‘घबाडकुंड’ चित्रपट ठरणार मराठीतला पहिला युनिव्हर्स

मुंबई : हॉलिवूड आणि बॉलिवूडमध्ये गाजलेल्या चित्रपटांच्या ‘युनिव्हर्स’ संकल्पनेची आता मराठी चित्रपटसृष्टीतही दमदार एंट्री होत आहे. परस्परांशी जोडलेल्या कथानकांमधून वेगवेगळ्या चित्रपटांची एक भव्य गोष्ट सादर करण्याचा अनोखा प्रयत्न ‘घबाडकुंड’ या आगामी मराठी चित्रपटाच्या निमित्ताने मराठीत पहिल्यांदा होतोय. हा युनिव्हर्स चित्रपट प्रेक्षकांना थरार आणि रहस्य याचा रंजक सिनेमॅटिक अनुभव देणार आहे. अनेक कथा, रहस्य आणि पात्रं यांना एकाच धाग्यात गुंफणारा हा अनोखा प्रयोग प्रेक्षकांसाठी खास आकर्षण ठरणार आहे.


निर्माते रसिक कदम यांच्या महत्त्वाकांक्षी संकल्पनेतून साकारत असलेला ‘घबाडकुंड’ हा चित्रपट येत्या १९ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘अल्याड पल्याड’ चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर दिग्दर्शक प्रीतम एस. के. पाटील ‘घबाडकुंड’ प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत. भय, थरार, रहस्य असा भरगच्च मसाला असलेला ‘घबाडकुंड’ चित्रपट सादरीकरणाच्या दृष्टीने प्रेक्षकांसाठी ‘स्पेशल ट्रीट’ असणार आहे.


आयुष्यात अनपेक्षित घटनांनी काहींच्या स्वप्नांना पंख फुटतात, पण त्याचवेळी पडद्यामागे सुरू असतो संशय आणि संकटांचा भयानक खेळ. भीती आणि अनिश्चिततेच्या छायेत घडणाऱ्या अकल्पित घटनांमुळे कथानक प्रत्येक टप्प्यावर नवे प्रश्न उभे करते. सत्याच्या शोधात निघालेल्यांना कोणत्या गोष्टीला सामोरे जावे लागते? आणि शेवटी नशिब जिंकतं की माणूस? याची उत्कंठा वाढविणारा ‘घबाडकुंड’ हा भव्य चित्रपट येत्या १९ जूनला प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होत आहे. देवदत्त नागे, कुशल बद्रिके, संदीप पाठक, शशांक शेंडे, प्राजक्ता हनमघर, स्मिता पायगुडे-अंजुटे, वैष्णवी कल्याणकर, रॉकी देशमुख, आरोही भोईर, योगेश प्रकाश तनपुरे, साहिल अनलदेवर आदि कलाकारांची दमदार फौज ‘घबाडकुंड’ चित्रपटात आहे.


महिला दिनाचं औचित्य साधत ‘घबाडकुंड’ चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा आणि चित्रपटाचा ‘फर्स्ट लूक’ नुकताच एका शानदार सोहळ्यात प्रदर्शित करण्यात आला. याप्रसंगी विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान स्त्रियांचा गौरवचिन्हे आणि भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. यासोबत स्टायलिश आणि ग्लॅमरस फॅशन शोची शानदार झलक उपस्थितांनी अनुभवली. विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणारे निर्माते रसिक कदम यांची ‘आयकॉन दी स्टाईल’ कंपनी आता ‘घबाडकुंड’ चित्रपटाच्या माध्यमातून मराठी मनोरंजन क्षेत्रात जोरदार पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे.


याप्रसंगी निर्माते रसिक कदम म्हणाले,‘घबाडकुंड’ हा एक वेगळा आणि रोमहर्षक अनुभव असणार आहे. उत्तम कथानक, दर्जेदार सादरीकरण आणि कलाकारांचा जबरदस्त अभिनय या सगळ्यांचा उत्तम संगम या चित्रपटात पहायला मिळेल. १९ जूनला हा चित्रपट प्रेक्षकांसमोर येणार असून, त्यांना नक्कीच एक वेगळी आणि थरारक कथा पहायला मिळेल याची आम्हाला खात्री आहे.’


