ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकीसाठी नामनिर्देशन अर्ज छाननी व माघार प्रक्रियेनंतर शनिवारी चिन्ह वाटपाची प्रक्रिया पूर्ण झाली. यामध्ये एकूण ६४१ उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले असल्याची माहिती आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव यांनी दिली.
ठाणे महापालिका निवडणूक येत्या १५ जानेवारीला असून निवडणूक प्रक्रियेसाठी प्रभागनिहाय नियुक्त करण्यात आलेल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांमार्फत २३ डिसेंबरपासून नामनिर्देशनपत्र वाटप, नामनिर्देशनपत्रे दाखल करून घेणे, छाननी व नामनिर्देशन पत्र माघार घेणे या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी प्रसिद्ध केली. तसेच शुक्रवारी ६४१ उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले.