ई-चलन न भरल्यास उमेदवारी अर्ज होणार बाद!

वाहतूक शाखेकडे इच्छुक उमेदवाराने भरले तब्बल दीड लाखांचे ई-चलन


ठाणे : पालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. निवडणूक लढताना उमेदवारांनी आपल्या वाहनांवरचा दंड भरून थकबाकी नसल्याबाबतचा दाखला घेणे आवश्यक आहे. अन्यथा, दंड थकीत असल्यास उमेदवारी अर्ज बाद ठरणार आहे. उमेदवारीवर संक्रांत येऊ नये म्हणून आपल्या वाहनांवरील पेंडिंग ई-चलन क्लिअर करण्यासाठी उमेदवारांची धावाधाव सुरू झाली आहे. ठाण्यात एका इच्छुक उमेदवाराने चक्क दीड लाख दंड भरून निवडणुकीचा मार्ग मोकळा केला आहे.


ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील ठाणे महापालिका, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर तसेच भिवंडी महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पालिका निवडणुकांसाठी उमेदवार म्हणून अर्ज करताना, तुमच्यावर अनधिकृत बांधकामे केल्याचा अथवा शासन व प्राधिकरणांचे अन्य कर व दंड शुल्क थकीत नसल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्या नुसार वाहनांवरील ई-चलन देखील दंड थकीत असु नये. असा नियम आहे.


ई-चलन दंड भरला आहे की नाही, हे निवडणूक अधिकारी तपासणार आहेत. या संदर्भातील ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) नसल्यास उमेदवारी अर्ज बाद होऊ शकतो. त्यामुळे पेंडिंग ई-चलन भरण्यासाठी ठाणे वाहतूक विभागात गर्दी होऊ लागली आहे. एका इच्छुकाने तर मंगळवारी आपल्या वाहनावरील तब्बल दीड लाख ई-चलान दंड भरून आपली उमेदवारी निर्धोक केल्याचे वाहतूक विभागातील सुत्रांनी सांगितले.


दंड भरण्यासाठी धावाधाव सुरू


उमेदवारी अर्ज भरताना वाहन संबंधित सर्व कागदपत्रे अद्ययावत असावित. अर्जांमध्ये वाहतूक नियमांचे पालन आणि कागदपत्रांचीही तपासणी केली जाते. थकीत दंडामुळे उमेदवारी अर्ज प्रक्रियेत अडथळे येऊ शकतात. त्यामुळे जे उमेदवार पालिका निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत त्यांनी थकीत ई-चलन दंड भरण्यासाठी धावाधाव सुरू केली आहे.

Comments
Add Comment

ठाणे ‘सिव्हिल’ने तरुणीला दिले नवे आयुष्य

अपघातग्रस्त तरुणीवर जबड्याची जोखमीची शस्त्रक्रिया यशस्वी ठाणे : नेरळ परिसरात झालेल्या अपघातात गंभीर जखमी

वनविभागाच्या कारवाईमुळे कल्याणमधील ४०० कुटुंबांचा प्रश्न ऐरणीवर

आपत्कालीन सेवांचा मार्ग खुंटला कल्याण : मांडा–टिटवाळा पूर्वेकडील विद्यामंदिर शाळेजवळील रस्ता पुन्हा चर्चेचा

मुरबाडमधील शेतकऱ्यांच्या खात्यात बोनस जमा होण्यास सुरुवात

मुरबाड : मुरबाड तालुका शेतकरी सहकारी संघाने सन २०२४-२५ या हंगामासाठी ज्या शेतकऱ्यांची भातविक्रीसाठी ऑनलाईन

कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपमध्ये प्रवेश

उल्हासनगरात उबाठा सेनेला धक्का उल्हासनगर : उल्हासनगरमधील उबाठा गटाला मोठा राजकीय धक्का बसला असून कल्याण

ठाण्यात महाविकास आघाडीची ‘बिघाडी’?

महाविकास आघाडीच्या नेत्यांची मोट बांधण्यास सुरुवात काँग्रेसच्या ३५ जागा वाटपाच्या मागणीने अधिक तिढा

नवी मुंबईत कचऱ्यापासून निर्मित खताला मानांकित ओळख

राज्य नोंदणीकृत ‘हरित महासिटी कंपोस्ट’ ब्रॅण्ड  नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन