तिथीनुसार आज राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! अयोध्येत आनंदाचे वातावरण

अयोध्या: समस्त हिंदूंच्या संस्कृतीचे प्रतिक असलेल्या राम मंदिराचा आज दुसरा वर्धापन आहे. तिथीनुसार म्हणजेच 'प्रतिष्ठा द्वादशी'या शुभमुहुर्तावर दोन वर्षांपूर्वी राम मंदिराचे उद्घाटन करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली २२ जानेवारी २०२४ रोजी राममंदिराचा प्राण प्रतिष्ठा सोहळा पार पडला. या ऐतिहासिक शुभ प्रसंगाला तिथीनुसार आज दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्त आज अयोध्येमध्ये आनंदाचे वातावरण आहे.


राम मंदिराच्या दुसऱ्या वर्धापन दिनाच्यापूर्वी २५ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत अयोध्येत भव्य ध्वजारोहण सोहळा पार प़डला होता. ध्वजारोहण सोहळा हा राम मंदिराच्या पूर्णतेचे प्रतीक आहे. त्यामुळे आज मंदिराच्या पूर्णतेनंतर पहिलाच वर्धापन दिन सोहळा असे म्हणण्यास हरकत नाही. आजचा सोहळा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि उत्तर प्रदेशचे मंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थित पार पडणार आहे.


राम मंदिराला दोन वर्ष पूर्ण झाल्यामुळे अयोध्येत पाच दिवसांचा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. ज्याची सुरुवात २८ तारखेपासून झाली आहे. मात्र या पाच दिवसांमध्ये आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. या पाच दिवसीय भव्य सोहळ्यासाठी देश-विदेशातून मोठ्या संख्येने भाविक आल्याची माहिती आहे. त्यांच्यासाठी मंदिर ट्रस्टने व्यापक व्यवस्था केली आहे.


या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरात वाहतूक आणि सुरक्षा निर्बंध कडक करण्यात आले आहेत. अयोध्येत वाहनांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे, बाहेरील भागात ३६ नियुक्त पार्किंग झोन तयार करण्यात आले आहेत. गर्दीचे नियमन करण्यासाठी आणि टप्प्याटप्प्याने दर्शन घेण्याची परवानगी देण्यासाठी होल्डिंग एरिया देखील तयार करण्यात आले आहेत. तसेच दक्षता म्हणून प्रत्येक ठिकाणी नोडल अधिकारी तैनात आहेत. ड्रोनविरोधी यंत्रणादेखील सक्रिय करण्यात आल्या आहेत.
Comments
Add Comment

Supreme Court On UGC: सर्वोच्च न्यायालयाकडून यूजीसीच्या नवीन नियमांना स्थगिती

सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्रीय विद्यापीठ आयोगाच्या  म्हणजेच यूजीसीच्या नवीन नियमांना स्थगिती देण्यात आली

भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नाबाबत 'महाराष्ट्र पॅटर्न'चे सर्वोच्च न्यायालयाने केले कौतुक

अन्य राज्यांच्या उपाययोजनांवर ओढले ताशेरे नवी दिल्ली :देशातील भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या आणि नागरिकांना

भारतीय उद्योगांसाठी युरोपीयन बाजारपेठ

९० टक्के वस्तूंवर शुल्क माफ करारामुळे दोन्ही देशांच्या आर्थिक संबंधांना बळ नवी दिल्ली : भारत आणि युरोपीयन

भारताला नुकसान पोहोचवणे, हाच पाकिस्तानचा अजेंडा

नवी दिल्ली : भारताने संयुक्त राष्ट्र परिषदेत पाकिस्तानवर जोरदार हल्ला चढवला आहे. ‘पाकिस्तानने नेहमीच विनाकारण

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात

१ फेब्रुवारीला सादर होणार अर्थसंकल्प गुरुवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आर्थिक सर्वेक्षण सादर

‘मदर ऑफ ऑल डील’वर स्वाक्षरी

भारत व युरोपियन युनियनमध्ये मुक्त व्यापार कराराची अधिकृत घोषणा नवी दिल्ली : भारत आणि युरोपियन युनियनमध्ये