मोहित सोमण: आज भारत सरकारच्या सांख्यिकी व अंमलबजावणी मंत्रालयाने औद्योगिक उत्पादनाची नोव्हेंबर महिन्यातील आकडेवारी जाहीर केली आहे. गेल्या महिन्यात काही प्रमाणात आर्थिक परिस्थितीमुळे मागणीत घट झालेली असताना औद्योगिक उत्पादन ०.४% पातळीवर वाढले होते. मात्र नोव्हेंबर महिन्यात मूळ धातूंच्या व फॅब्री मेटल उत्पादनात झालेल्या मोठ्या वाढीचा फायदा म्हणून दोन वर्षांतील औद्योगिक उत्पादन पातळीवर आकडेवारी पोहोचली आहे. सरकारी आकडेवारीनुसार, इयर ऑन इयर बेसिसवर थेट नोव्हेंबर महिन्यात औद्योगिक उत्पादनात ८% वाढ झाली आहे. अहवालातील माहितीनुसार, मान्सून काळ संपल्यानंतर खाणकाम उत्पादनातील मोठी वाढ झाल्याने तेही उत्पादन इयर ऑन इयर बेसिसवर ५.४% वाढले.
यंदा अहवालाच्या आधारे नोव्हेंबर महिन्यात खाणकाम (Mining), उत्पादन (Manufacturing) क्षेत्रातील वाढ अनुक्रमे ५.४%, ८% पातळीवर झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले. इलेक्ट्रिसिटीत मात्र ऑक्टोबर तुलनेत नोव्हेंबरमध्ये -१.५% घसरण झाली आहे. ऑक्टोबर महिन्यातील उत्पादनात १५१.३ अंकांच्या तुलनेत नोव्हेंबर महिन्यात १५८.८ पातळीवर वाढ झाली असून इलेक्ट्रिसिटीत ऑक्टोबर महिन्यातील १९३.४ तुलनेत नोव्हेंबर महिन्यात १८१.३ पातळीवर घसरण झाली. खाणकामात आकडेवारीनुसार, ऑक्टोबर महिन्यातील १२६.२ तुलनेत नोव्हेंबर महिन्यात १४१.० पातळीवर वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. जर इयर ऑन इयर बेसिसवर पाहिल्यास गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यातील ४.४% तुलनेत यंदा ऑक्टोबर महिन्यात २.०% घसरण झाली आहे. तर गेल्या नोव्हेंबर महिन्यातील ५.५ तुलनेत या नोव्हेंबर महिन्यात ८.०% पातळीवर मोठी वाढ झाली आहे.
इलेक्ट्रिसिटीत मात्र गेल्या ऑक्टोबर महिन्यातील २.०% तुलनेत या ऑक्टोबर महिन्यात -६.९% घसरण झाली आहे. तर गेल्या नोव्हेंबर महिन्यातील ४.४% तुलनेत यंदा -१.५% पातळीवर घसरण झाली आहे. एकूणच औद्योगिक उत्पादनात इयर ऑन इयर बेसिसवर गेल्या ऑक्टोबरमधील ३.७% तुलनेत यंदा ०.५% पातळीवर वाढ झाली असून नोव्हेंबर महिन्यात इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) ५.०% तुलनेत यंदा ६.७% पातळीवर वाढ झाली आहे. यंदा उत्पादन श्रेणीतील इंडेक्स आधारित सर्वाधिक वाढ पायाभूत सुविधा (Infrastructure) व बांधकाम क्षेत्रात (Construction) झाली आहे. इयर ऑन इयर बेसिसवर ही वाढ ४.७% वरून ७.१% पातळीवर ऑक्टोबर महिन्यात झाली असून नोव्हेंबर महिन्यात मात्र इयर ऑन इयर बेसिसवर १४.१% वरुन -१.३% पातळीवर घसरण झाली आहे.
अतिरिक्त माहिती -
मूलभूत धातूंचे उत्पादन या उद्योग गटामध्ये, एमएस स्लॅब्स माईल्ड स्टीलचे एचआर कॉइल्स आणि शीट्स आणि मिश्र धातूचे उत्पादन या वस्तूंच्या गटांनी वाढीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
औषधे, औषधी रसायने आणि वनस्पतीजन्य उत्पादनांचे उत्पादन या उद्योग गटामध्ये, पचन विकर आणि अँटासिड्स पीपीआय औषधांसह, पशुवैद्यकीय औषधांसाठी लस आणि मनोविकारविरोधी औषधे (उदा. ओलँझापाइन) या वस्तूंच्या गटांनी वाढीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
याशिवाय मोटार वाहने, ट्रेलर आणि सेमी-ट्रेलरचे उत्पादन या उद्योग गटामध्ये ऑटो घटक/सुटे भाग आणि उपकरणे व व्यावसायिक वाहने आणि प्रवासी कार या वस्तूंच्या गटांनी वाढीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
वापरावर आधारित वर्गीकरणानुसार, नोव्हेंबर २०२५ या महिन्यासाठी प्राथमिक वस्तूंचा निर्देशांक (Index) १५०.७, भांडवली वस्तूंचा ११७.८, मध्यवर्ती वस्तूंचा १७०.१ आणि पायाभूत सुविधा/बांधकाम वस्तूंचा १९८.७ आहे. पुढे, टिकाऊ ग्राहक वस्तू आणि ग्राहक (वस्तूंचे निर्देशांक अनुक्रमे १३४.० आणि १६९.७ आहेत.
पावसाळ्याचा हंगाम संपल्यामुळे आणि लोहखनिजासारख्या धातूंच्या खनिजांमध्ये झालेल्या जोरदार वाढीमुळे, खाणकाम क्षेत्रातील वाढ देखील ५.४% पर्यंत पूर्वपदावर