‘मराठीत ‘युनिव्हर्स’ चित्रपट करण्याचं स्वप्न मी खूप दिवसांपासून पाहत होतो. या चित्रपटाच्या निमित्ताने ते स्वप्न साकार होत आहे, याचा मला विशेष आनंद आहे. नव्या पिढीला अशी वेगळी आणि मोठ्या कॅनव्हासवरची संकल्पना खूप आवडते. त्यांच्या आवडीचा विचार करूनच हा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला आहे,’ असे मत दिग्दर्शक प्रीतम एस. के. पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.


'घबाड़कुंड' चित्रपट मराठीसह दाक्षिणात्य भाषांमध्ये सुद्धा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे लेखन संजय नवगिरे, अक्षय धरमपाल यांचे आहे. गीतकार नयूम पठाण आहेत. कलादिग्दर्शन योगेश इंगळे, छायांकन योगेश कोळी तर संकलन सौमित्र धाराशिवकर यांचे आहे. साऊथचे प्रसिद्ध फाईट मास्टर कार्तिक यांनी या चित्रपटासाठी बॅकग्राउंड म्युझिकची जबाबदारी अभिनय जगताप यांनी सांभाळली आहे. रि-रेकॉर्डिंग मिक्सर सुजित शिनगारे व साउंड डिझाइन मानव श्रोत्रिय (एम पी एस सी) यांचे आहे. मॅनेजर विष्णु घोरपडे आहेत.


'घबाडकुंड' चित्रपटाच्या निमित्ताने मराठीत पहिल्यांदाच साकारत असलेल्या या 'युनिव्हर्स'मुळे हा चित्रपट जबरदस्त सिनेमॅटिक अनुभव ठरणार आहे.

Comments
Add Comment

Madhuri Dixit : लवकरच...! सोनी मराठी वाहिनीवरील 'कोण होणार करोडपती' चे सूत्रसंचालन करणार अभिनेत्री माधुरी दीक्षित

मुंबई : मराठी मनोरंजनविश्वात एका नव्या पर्वाची सुरुवात होत आहे. सोनी मराठी वाहिनी आणि Sony LIV प्रेक्षकांचा ज्ञानावर

Sara Tendulkar : मला माझ्या होणाऱ्या नवऱ्यामध्ये हवाय असा गुण... सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकरचा मोठा खुलासा!

भारतीय क्रिकेटचा देव मानले जाणारे सचिन तेंडुलकर यांची लाडकी लेक सारा तेंडुलकर ही नेहमीच चाहत्यांच्या आणि सोशल

Govinda On Salman Khan: 'पाटर्नर, तू हिरोसारखा दिसत नाहीस...' गोविंदाचं 'ते' वक्तव्य अन् सलमान खानचं नशीब बदललं

बॉलिवूड अभिनेता गोविंदा आपल्या खासगी आयुष्याबद्दल नेहमीच चर्चेत असतो. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने

Dil Chahta Hai completes 25 years : तरुणाईला वेड लावणारा तो एव्हरग्रीन सिनेमा आणि आजही कायम असलेली 'त्या' गाण्याची क्रेझ!

बॉलीवूडमध्ये काही चित्रपट असे असतात, जे केवळ मनोरंजनापुरते मर्यादित न राहता प्रेक्षकांच्या आयुष्याचा आणि

AR Rahman Son Accident : प्रसिध्द संगीतकार ए.आर. रहमान यांच्या मुलाचा कार अपघात; थोडक्यात बचावला आमीन

चेन्नई : प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमान (A R Rahman) यांचा मुलगा आणि गायक ए.आर. आमीन (A R Ameen) याचा कार अपघात झाल्याची धक्कादायक

Dashmi Movie Poster Launch : अन्यायाविरुद्ध उठणार ‘दशमी’ची गर्जना! रहस्य, संघर्ष आणि स्त्रीशक्तीची कहाणी घेऊन मराठी चित्रपटाची दमदार एंट्री

मुंबई : भारतीय संस्कृतीत विजयादशमी म्हणजे केवळ सण नाही, तर अन्यायावर न्यायाचा, अधर्मावर धर्माचा आणि दुष्ट