स्वच्छ शहर इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मृत्यू, प्रशासनावर गंभीर आरोप

इंदूर : देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. सांडपाणी मिसळलेले पाणी प्यायल्याने नागरिकांचा मृत्यू झाला आहे. भागीरथपुरा परिसरात पाणीपुरवठ्याच्या जलवाहिनीत सांडपाणी मिसळल्यामुळे चार नागरिकांचा मृत्यू झाला असून १४९ जणांना रुग्णालयात दाखल केले आहे.


जलवाहिनीत गळती झाली. गळतीमुळे शौचालयाचे सांडपाणी आणि पिण्याचे पाणी एकत्र झाल्यामुळे मोठे संकट निर्माण झाले. या प्रकरणी इंदूरचे आयुक्त आणि महापौर यांनी चौकशीचे आदेश दिले


नव्या जलवाहिनीला मंजुरी दिली असूनही कामाने अपेक्षेप्रमाणे गती घेतलेली नाही. आता सांडपाणी आणि पिण्याचे पाणी एकमेकांत मिसळण्याचा प्रकार घडला आहे. या घटनेचे राजकीय पडसाद उमटले आहेत. काँग्रेसने याला प्रशासनाचा गंभीर निष्काळजीपणा ठरवत महापौर आणि आयुक्तांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे.

Comments
Add Comment

भारतीय उद्योगांसाठी युरोपीयन बाजारपेठ

९० टक्के वस्तूंवर शुल्क माफ करारामुळे दोन्ही देशांच्या आर्थिक संबंधांना बळ नवी दिल्ली : भारत आणि युरोपीयन

भारताला नुकसान पोहोचवणे, हाच पाकिस्तानचा अजेंडा

नवी दिल्ली : भारताने संयुक्त राष्ट्र परिषदेत पाकिस्तानवर जोरदार हल्ला चढवला आहे. ‘पाकिस्तानने नेहमीच विनाकारण

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात

१ फेब्रुवारीला सादर होणार अर्थसंकल्प गुरुवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आर्थिक सर्वेक्षण सादर

‘मदर ऑफ ऑल डील’वर स्वाक्षरी

भारत व युरोपियन युनियनमध्ये मुक्त व्यापार कराराची अधिकृत घोषणा नवी दिल्ली : भारत आणि युरोपियन युनियनमध्ये

Jammu And Kashmir : जम्मू-श्रीनगर महामार्गावर बस आणि ट्रकची भीषण धडक; CRPF जवानांसह चौघांचा मृत्यू, अनेक जखमी

जम्मू-काश्मीर : जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी काळाने भीषण घाला घातला. उधमपूर जिल्ह्यात एक

जम्मू काश्मीर : बर्फवृष्टीमुळे श्रीनगर विमानतळावरील सर्व विमानसेवा रद्द

श्रीनगर विमानतळावरील येणारी - जाणारी सर्व उड्डाणे सततच्या बर्फवृष्टीमुळे आणि खराब हवामानामुळे रद्द करण्यात