्यात हवेच्या कमी तापमानामुळे व वेगवान वा-याच्या अभावाने जमिनीलगतची प्रदूषके ही उंचीवरील हवेत मिसळण्याचे प्रमाण कमी होते. मुंबईच्या नैसर्गिक हवामानाच्या स्थितीनुसार दरवर्षी ऑक्टोबर ते फेब्रुवारी या कालावधीत प्रदूषणाच्‍या प्रमाणात वाढ होत असते. मुंबई शहरातील वायू प्रदूषण वाढण्‍यास विविध कारणे कारणीभूत आहेत. यामध्‍ये औद्योगिक उत्‍सर्जन, बांधकामांच्‍या ठिकाणी निर्माण होणारी धूळ, रस्‍त्‍यावरील धुळीचे पुर्नप्रक्षेपण, कारखान्‍यातील उत्‍सर्जन, कचरा जाळणे, कारखाने व वाहनातून निघणारा धूर इत्‍यादींमुळे प्रदूषणाच्‍या प्रमाणात वाढ होत असते.


मागील १५ ऑक्टोबर २०२४ सुधारित २८ मुद्यांचे 'सर्वकष मार्गदर्शक तत्वे’ व सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. यामध्ये बांधकाम प्रकल्पाच्या सभोवताली धूळप्रदूषण रोखण्याकरिता पत्र्यांचे कुंपण उभारणे, हिरव्या कपडयांचे आच्छादन करणे, पाणी-फवारणी करणे, राडारोडयाची शास्त्रशुध्द साठवण व ने-आण करणे, बांधकामाच्या ठिकाणी वायू-प्रदूषण मोजमाप करणारी यंत्रणा बसविणे, धूरशोषक यंत्रे बसविणे व इतर महत्वाच्या उपाययोजना सुचविण्यात आलेल्या आहेत.


या सर्वकष मार्गदर्शक तत्त्वांमध्ये नमूद उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी विभाग स्तरावर भरारी पथके स्थापन करण्यात आलेली आहेत व भरारी पथकांकडून मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणा-यांविरुध्द तात्काळ व कठोर कारवाई करण्यात येत आहे.


ज्या भागात २०० च्या वर वायु गुणवत्ता निर्देशांक गेला तर संबंधित क्षेत्रामध्ये ' जी आर ए पी ४' अंतर्गत बांधकामे थांबविण्यात येतील. तसेच प्रत्‍येक बांधकामांवर ' लो कॉस्ट सेन्सर' वायु गुणवत्ता मापन संयंत्रे बसविणे बंधनकारक करण्‍यात आलेले आहे. त्‍यानुसार आतापर्यंत एकूण १,०८० बांधकामांनी अशी संयंत्रे बसविली आहे.


सध्‍या मुंबईत एकूण २८ 'सतत वातावरणीय वायु गुणवत्ता सर्वेक्षण केंद्रे' आहेत. त्‍यापैकी महाराष्‍ट प्रदूषण नियंत्रण मंडळाच्‍या अखत्‍यारित १४ केंद्रे, भारतीय उष्णकटिबंधीय मौसम विज्ञान संस्थान, पुणे, अंतर्गत ९ केंद्रे आणि मुंबई महानगरपालिकेच्‍या अखात्‍यारित ५ केंद्रे कायर्रत आहेत. ही सर्व प्रमाण दर्जाची केंद्रे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्‍या मार्गदर्शक तत्‍वानुसार मोजमाप, कॅलिब्रेशन, गुणवत्‍ता हमी आणि डेटा प्रमाणिकरणसाठी राष्‍ट्रीय माणके व प्रोटाकॉलचे पालन करतात.

Comments
Add Comment

वाढत्या बेकायदा घुसखोरांमुळे चौफेर सामाजिक संकटांचा धोका - नामवंत तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त

मुंबई  : तीन शेजारी देशांमधून भारतात घुसणाऱ्या असंख्य बेकायदा स्थलांतरितांमुळे भारताची सुरक्षा आणि विकास हे

Nitesh Rane : नालासोपारा मध्ये मंत्री नितेश राणे यांच्या प्रचार सभांचा झंझावात!

नालासोपारा : आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील

भुयारी मेट्रो मार्गिकेमध्ये नेटवर्कची गैरसोय कायम !

तोडगा काढण्यात एमएमआरसीएल ढिम्म मुंबई : आरे ते कफ परेड या मेट्रो-३ भुयारी मेट्रोच्या संपूर्ण मार्गिकेमध्ये

मुंबईत २२ वर्षांत कुठे आहे रेन वॉटर हार्वेस्टिंग

इमारतींना ओसी, पण प्रत्यक्षात सत्ताकाळात उबाठाला अंमलबजावणी करण्यात अपयश उबाठ- मनसेचा वचननामा, आमचा

दोन माजी बेस्ट समिती अध्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात

मुंबई : बेस्ट उपक्रमाच्या बेस्ट समितीचे अध्यक्षपद भूषवलेले दोन माजी नगरसेवक यंदा पालिका निवडणुकीच्या रिंगणात

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी २४ तास टोल-फ्री समुपदेशन!

मुंबई (प्रतिनिधी) : सीबीएसईने दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य मानसिक व सामाजिक समुपदेशन सेवा सुरू