ठाण्यात घराणेशाहीचा वाद चिघळला

खा. नरेश म्हस्केंच्या मुलाच्या उमेदवारीला शिवसेनेचा विरोध


ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घराणेशाहीचा वाद उग्र होताना दिसतो आहे. शिवसेनेच्या (शिंदे गट) माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी सुरू केलेली नाराजी आता थेट खासदार नरेश म्हस्के यांच्या घरापर्यंत पोहोचली आहे. विशेष म्हणजे, खासदार होण्यापूर्वी नगरसेवक म्हणून ज्या प्रभागाचे नरेश म्हस्के प्रतिनिधित्व करत होते, त्यातून आता त्यांचा मुलगा आशुतोष उमेदवारीसाठी तयार होत असल्याचे संकेत मिळाले आहेत. मात्र शिवसेनेतील (शिंदे गट)कार्यकर्त्यांनी याला उघड विरोध असल्याने पक्षांतर्गत अस्वस्थता निर्माण झाली आहे.


काही दिवसांपूर्वी मनोरमानगर भागातदेखील भोईर कुटुंबाविरोधात बंड उभे राहिले होते. शिंदे गटाने विरोध करणाऱ्या शाखाप्रमुखावर शिस्तभंगाची कारवाई केली होती. त्यानंतर मीनाक्षी शिंदे यांनी महिला जिल्हा संघटक पदाचा राजीनामा देऊन नाराजीची ठिणगी पेटवली, जी आता अनेक प्रभागांमध्ये पसरू लागली आहे. शनिवारी रात्री कोपरी आनंदनगर येथेही अशाच प्रकारची घटना घडल्याने खासदार नरेश म्हस्के यांना आव्हान उभे राहिले आहे.

Comments
Add Comment

मीरा–भाईंदर महापालिका निवडणूक

युतीसाठी शिवसेनेकडून २४ तासांचा अल्टिमेटम भाईंदर : मीरा–भाईंदर महापालिका निवडणूक युतीसंदर्भात शिवसेना आणि

कडोंमपा निवडणुकीसाठी महायुतीत धुसफूस

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीतील अंतर्गत विसंवाद उघडकीस

अवयवदानातून मिळाले ६ रुग्णांना जीवदान

ठाणे : ब्रेन डेड घोषित झालेल्या ३८ वर्षीय महिलेच्या अवयवदानामुळे एकाच वेळी सहा रुग्णांना नवे आयुष्य मिळाले आहे.

बदलापूरमध्ये बिबट्याची दहशत ;लोकवस्तीत घुसून बिबट्याचा हल्ला

ठाणे : दिवसेंदिवस बिबट्याची दहशत वाढत चालली आहे. बिबट्या वनक्षेत्र सोडून वारंवार मानवीवस्तीत प्रवेश करत आहे.

पडताळणीअंती नवी मुंबईत १३ हजार ३३६ दुबार मतदार

एका ठिकाणी मतदान करण्याबाबत भरून घेतले हमीपत्र नवी मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानुसार नवी मुंबई

ऐतिहासिक म्हसोबाच्या यात्रेसाठी मुरबाड प्रशासन सज्ज

३ जानेवारीपासून यात्रेला प्रारंभ; तहसीलदार अभिजीत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सर्व यंत्रणा सक्रिय मुरबाड : २२६