कर्जत : नितीन देसाई यांनी २००५ मध्ये मुंबईजवळच्या कर्जत इथे एनडी स्टुडिओची निर्मिती केली होती. ५२ एकरवर हा एनडी स्टुडिओ पसरलेला आहे. आतापर्यंत ऐतिहासिक सिनेमांसह अनेक चित्रपटांचं इथे शूटिंग झालं आहे. अमिर खानचा मंगल पांडे सिनेमा चित्रित झाला. त्यानंतर मधुर भांडरकर यांच्या ट्रॅफिक सिग्नल सिनेमाचं शूटिंग याच स्टुडिओत झालं. त्यानंतर आशुतोष गोवारिकरचा जोधा अकबर इथेच शूट झाला. त्यावेळी ऐश्वर्या राय आणि हृतिक रोशन या सेटवर ६ महिने राहिले होते. सलमानचा प्रेम रतन धन पायो या सेटवर शूट झालेला. सिनेमादरम्यान सलमान जवळपास ९० दिवस या सेटवर राहिला होता. सलमानच्या अनेक सिनेमांचं शूटिंग या एनडी स्टुडिओत झालं आहे. किक, बॉडीगार्ड, वॉन्टेड सिनेमे याच सेटवर शूट झालेत.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील ख्यातकीर्त कलाकाराचे एखादे कार्य जर अपूर्ण राहीले असेल तर शासनाची जवाबदारी असते की त्या कार्याला पूर्णत्वास नेण्यात मदत करावी. त्यामुळेच याच दृष्टिकोनातून स्व. नितीन चंद्रकांत देसाई या मराठी कलाकाराच्या कर्जत येथील, एन् डी स्टुडिओची जवाबदारी महाराष्ट्र शासनाने स्वीकारून तेथे नवोन्मेष उपक्रमांची सुरुवात केली आहे. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका श्रीमती स्वाती म्हसे-पाटील यांची संकल्पना, आणि महामंडळाचे वरिष्ठ पदाधिकारी यांच्या पुढाकारातून तसेच एन् डी ज् आर्ट वर्ल्ड मधील कर्मचारी यांच्या सहकार्यातून, सात दिवस मराठी मनोरंजन क्षेत्रातील नामवंत व लोकप्रिय वेगवेगळ्या सिने कलाकारांच्या उपस्थितीत २५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत एन् डी ज् आर्ट वर्ल्ड मध्ये अतिशय आनंदात व खेळीमेळीच्या वातावरणात 'कार्निव्हल' हा उपक्रम संपन्न झाला. ३१ डिसेंबरला कार्निव्हल समारोप कामशेत, लोणावळे येथील 'मायेचा हात सोशल फौंडेशन' या संस्थेतील अनाथ मुलांच्या तसेच महामंडळाचे पदाधिकारी, कर्मचारी आणि उपस्थितीत पर्यटकांच्या समवेत करण्यात आला. , स्पर्धा इत्यादी गोष्टींची धम्माल होती. या पुढेही २०२६ वर्षातील वेगवेगळ्या महिन्यातील वेगवेगळ्या दिवशी असे विशेष विविध उपक्रम, कार्यशाळा, निवासी अभ्यासक्रम पर्यटकांसाठी, पाहुण्यांसाठी आयोजित करण्यात येतील.