कुंभमेळ्यातील व्हायरल गर्ल मोनालिसा आणि फरमान यांच्या लग्नावर वडिलांचा गंभीर आरोप; त्यांनी माझ्या डोळ्यासमोर...

मुंबई: कुंभमेळ्यातील व्हायरल गर्ल मोनालिसा भोसले सध्या तिच्या आंतरधर्मीय लग्नामुळे चर्चेत आहे. मल्याळम अभिनेता फरमान खानशी लग्न करून तिने सगळ्यांना धक्का दिला. अनेकजण या लग्नाला लव्ह जिहाद म्हणत आहेत. पण या कपलने आपण एकमेकांवर प्रेम करत असून लव्ह जिहाद नसल्याचं सांगितलं आहे. दरम्यान आता मोनालिसाचे वडील जयसिंग भोसले यांची प्रतिक्रिया आली आहे. त्यांनी मोनालिसासोबत नको तेच घडल्याचा आरोप केला आहे.


मोनालिसा आणि फरमान यांनी केरळच्या एका मंदिरात लग्न केलं आहे. आपण एकमेकांवर प्रेम करत असल्याचं त्यांनी सांगितलं. फरमानने मोनालिसानेच आपल्याला प्रपोज केलं, असं सांगितलं. तसंच मोनालिसाचं कुटुंब तिचं लग्न गावातील दुसऱ्या पुरुषासोबत लावून देत होते, त्यामुळे त्यांनी लग्न केल्याचं ते म्हणाले. पण मोनालिसाच्या वडिलांनी मात्र आपल्या मुलीला फसवलं, तिच्यासोबत काहीतरी केलं असा आरोप केला आहे. मोनालिसाच्या वडिलांनी सांगितल्यानुसार तेसुद्धा मोनालिसासोबत केरळमध्येच होते. नेमकं काय काय घडलं ते सगळं त्यांनी सांगितलं आहे.


जयसिंग म्हणाले, "मोनालिसा आणि मला एक महिन्यापासून फोन येत होता. आम्हाला एक्टिंग शिकवतील आणि एक गाणंही तयार करतील असं आम्हाला सांगण्यात आलं. म्हणून तिथं काय कसं आहे हे पाहण्यासाठी मी आणि मोनालिसा केरळला गेलो. तिथं एक्टिंग चांगली शिकवतात, कथ्थकही कमी किमतीत शिकवतात हे आम्हाला कळलं. म्हणून तिथं दोन दिवस राहून काय होतं पाहुयात असं ठरवलं. आता अभिनय शिकण्यासाठी तिथं राहायचं म्हणजे घर हवं, त्याबाबत मी विचारलं, तर ते देण्याचीही त्यांनी तयारी दाखवली"



माझ्या मुलीला फसवलं, माझ्या डोळ्यासमोर त्यांनी तिला...



"आम्हाला तिथं ४-५ दिवस झाले. त्यावेळी मला घरून माझी आई बोलावत असल्याचे फोन येते होते. म्हणून मी त्यांना मला घरी जाण्याच्या तिकिटाची व्यवस्था करून द्यायला सांगितलं. आम्ही एअरपोर्टकडे जायला निघालो तेव्हा त्यांनी पोलीस स्टेशनला गाडी थांबवली आणि मोनालिसाला पोलीस स्टेशनला नेलं. पण त्यांनी मला आत येऊ दिलं नाही. कित्येक तास बाहेर ठेवलं", असं त्यांनी सांगितलं.


मोनालिसाच्या वडिलांनी याचं कारणही त्यांना विचारलं. जयसिंह म्हणाले, "त्यांना याचं कारण विचारलं तेव्हा ते तुम्ही मोनालिसाचं जबरदस्ती लग्न लावत आहात, तिला तुमच्यासोबत यायचं नाही असं सांगितलं. मोनालिसानेही मला तिथून जायला सांगितलं. इथेच राहून अभिनय, नृत्य आणि चित्रपट शिकेन असं ती म्हणाली. मला दोन मिनिटंही न सोडणारी माझी मुलगी. मला वाटतं माझ्या मुलीला फसवलं आहे किंवा तिच्यासोबत काहीतरी केलं आहे. हा जादूटोणा असू शकतो. त्यांनी माझ्या डोळ्यासमोर मोनालिसाला पळवून नेलं. असं काय झालं की त्यांनी मला तिथून पळवून लावलं आणि माझ्या मुलीला घेऊन गेले?"



'मला आयुष्य संपवावं वाटलं'



"मुस्लिम मुलाशी लग्न करणं चुकीचं आहे. मला आयुष्य संपवावं असं वाटत होतं. पण माझा मुलगा म्हणाला, 'बाबा माझ्यासाठी जगा'. पण आता मोनालिसासारख्या मुलीचं मी काय करावं?", असा प्रश्न त्यांना पडला आहे.


"मला माझ्या मुलीला एकटं सोडायचं नव्हतं. मी माझ्या मुलीसाठी खूप मेहनत घेतली. मला खूप वाईट वाटतंय. मोनालिसाने सांगितलं की ती अभिनय शिकून परत येईल. ती कधी परत येते, मी तिची वाट पाहत आहे. पण लग्न पाहून असं वाटत नाही की ती येईल", अशी खंत त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

Comments
Add Comment

Weather Alert India : देशातील 12 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; नेमका कुठे आणि कसा पाऊस पडणार? जाणून घ्या

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवामान प्रणालीमुळे देशातील अनेक भागांत मान्सून सक्रिय झाला

Arunachal Pradesh : अरुणाचल प्रदेशला पुराचा तडाखा; पाच सैनिक वाहून गेले तर चार नागरिकांचा मृत्यू

नवी दिल्ली : मुसळधार पावसामुळे अरुणाचल प्रदेशला पावसाचा जबर तडाखा बसला आहे. दिबांग व्हॅली जिल्ह्यात अचानक

PM Modi Speech : एका वर्षात एक कोटी युवकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे कौशल्य प्रशिक्षण देण्याची पंतप्रधानांची घोषणा

नवी दिल्ली : देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र

Narendra Modi : 'सेमीकंडक्टरपासून अणुऊर्जेपर्यंत...'; जाणून घ्या पंतप्रधान मोदींच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

नवी दिल्ली : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला

Independence Day 2026 : तिरंगा, २१ तोफांची सलामी आणि ‘वंदे मातरम्’चा निनाद; लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाचा दिमाखदार सोहळा

नवी दिल्ली : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील ऐतिहासिक लाल

Independence Day 2026 : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त Google Doodleची खास कलाकृती; भारतीय वस्त्रकलेतून दिसली सांस्कृतिक विविधता

नवी दिल्ली : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त Google ने आपल्या होमपेजवर खास आणि रंगीबेरंगी Doodle सादर करून