पडताळणीअंती नवी मुंबईत १३ हजार ३३६ दुबार मतदार

एका ठिकाणी मतदान करण्याबाबत भरून घेतले हमीपत्र


नवी मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानुसार नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी १ जुलै २०२५ रोजीची मतदार यादी ग्राह्य धरण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आयोगाकडून प्राप्त ४५ हजार ५८८ संभाव्य दुबार मतदारांच्या यादीची बीएलओ (बूथ लेव्हल अधिकारी) यांच्यामार्फत प्रत्यक्ष पडताळणी करण्यात आली. या पडताळणीत १३ हजार ३३६ दुबार मतदार आढळून आले आहेत. या दुबार मतदारांकडून त्यांनी कोणत्या एका प्रभागातील मतदार यादीतून मतदान करणार आहेत, याबाबत विकल्प स्वरूपातील हमीपत्र भरून घेण्यात आले आहे.


राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महापालिका क्षेत्रात प्रभागनिहाय बीएलओ पथके स्थापन करण्यात आली होती. महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संगणक प्रणालीद्वारे दुबार मतदारांच्या नावानुसार व विधानसभा मतदारसंघनिहाय यादीचे वर्गीकरण करण्यात आले. छायाचित्रांसह असलेली संभाव्य दुबार मतदारांची यादी बीएलओंकडे प्रत्यक्ष पडताळणीसाठी देण्यात आली होती. बीएलओंकडून फोटो पडताळणी, प्रभाग तपासणी, आई-वडिलांची नावे, पत्ता समान आहे की नाही यासह विविध निकषांवर तपासणी करण्यात आली. एकाच व्यक्तीचे नाव दोन वेगवेगळ्या पत्त्यांवर आढळून आल्यास संबंधित मतदाराकडून कोणत्या पत्त्यावरील मतदार यादीतून मतदान करणार, याबाबत हमीपत्र घेण्यात आले आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने राज्य निवडणूक आयोगाकडून प्राप्त संभाव्य दुबार मतदारांची पडताळणी नियोजनबद्ध आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण केल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

Comments
Add Comment

ऐतिहासिक म्हसोबाच्या यात्रेसाठी मुरबाड प्रशासन सज्ज

३ जानेवारीपासून यात्रेला प्रारंभ; तहसीलदार अभिजीत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सर्व यंत्रणा सक्रिय मुरबाड : २२६

डोंबिवली शहराचा पाणीपुरवठा मंगळवारी बारा तास बंद

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने शहराचा पाणी पुरवठा येत्या मंगळवार, ३० डिसेंबर

ठाण्यात पुन्हा बिबट्या

वागळे इस्टेट परिसरातील नागरिक घाबरले ठाणे : दोन दिवसांपूर्वी ठाण्यातील पोखरण रोडमध्ये बिबट्या दिसला होता. आज

हेटवणे प्रकल्प : २९ डिसेंबरला सिडकोचा पहिलाच टनेल ब्रेकथ्रू

नवी मुंबई शहराच्या पाणीपुरवठ्याला चालना मिळणार नवी मुंबई : नवी मुंबईला सातत्यपूर्ण आणि सुरक्षित पाणीपुरवठा

मीरा-भाईंदरमध्ये आम्ही ८७ जागा लढवू !

भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या अटी; महायुतीत खळबळ भाईंदर : मीरा–भाईंदर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर

ठाण्यात भाजप-शिवसेना युतीवर आजची डेडलाईन

भाजप स्वबळावर जाण्यास तयार ठाणे : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंची युती झाल्यानंतर ठाण्यात