वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत भारतीय संघाची सहाव्या स्थानावर घसरण

नवी दिल्ली  : माऊंट मांघनाई इथे सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजचा ३२३ धावांनी धुव्वा उडवत न्यूझीलंडने २-० अशी मालिका जिंकली. या विजयासह न्यूझीलंडने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी झेप घेतली.


२०२५-२७ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या नव्या आवृत्तीत न्यूझीलंडसाठी ही पहिलीच मालिका होती. तीन सामन्यांपैकी एका सामन्यात वेस्ट इंडिजने जोरदार संघर्ष केला. त्यामुळे ख्राईस्टचर्च कसोटी अनिर्णित राहिली. न्यूझीलंडने पुढच्या दोन कसोटी जिंकत मालिका जिंकली. सलग दोन कसोटी जिंकत न्यूझीलंडने भारत आणि दक्षिण आफ्रिका यांना मागे टाकत द्वितीय स्थान पटकावले आहे. माऊंट मांघनाई इथे झालेल्या कसोटीत डेव्हॉन कॉनवे आणि टॉम लॅथम या सलामीवीरांनी दोन्ही डावात शतक झळकावण्याचा दुर्मिळ विक्रम नावावर केला.


रविवारी ऑस्ट्रेलियाने अॅडलेड कसोटी जिंकत अॅशेसवर कब्जा केला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने गुणतालिकेत जोरदार भरारी घेतली. ऑस्ट्रेलियाने नव्या आवृत्तीत सलग सहा विजय मिळवत अव्वल स्थानी घट्ट पकड राखली आहे. त्यांचे ७२ गुण झाले आहेत. न्यूझीलंडने वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका जिंकत २८ गुणांसह दुसरे स्थान गाठलं आहे. गतविजेता दक्षिण आफ्रिकेचा संघ तिसऱ्या स्थानी आहे. त्यांनी चारपैकी तीन कसोटी जिंकल्या आहेत. श्रीलंका १६ गुणांसह ४ तर पाकिस्तानचा संघ १२ गुणांसह पाचव्या स्थानी आहे. घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभूत झाल्याने भारतीय संघाची सहाव्या स्थानी घसरण झाली आहे. अॅशेस मालिकेत सुमार कामगिरी करणारा इंग्लंडचा संघ सातव्या स्थानी आहे. बांगलादेश आठव्या तर वेस्ट इंडिज नवव्या स्थानी आहे.



वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये गुण कसे मिळतात ?



  1. कसोटी जिंकल्यास १२ गुण.

  2. टाय झाल्यास ६ गुण.

  3. अनिर्णित झाल्यास ४ गुण.

  4. गुणतालिकेतील अव्वल दोन संघ फायनलसाठी पात्र ठरतात.

  5. षटकांची गती संथ राखल्याबद्दल गुण कमी केले जातात.

Comments
Add Comment

पाकिस्तानच्या नक्वीचा भारताच्या १९ वर्षांखालील क्रिकेटपटूंनी केला अपमान

मुंबई  : जेतेपदाच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने समीर मिन्हासच्या धमाकेदार शतकाच्या जोरावर ३४७

भारत दौऱ्यातून मेस्सीला ८९ कोटींची कमाई, भारताला कररूपाने ११ कोटींचे उत्पन्न

मुंबई  : लोकप्रिय फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने नुकताच भारताचा दौरा केला होता. कोलकाता येथे झालेल्या १३ डिसेंबर

युवा भारताचे स्वप्न अधुरे!

१३ वर्षांनंतर पाकची जेतेपदावर मोहोर दुबई : १९ वर्षांखालील आशिया कप २०२५ स्पर्धेतील अंतिम सामना रविवारी झाला. या

भारतीय महिला संघाची विजयी सलामी

जेमिमाच्या अर्धशतकाने श्रीलंकेची कोंडी; मालिकेत १-० ने आघाडी विशाखापट्टणम : महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ चे

Rohit Sharma...२०२३ वर्ल्ड कपचा पराभव जिव्हारी लागला; क्रिकेट कायमचा सोडण्याचा विचार केला होता

मुंबई : भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा याने २०२३ च्या वनडे वर्ल्ड कप फायनलमधील पराभवाबाबत मनमोकळं वक्तव्य

भारत १९ वर्षांखालील आशिया कप फायनलमध्ये विक्रमी नवव्यांदा विजय मिळवण्याकडे भारताचे लक्ष्य...

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप २०२५ चा अंतिम सामना आज, २१ डिसेंबर रोजी दुबई येथे होणार आहे. आयुष