पुष्कर जोगच्या घराला आग! मदतीसाठी सोशल मीडीयावर पोस्ट

मुंबई: संपूर्ण देशात ख्रिसमस सण मोठ्या आनंदात साजरा केला जात आहे. मात्र दुसरीकडे मराठी सिनेक्षेत्रातील अभिनेत्याच्या आनंदाला गालबोट लागले आहे. मराठमोळा अभिनेता पुष्कर जोगच्या बिल्डींगला आग लागल्याची घटना आज सकाळी घडली. यावेळी पुष्कर आणि त्याची मुलगी घरात अडकले होते. त्यामुळे मदतीसाठी पुष्करने सोशल मीडिया पोस्ट केली आणि त्याच्यासाठी अनेक हात पुढे आले. यामुळे पुष्करला घराबाहेर पडण्यास आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यास मदत मिळाली. या घटनेनंतर पुष्करने झालेल्या नुकसानाचा व्हिडीओ सोशल मीडीयावर शेअर केला आहे. मात्र आग का लागली याचे कोणतेच कारण अद्याप समोर आले नाही.


मुळचा पुण्याचा असलेला पुष्कर जोग मुंबईत कामानिमित्त राहतो. मात्र आज घराला लागलेल्या आगीमुळे पुष्कर हतबल झाला आहे. पुष्करने घराच्या झालेल्या नुकसानाचा जो व्हिडीओ पोस्ट केला आहे, त्यात त्याने अग्नीशामक दल, बीएमसी आणि मुंबई पोलीस या खऱ्या हिरोंचे मनापासून धन्यवाद”, असे लिहित कृतज्ञता व्यक्त केली आहे. मात्र यानंतर त्याने माझे घर गेले असे जिव्हारी लागणारे कॅप्शन दिले आहे.





हा अपघात जिव्हारी लागण्याचे अजून एक कारण म्हणजे आग लागण्याच्या काही वेळा पूर्वी पुष्करने आपल्या मुलीसोबत ख्रिसमस सेलिब्रेशनचे फोटोस आणि व्हिडीओज पोस्ट केले होते. ज्यात ख्रिसमस निमित्त घरात केलेली सजावट दिसत आहे. तसेच एका फोटोमध्ये पुष्करच्या मुलीच्या चेहऱ्यावरचा आनंदही दिसून येत आहे. त्यामुळे मुळात मुंबईसारख्या ठिकाणी घर घेणे ही एवढी कठीण गोष्ट असताना सजवलेल्या घराला आगीच्या अपघातचा धक्का लागून क्षणभरात होत्याच नव्हत होण हा अनुभवच किती वाईट आहे.

Comments
Add Comment

सयाजी शिंदेंच्या ‘सह्याद्री देवराई ’ प्रकल्पाला आग! नेमकं कारण काय?

बीड: एखाद तान्ह बाळ जन्माला आल्यापासून त्याची सर्व निगा राखायची, वाढ पाहायची, आपल्यासोबत खुलताना त्याला जवळ

संजय कपूरची ३० हजार कोटींची मालमत्ता कोणाला मिळणार ? न्यायालयासमोर आलेल्या याचिकेमुळे येणार नवा ट्विस्ट ?

नवी दिल्ली : उद्योगपती संजय कपूरची ३० हजार कोटी रुपयांची मालमत्ता कोणाच्या मालकीची होणार असा प्रश्न निर्माण

रफी पुरस्कार माझ्यासाठी देवाचा प्रसाद

जेष्ठ गायिका उत्तरा केळकर मुंबई : महान गायक मोहम्मद रफी यांच्या नावाने मला मिळालेला पुरस्कार हा माझ्यासाठी

'वेलकम ३'चे शूटिंग संपले , वेगवेगळ्या लूक मध्ये दिसणार अक्षय कुमार

Welcome 3 : बॉलिवूडच्या वेलकम ३ या चित्रपटाचे शूटिंग नुकतेच संपले आहे. या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार एक महत्त्वाची

लग्न मोडल्यानंतर स्मृती मानधनाचा मोठा निर्णय

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार खेळाडू स्मृती मानधना मागील काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे

३ इडियट्सचे १६ वर्षे: ५ कारणे ज्यामुळे राजकुमार हिरानींचा 'हा' चित्रपट आजही तितकाच ताजा वाटतो

मुंबई : राजकुमार हिरानी हे मोजक्या अशा फिल्ममेकर्सपैकी आहेत, ज्यांच्या कथा केवळ मनोरंजन करत नाहीत, तर दीर्घकाळ