कॅडबरी जंक्शन ते गायमुखपर्यंतचा प्रवास होईल सुलभ
मुंबई : मेट्रो आता लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. ठाण्यातील मेट्रो लवकरच सुरू होणार या अपेक्षेने ठाण्याच्या मेट्रो प्रकल्प ४ ची चाचणी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते घेण्यात आली होती. सध्या या मेट्रो मार्गिकेच्या चाचणीचे काम सुरू आहे. यानंतर मेट्रो -४ लवकरच प्रत्यक्षात सुरु करण्यात येणार आहे.
मेट्रो ४ सेवा सुरु करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. मेट्रो ४ च्या चार मेट्रो स्थानकांपर्यंत ही चाचणी करण्यात आली होती. मेट्रो प्रकल्प ४ चा पहिला टप्पा हा ठाण्यातील गायमुख ते कॅडबरी जंक्शन मेट्रो स्थानकपर्यंत सुरू होणार आहे. यासाठी आधी पहिल्या चार स्थानकांपर्यंतच मेट्रोची चाचणी करण्यात आली होती. उर्वरित ६ स्थानकांपर्यंत मेट्रोची ट्रायल चाचणी सध्या घेतली जात आहे. त्यामुळे संपूर्ण चाचणी पूर्ण झाल्यानंतर ही मेट्रो सुरु करण्यात येणार आहे.
नवीन वर्षाच्या सुरुवातीला ठाणेकरांना मेट्रोतून प्रवास करता येणार आहे. हा प्रवास गायमुख मेट्रो स्टेशन ते कॅडबरी जंक्शन मेट्रो स्थानक पर्यंत केला जाणार आहे. सध्या उरलेल्या ६ स्थानकांची ट्रायल रन सुरु आहे. ही ट्रायल रन झाल्यानंतर मेट्रोला हिरवा कंदील दाखवला जाणार आहे. ठाणे मेट्रो ४ च्या पहिल्या टप्प्यात एकूण १० स्थानकांचा समावेश आहे. सध्या या स्थानकांची चाचणी घेतली जात आहे. कॅडबरी जंक्शन ते गायमुख यामध्येही मेट्रो धावणार आहे. मेट्रो-४ ही दोन भागांमध्ये विभागली आहे. मेट्रो ४ ही ३२.३२ किमी लांबीची असणार आहे. त्याला जोडून पुढे मेट्रो ४ ए जोडली जाणार आहे. ही मेट्रो २.७ किमी लांबीची असणार आहे. या मार्गात एकूण ३२ स्थानके असतील. दरम्यान, १० स्थानकांचा पहिला टप्पा नवीन वर्षाच्या सुरुवातीला सुरु होण्याची शक्यता असल्याने प्रवाशांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
अशी असतील मेट्रो स्थानकांची नावे
कॅडबरी जंक्शन, माजीवाडा, कपूरबावडी, मानपाडा, टिकुजी-नी-वाडी, डोंगरी पाडा, विजय गार्डनर, कासारवडवली, गव्हाणपाडा, गायमुख.