लवकरच उभारले जाणार ‘मराठी भाषा भवन’; मंत्री उदय सामंत यांची माहिती

मुंबई : मराठी भाषा गौरव दिन निमित्ताने विधानपरिषदेत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर तिच्या विकासासाठी विविध उपक्रम राबवले जात असल्याची माहिती राज्याचे भाषा मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत दिली. याचाच भाग म्हणून मराठी भाषा भवन’ उभारण्याचे काम सुरू झाले असून ते देशातील सर्वात आकर्षक भाषाभवनांपैकी एक असेल, असे त्यांनी सांगितले.



विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित


विधानपरिषदेत प्रश्नोत्तरांच्या तासात भाई जगताप यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर कोणती पाऊले उचलली गेली, असा प्रश्न उपस्थित केला. तसेच मराठी भाषा विभागाने नेमके कोणते उपक्रम राबवले याबाबत प्रश्न उपस्थित केले.



‘काम झाले नाही’ हा आरोप चुकीचा


या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री उदय सामंत यांनी मराठी भाषेसाठी साठी कोणतेही काम झाले नाही, हा आरोप चुकीचा असल्याचे स्पष्ट केले. मराठीवर हिंदीची सक्ती केली जात असल्याचा आरोपही दिशाभूल करणारा असल्याचे त्यांनी सांगितले.



माशेलकर समितीचा संदर्भ


यावेळी त्यांनी रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील माशेलकर समितीचा उल्लेख केला. या समितीने पहिली ते बारावीपर्यंत मराठीसोबत हिंदी अनिवार्य करण्याचा प्रस्ताव मांडला होता आणि त्या काळातील नेतृत्वाने तो स्वीकारल्याचेही त्यांनी नमूद केले. मात्र निवडणुका जवळ आल्यावर विरोधकांनी मराठीऐवजी हिंदी सक्ती होत असल्याचा चुकीचा प्रचार केल्याचा आरोप त्यांनी केला.



मराठी भाषा भवन आणि जागतिक केंद्र


मराठीच्या जतन व संवर्धनासाठी राज्य सरकार विविध योजना राबवत असल्याचे सांगताना सामंत यांनी मराठी भाषा भवन उभारणीचे काम सुरू झाल्याची माहिती दिली. या प्रकल्पासाठी उपकेंद्र उभारण्याबाबत टेंडर प्रक्रिया देखील सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.


याशिवाय मराठीचा जागतिक स्तरावर प्रसार व्हावा यासाठी ‘मराठी वैश्विक केंद्र’ स्थापन करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने हे केंद्र लंडन येथे उभारले जाणार असून राज्य सरकारने यासाठी पाच कोटी रुपयांची तरतूद केली आहे.



मराठीला जागतिक स्तरावर मान्यता देण्याचा प्रयत्न


मराठी भाषा जगभर पोहोचावी आणि तिचा गौरव वाढावा, “मराठी सातासमुद्रापार पोहोचली पाहिजे आणि जागतिक पातळीवर तिचे स्थान अधिक भक्कम झाले पाहिजे.” हा राज्य सरकारचा उद्देश असल्याचे सांगताना उदय सामंत यांनी विधानपरिषदेत स्पष्ट केले

Comments
Add Comment

Nitesh Rane : आजपासून मुंब्रा नव्हे 'मुंब्रादेवी'च म्हणा!

- मंत्री नितेश राणे यांचे हिंदूंना आवाहन; कोणाच्याही दहशतीला भीक घालू नका मुंबई : "मुंब्रा हे शहर कोणत्याही एका

Ind vs SL Test Match : पावसाचा खेळ सुरूच; गॉल कसोटीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष

मुंबई : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना गॉल इंटरनॅशनल क्रिकेट

West Bengal : पश्चिम बंगालचे माजी विधानसभा उपाध्यक्ष आशिष बॅनर्जींनी तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयात उचलले टोकाचे पाऊल

रामपूरहाट : पश्चिम बंगाल विधानसभेचे माजी उपाध्यक्ष आणि तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) ज्येष्ठ नेते आशिष बॅनर्जी

106 Maharashtra Martyrs To Be Honored : संयुक्त महाराष्ट्राच्या १०६ हुतात्म्यांना नव्या प्रशासकीय इमारतीत मानाचे स्थान मिळणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिवांना कार्यवाहीचे निर्देश मुंबई : संयुक्त महाराष्ट्राच्या

Mumbai Family Suicide : नेव्ही नगरमध्ये नौदल कर्मचाऱ्याची कुटुंबासह राहत्या घरात आत्महत्या; पोलिसांकडून तपास सुरू

मुंबई : कुलाबा येथील नेव्ही नगर परिसरात नौदल कर्मचाऱ्यासह त्याची पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू झाल्याची

Mumbai-Ahmedabad Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन लवकरच सुरू होणार

मुंबई : मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर (बुलेट ट्रेन) प्रकल्पांतर्गत मुंबईतील वांद्रे कुर्ला