अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून गुंड गजा मारणेच्या पत्नीला उमेदवारी

पुणे महानगरपालिकेत मोठमोठ्या राजकीय घडामोडी होताना दिसत असतानाच, कुख्यात गुंड गजा मारणेची पत्नी जयश्री मारणे यांना राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून एबी फॉर्म देण्यात आला आहेत. गुंडाची पत्नी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याने पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे याची पत्नी जयश्री मारणे यांना अजित पवार गटाकडून प्रभाग १० बावधनमधून एबी फॉर्म देण्यात आला आहे. गुन्हेगारी मिटवा म्हणणाऱ्या अजित पवारांनी गजा मारणेच्या पत्नीला उमेदवारी दिली आहे. त्याचप्रमाणे आंदेकर कुटुंबाने उमेदवारी अर्ज भरल्यानंतर ते कोणत्या पक्षाकडून लढणार याबाबत अनेक तर्क-वितर्क लढवले जात होते. अखेर मंगळवारी एबी फॉर्म भरण्याच्या अखेरच्या दिवशी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून आंदेकरांच्या घरात उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांना अजित पवारांच्या पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. अजित पवारांनी एका कार्यक्रमात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना पुण्यातील कोयता गँग बंद झाली पाहिजे. अशी सूचना केली होती. आम्ही तुमच्यासाठी पोलिसांची संख्या वाढवली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले होते. आता गुंडाच्या कुटुंबीयांना उमेदवारी दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Comments
Add Comment

आताची सर्वात मोठी बातमी: भारत जपानला मागे टाकत चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला!

मोहित सोमण: भारताच्या प्रातिनिधिक स्वरूपात अर्थव्यवस्थेचे जगभरात कौतुक होत असताना आता सरकारने आणखी एक मोठी

२०२५ मधील शेवटच्या दिवशी शेअर बाजारात तेजीच, आज तेजी का राहील? वाचा आजची टेक्निकल पोझिशन

मोहित सोमण: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळच्या सत्रात वाढ झाली आहे. सेन्सेक्स १९५ व निफ्टी ८०.८५ अंकांने

मनसे युतीचा फटका; वरळी, परळ, कुर्ला, वांद्रे पूर्व, विक्रोळीत उबाठा गटात राजीनामा नाट्य सुरुच

मुंबई : उबाठा आणि मनसेच्या युतीमध्ये झालेल्या जागा वाटपात उबाठाच्या शिवसैनिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली गेली

उमेदवारी अर्ज, प्रचार रथ, झेंडे आणि प्रचार साहित्यांची खरेदी आणि उबाठाने कापला पत्ता...

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : वडाळ्यातील माजी नगरसेवक अमेय घोले यांनी उबाठाला राम राम ठोकत शिवसेनेत प्रवेश

कुणाचा पत्ता कापला, कुणाची बंडखोरी तर कुणाचा पक्षप्रवेश

मुंबई : मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत विविध

नवी मुंबई विमानतळावर पहिल्याच पाच दिवसांत प्रवासी संख्या २६ हजारांवर

सुट्टीच्या दिवसांत प्रवासी संख्येत लक्षणीय वाढ नवी मुंबई : देशाच्या हवाई वाहतूक क्षेत्रातील नवा मानबिंदू