मुंबई: संपूर्ण देशात ख्रिसमस सण मोठ्या आनंदात साजरा केला जात आहे. मात्र दुसरीकडे मराठी सिनेक्षेत्रातील अभिनेत्याच्या आनंदाला गालबोट लागले आहे. मराठमोळा अभिनेता पुष्कर जोगच्या बिल्डींगला आग लागल्याची घटना आज सकाळी घडली. यावेळी पुष्कर आणि त्याची मुलगी घरात अडकले होते. त्यामुळे मदतीसाठी पुष्करने सोशल मीडिया पोस्ट केली आणि त्याच्यासाठी अनेक हात पुढे आले. यामुळे पुष्करला घराबाहेर पडण्यास आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यास मदत मिळाली. या घटनेनंतर पुष्करने झालेल्या नुकसानाचा व्हिडीओ सोशल मीडीयावर शेअर केला आहे. मात्र आग का लागली याचे कोणतेच कारण अद्याप समोर आले नाही.
मुळचा पुण्याचा असलेला पुष्कर जोग मुंबईत कामानिमित्त राहतो. मात्र आज घराला लागलेल्या आगीमुळे पुष्कर हतबल झाला आहे. पुष्करने घराच्या झालेल्या नुकसानाचा जो व्हिडीओ पोस्ट केला आहे, त्यात त्याने अग्नीशामक दल, बीएमसी आणि मुंबई पोलीस या खऱ्या हिरोंचे मनापासून धन्यवाद”, असे लिहित कृतज्ञता व्यक्त केली आहे. मात्र यानंतर त्याने माझे घर गेले असे जिव्हारी लागणारे कॅप्शन दिले आहे.
हा अपघात जिव्हारी लागण्याचे अजून एक कारण म्हणजे आग लागण्याच्या काही वेळा पूर्वी पुष्करने आपल्या मुलीसोबत ख्रिसमस सेलिब्रेशनचे फोटोस आणि व्हिडीओज पोस्ट केले होते. ज्यात ख्रिसमस निमित्त घरात केलेली सजावट दिसत आहे. तसेच एका फोटोमध्ये पुष्करच्या मुलीच्या चेहऱ्यावरचा आनंदही दिसून येत आहे. त्यामुळे मुळात मुंबईसारख्या ठिकाणी घर घेणे ही एवढी कठीण गोष्ट असताना सजवलेल्या घराला आगीच्या अपघातचा धक्का लागून क्षणभरात होत्याच नव्हत होण हा अनुभवच किती वाईट आहे.View this post on Instagram






