पश्चिम बंगालच्या मतदार यादीतून ५८ लाख नावे वगळली

१२ लाखांहून अधिक मतदार ‘बेपत्ता’ असल्याचे विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेत स्पष्ट


कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेच्या मसुदा मतदार यादीतून ५८.२ लाखांहून अधिक मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. ही यादी निवडणूक आयोगाने मंगळवारी प्रसिद्ध केली. यापैकी सुमारे २४ लाख मतदार मृत आहेत.


पश्चिम बंगालच्या मतदार यादीतून ५८ लाख नावे वगळली आहेत. रद्द केलेल्या नावांची एक स्वतंत्र यादी प्रकाशित केली आहे. वगळलेल्या नावांची यादी अधिकृत लिंकद्वारे उपलब्ध आहे. विशेष सखोल पुनरीक्षणानंतर राज्यातील मतदार यादीतून सुमारे ५८.८ लाख मतदारांची नावे वगळली जाण्याची शक्यता आहे. जनगणना आकडेवारीनुसार, पुढील वर्षीच्या सुरुवातीला होणाऱ्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत ५८,०८,२०२ नावे वगळण्यासाठी निश्चित करण्यात आली आहेत. गुरुवारी रात्री उशिरा झालेल्या गणनेनंतर वगळण्यासाठी चिन्हांकित केलेल्या नावांची संख्या ५८,०८,००२ होती.


निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी सांगितले की, राज्यात सध्या २४,१८,६९९ मृत मतदार आहेत, ज्यांची नावे अजूनही यादीत आहेत. याव्यतिरिक्त, १२,०१,४६२ मतदारांचा शोध लागलेला नाही. बूथ लेव्हल ऑफिसरने मतदाराच्या घरी ३ किंवा अधिक वेळा भेट दिली आणि त्या व्यक्तीचा शोध लागला नाही. अशा व्यक्तीचे नाव बेपत्ता मतदारांच्या यादीत टाकले जाते. या पुनरीक्षण मोहिमेत १९,९३,०८७ असे मतदार देखील आढळले आहेत ज्यांनी आपले पत्ते बदलले आहेत. हे मतदार एकापेक्षा जास्त ठिकाणी नोंदणीकृत असल्याचे आढळले. त्यांची नावे चुकीच्या पत्त्यावरून वगळली जातील आणि केवळ सत्यापित ठिकाणीच ठेवली जातील.


यादीत २४,१८,६९९ मृत मतदारांची नावे १,३७,५७५ मतदार बनावट असल्याचे उघड


५७ हजार ५०९ मतदारांनाही वगळणार : निवडणूक आयोगाने १,३७,५७५ मतदारांना बनावट असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांची नावे मतदार यादीच्या मसुद्यात समाविष्ट केली जाणार नाहीत. आणखी ५७,५०९ मतदारांना इतर श्रेणीत ठेवण्यात आले आहे आणि त्यांना देखील वगळण्यात येईल. आगामी राज्य निवडणुकांपूर्वी अचूक आणि अद्ययावत मतदार यादी सुनिश्चित करण्याच्या निवडणूक आयोगाच्या प्रयत्नांचाच हा भाग असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment

भारतीय उद्योगांसाठी युरोपीयन बाजारपेठ

९० टक्के वस्तूंवर शुल्क माफ करारामुळे दोन्ही देशांच्या आर्थिक संबंधांना बळ नवी दिल्ली : भारत आणि युरोपीयन

भारताला नुकसान पोहोचवणे, हाच पाकिस्तानचा अजेंडा

नवी दिल्ली : भारताने संयुक्त राष्ट्र परिषदेत पाकिस्तानवर जोरदार हल्ला चढवला आहे. ‘पाकिस्तानने नेहमीच विनाकारण

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात

१ फेब्रुवारीला सादर होणार अर्थसंकल्प गुरुवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आर्थिक सर्वेक्षण सादर

‘मदर ऑफ ऑल डील’वर स्वाक्षरी

भारत व युरोपियन युनियनमध्ये मुक्त व्यापार कराराची अधिकृत घोषणा नवी दिल्ली : भारत आणि युरोपियन युनियनमध्ये

Jammu And Kashmir : जम्मू-श्रीनगर महामार्गावर बस आणि ट्रकची भीषण धडक; CRPF जवानांसह चौघांचा मृत्यू, अनेक जखमी

जम्मू-काश्मीर : जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी काळाने भीषण घाला घातला. उधमपूर जिल्ह्यात एक

जम्मू काश्मीर : बर्फवृष्टीमुळे श्रीनगर विमानतळावरील सर्व विमानसेवा रद्द

श्रीनगर विमानतळावरील येणारी - जाणारी सर्व उड्डाणे सततच्या बर्फवृष्टीमुळे आणि खराब हवामानामुळे रद्द करण्यात