हास्यजत्रा फेम इशा डे हिचा नवरा आहे तरी कोण? वाचा सविस्तर

मुंबई : लोकप्रिय कॉमेडी शो महाराष्ट्राची हास्यजत्रा मधून प्रेक्षकांना खळखळून हसवणारी अभिनेत्री इशा डे हिने आयुष्यातील नवा अध्याय सुरू केला आहे. ईशाने प्रसिद्ध गीतकार व लेखक अभिषेक खणकार यांच्याशी पारंपरिक पद्धतीने विवाह केला. या लग्नसोहळ्याला मराठी मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली.



सोशल मीडियावर लग्नाची जोरदार चर्चा


गेल्या काही दिवसांपासून ईशाच्या लग्नाबाबत सोशल मीडियावर उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर १३ मार्च रोजी पार पडलेल्या या सोहळ्यात दोघांनी कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली. लग्नातील फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत आहेत.



पारंपरिक महाराष्ट्रीयन लूकची चर्चा


लग्नासाठी ईशाने लाल रंगाची पारंपरिक नऊवारी साडी, नथ आणि पारंपरिक दागिने परिधान केले होते. तिचा हा पारंपरिक लूक चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरला. दुसरीकडे अभिषेकने कुर्ता-धोतर परिधान करून साधा पण देखणा महाराष्ट्रीयन वराचा लूक साकारला.



कोण आहे अभिषेक खणकर?


ईशाचा पती अभिषेक खणकर हा मराठी मनोरंजन विश्वातील परिचित गीतकार आणि लेखक आहे. अनेक लोकप्रिय मराठी मालिकांची शीर्षकगीते त्यांनी लिहिली आहेत. तसेच काही मराठी चित्रपटांसाठीही त्यांनी गाणी लिहून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.



चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव


लग्नाचे फोटो समोर आल्यानंतर चाहत्यांसह मराठी कलाविश्वातील कलाकारांनीही या नवविवाहित जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. दरम्यान, ईशाने लग्नापूर्वी मेहंदी आणि केळवण समारंभाचे फोटो शेअर करून चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. आता विवाहानंतर दोघांना नव्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Comments
Add Comment

Madhuri Dixit : लवकरच...! सोनी मराठी वाहिनीवरील 'कोण होणार करोडपती' चे सूत्रसंचालन करणार अभिनेत्री माधुरी दीक्षित

मुंबई : मराठी मनोरंजनविश्वात एका नव्या पर्वाची सुरुवात होत आहे. सोनी मराठी वाहिनी आणि Sony LIV प्रेक्षकांचा ज्ञानावर

Sara Tendulkar : मला माझ्या होणाऱ्या नवऱ्यामध्ये हवाय असा गुण... सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकरचा मोठा खुलासा!

भारतीय क्रिकेटचा देव मानले जाणारे सचिन तेंडुलकर यांची लाडकी लेक सारा तेंडुलकर ही नेहमीच चाहत्यांच्या आणि सोशल

Govinda On Salman Khan: 'पाटर्नर, तू हिरोसारखा दिसत नाहीस...' गोविंदाचं 'ते' वक्तव्य अन् सलमान खानचं नशीब बदललं

बॉलिवूड अभिनेता गोविंदा आपल्या खासगी आयुष्याबद्दल नेहमीच चर्चेत असतो. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने

Dil Chahta Hai completes 25 years : तरुणाईला वेड लावणारा तो एव्हरग्रीन सिनेमा आणि आजही कायम असलेली 'त्या' गाण्याची क्रेझ!

बॉलीवूडमध्ये काही चित्रपट असे असतात, जे केवळ मनोरंजनापुरते मर्यादित न राहता प्रेक्षकांच्या आयुष्याचा आणि

AR Rahman Son Accident : प्रसिध्द संगीतकार ए.आर. रहमान यांच्या मुलाचा कार अपघात; थोडक्यात बचावला आमीन

चेन्नई : प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमान (A R Rahman) यांचा मुलगा आणि गायक ए.आर. आमीन (A R Ameen) याचा कार अपघात झाल्याची धक्कादायक

Dashmi Movie Poster Launch : अन्यायाविरुद्ध उठणार ‘दशमी’ची गर्जना! रहस्य, संघर्ष आणि स्त्रीशक्तीची कहाणी घेऊन मराठी चित्रपटाची दमदार एंट्री

मुंबई : भारतीय संस्कृतीत विजयादशमी म्हणजे केवळ सण नाही, तर अन्यायावर न्यायाचा, अधर्मावर धर्माचा आणि दुष्ट