मुंबई: महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजले आणि मुंबई पालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी सर्वच पक्षांची रणनीती सुरू झाली आहे. देशाच्या आर्थिक राजधानीत सत्ता स्थापन करणे हे सर्वच पक्षांसाठी महत्त्वाचे असल्याने शक्य तेवढी बॅनरबाजी, सभा, रोडशो आणि बऱ्याच गोष्टींचा अवलंब केला जाणार आहे. ज्यात मुंबईचे केंद्रबिंदु असलेल्या शिवाजी पार्कवरील सभेला विशेष महत्व असून प्रचार सुरू होण्याआधीच शिवाजी पार्कमध्ये सभा घेण्याची परवानगी मिळवण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आधी मनसे आणि ठाकरे गटानंतर आता शिवसेनेने सुद्धा शिवाजी पार्कवरील सभेसाठी परवानगी मागितली आहे.
महाराष्ट्रातील एकूण २९ महानगरपालिकांसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदार होणार आहे. तर १६ जानेवारी २०२६ रोजी निकाल जाहीर केले जाणार आहेत. त्यामुळे आचारसंहितेच्या शेवटच्या काळात म्हणजेच पालिका निवडणुकीच्या सांगता सभेसाठी ठाकरे गट, मनसे आणि शिवसेनेकडून पालिकेला पत्र देण्यात आले आहे. त्यामुळे शिवाजी पार्कवर सभा घेण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळत आहे.
िचत्र पालिकेचे : दहिसर िवधानसभा सचिन धानजी मुंबई : दहिसर विधानसभा क्षेत्रामध्ये प्रभाग क्रमांक १मध्ये म्हात्रे आणि घोसाळकर यांच्याशिवाय कुणीच ...
जानेवारीतील ११, १२ आणि १३ या तारखांपैकी एक दिवस सभेसाठी मैदान देण्याची मागणी शिवसेनेकडून पत्राद्वारे करण्यात आली आहे. तर दुसरीकडे याच दिवसात ठाकरे गट आणि मनसेनेही सभेसाठी परवानगी मागितली आहे. पालिका निवडणूकीप्रमाणेच दसरा मेळाव्यासाठीही अनेकदा ठाकरे गट आणि शिवसेनेमध्ये शिवजी पार्क मैदानावरून चढाओढ पाहायला मिळाली आहे.
दरम्यान, शिउबाठा, शिवसेना आणि मनसेने एकाच दिवसांसाठी अर्ज केल्यामुळे पालिका प्रशासनासमोर कोणाला सभेसाठी शिवाजी पार्कवर परवानगी द्यायची हा पेच उभा राहिला असेल. त्यामुळे मुंबई महानगरपालिका निवडणूकीच्या सांगता सभेत शिवाजी पार्कवर कुणाचा आवाज घुमणार? आणि कोण मैदान मारणार याकडे आता लक्ष लागले आहे.