ओला इलेक्ट्रिक शेअर आज ५% उसळत इंट्राडे उच्चांकावर का वाढतोय शेअर? वाचा

मोहित सोमण: गेले अनेक दिवस घसरत असलेला ओला इलेक्ट्रिक (Ola Electric Mobility Limited) शेअर आज मोठ्या प्रमाणात उसळला आहे. सकाळी सत्राच्या सुरुवातीला शेअर ५% पेक्षा अधिक पातळीवर उसळला आहे. कंपनीने एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, कंपनीला अवजड उद्योग मंत्रालयाकडून पीएलआय (Production Link Incentive PLI) योजनेसाठी मंजूरी मिळाल्याचे जाहीर केल्याने गुंतवणूकदारांनी शेअरला मोठा प्रतिसाद दिला. परिणामी सत्राच्या सुरुवातीला शेअर ५.३७% उसळल्याने ३७.२५ रूपये प्रति शेअर या अप्पर सर्किटवर पोहोचला होता. सकाळी ११ वाजेपर्यंत कंपनीचा शेअर ३.०८% उसळत ३६.०५ रूपये प्रति शेअरवर व्यवहार करत आहे.


कंपनीला एकूण ३६६.७८ कोटींच्या ऑर्डरला पीएलआय योजनेत सरकारने मान्यता दिली आहे. कंपनीला पात्र ठरवल्याने मोठ्या प्रमाणात उत्पादनाला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळणार आहे. या ढेपाळलेल्या कंपनीच्या कामगिरीला व शेअरला आज नवसंजीवनी मिळाली आहे. कंपनीच्या आर्थिक वर्ष २०२४-२५ मधील एकूण विक्री किंमत मूल्यांकनावर आधारित तसेच आयएफसीआय कंपनीच्या माध्यमातून दिलेल्या ३६६.७८ कोटींच्या रक्कमेचा परतावा असा एकत्रित परतावा कंपनीला मिळणे अपेक्षित असल्याचे कंपनीने आपल्या एक्सचेंज फायलिंगमध्ये स्पष्ट केले. या निर्णयावर कंपनीच्या केवळ उत्पादनाला नाही तर रिसर्च अँड डेव्हलपमेंट विभागालाही आर्थिक पाठबळ मिळणार आहे.


या घडामोडीवर भाष्य करताना ओला इलेक्ट्रिकच्या प्रवक्त्याने सांगितले आहे की, पीएलआय-ऑटो योजनेअंतर्गत ३६६.७८ कोटी रुपयांची मंजुरी ही ओला इलेक्ट्रिकच्या उत्पादन क्षमता आणि भारतात जागतिक दर्जाचे ईव्ही तंत्रज्ञान विकसित करण्याच्या आमच्या वचनबद्धतेची एक मजबूत पुष्टी आहे. हे प्रोत्साहन देशांतर्गत उत्पादन वाढवणे, स्थानिकीकरण अधिक दृढ करणे आणि इलेक्ट्रिक मोबिलिटी मूल्य साखळीमध्ये (Global Supply Chains) नावीन्य आणण्याच्या आमच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना मान्यता देते. प्रगत ऑटोमोटिव्ह उत्पादन आणि स्वच्छ गतिशीलतेसाठी भारताला जागतिक केंद्र बनवण्याच्या भारत सरकारच्या दृष्टिकोनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.'


पीएलआय-ऑटो योजनेचा प्रमुख उद्देश हा परदेशावर अवलंबून न राहता मोठ्या प्रमाणात नियोजनबद्ध देशांतर्गत उत्पादन मजबूत करणे व प्रगत ऑटोमोटिव्ह तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देणे आणि ऑटो व ऑटो घटकांच्या क्षेत्रात भारताची जागतिक स्पर्धात्मकता वाढवणे हा आहे. त्यामुळेच कंपनीच्या शेअरला चांगला प्रतिसाद मिळाल्याने या शेअरमध्ये खरेदी वाढली आहे. गेल्या आठवड्यात शेअरला ०.६५% परतावा मिळाला असून इयर टू डेट बाबतीत कंपनीच्या शेअर्समध्ये ५७.८५% घसरण झाली आहे. एका वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये ६१.२५% घसरण झाली असून सर्वाधिक उच्चांकी पातळी कंपनीने २६ डिसेंबर २०२४ ला ९९.९५ रूपये प्रति शेअरवर नोंदवली होती.

Comments
Add Comment

शक्तिपीठ महामार्ग महाराष्ट्रातील या जिल्ह्यांतून जाणार

मुंबई : एमएसआरडीसीने ८५६ किमीच्या महाराष्ट्रातील १३ जिल्ह्यांतील ३९५ गावांतून जाणार असलेल्या शक्तिपीठ

कर्तव्यपथावर 'गणपती बाप्पा मोरया'चा गजर, प्रजासत्ताक दिनी दिसले देशाचे सामर्थ्य

नवी दिल्ली : भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी नवी दिल्लीत कर्तव्यपथावर संचलनाचे अर्थात

प्रजासत्ताक दिनी धाराशिवमध्ये पोलिसाचा मृत्यू

धाराशिव : प्रजासत्ताक दिनी ध्वजवंदन केल्यानंतर थोड्याच वेळात ५५ वर्षीय मोहन भीमा जाधव या पोलीस अधिकाऱ्याचा

मोदी सरकारचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना होणार फायदा

नवी दिल्ली : मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना फायदा

फिलिपाईन्समध्ये बोट बुडून अनेकांचा मृत्यू

झांबोआंगा : फिलिपाईन्समध्ये झांबोआंगा येथून सुलू प्रांतातील जोलो बेटाच्या दिशेने निघालेली बोट समुद्रात

मराठी रीलस्टार प्रथमेश कदमचे निधन

मुंबई : लोकप्रिय मराठी रीलस्टार आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रथमेश कदमचं निधन झालं आहे. प्रथमेशच्या निधनाचे