सूर्य मंदिराच्या गर्भगृहातील वाळू १२० वर्षांनी बाहेर काढणार

भुवनेश्वर  : ओडिशातील प्रसिद्ध कोणार्क सूर्य मंदिराच्या गर्भगृहातील वाळू बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने (एएसआय) हाती घेतलेल्या या कामामुळे १२० वर्षांहून अधिक काळानंतर प्रथमच गर्भगृहातून वाळू काढली जाणार आहे.


मंदिर कोसळण्याचा धोका असल्याने त्याला आधार देण्यासाठी ब्रिटिश अभियंत्यांनी १९०३ मध्ये तेथे वाळू भरली होती. या घटनेनंतर १२० वर्षांनंतर गर्भगृहातील वाळू काढण्याचा निर्णय ‘एआयएस’ने घेतल्याने इतकी वर्षे बंद असलेल्या त्या कक्षात प्रवेश करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. गर्भगृहाच्या आतील वाळूच्या थरापर्यंत ड्रिलिंग सुरू झाले असल्याचे तेथे उपस्थित अधिकाऱ्याने सांगितले. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार गर्भगृहात दाबून बसलेल्या वाळूच्या थरापर्यंत ड्रिलिंग सुरू झाले आहे. प्राथमिक मोजमापांनुसार गर्भगृहाची भिंत सुमारे आठ मीटर जाड आहे. सूर्य मंदिराची एकूण उंची सुमारे १२७ फूट आहे. पश्चिमेकडे जमिनीपासून सुमारे ८० फूट उंचीवर प्रवेशद्वार तयार करण्यात आले आहे.


आतापर्यंत काढण्यात आलेल्या साहित्यामध्ये वाळू आणि दगडाचे तुकडे आहेत. हे सर्व नमुने आता वैज्ञानिक विश्लेषणासाठी गोळा करण्यात येत आहेत. ‘एएसआय’च्या प्रारंभिक अहवालांनुसार वाळूने भरलेल्या कक्षात आद्रता आहे. यामुळेच आतल्या भागाची झीज होण्याची किंवा त्याचा नाश होण्याची शक्यता होती.


गर्भगृहातील माती काढताना मंदिराची हानी होऊ नये, यासाठी दहा सदस्यांच्या तज्ज्ञ पथकाकडून डायमंड-ड्रिल तंत्रज्ञान आणि कंपनविरहित यंत्रणा यांचा वापर करून खोलवर ड्रिलिंग केले जात आहे. मंदिराच्या नाजूक खोंडालाइट दगडांच्या रचनेला कोणताही धक्का बसू नये यासाठी सुरक्षेचे उपाय केले जात आहेत.


ड्रिलिंगचे ठिकाण ‘जगमोहन’ (सभा मंडप)च्या पश्चिमेकडील भागात, पहिल्या आणि दुसऱ्या स्तरादरम्यान निश्चित केलेले आहे. तेथून पुढे वाळू बाहेर काढण्यासाठी नियोजित बोगद्याची उभारणी केली जाणार आहे.

Comments
Add Comment

उबाठाने ५ टर्ममधील सव्वालाख कोटींचा हिशेब मुंबईकरांना द्यावा

मंत्री आशिष शेलार यांचे आव्हान; मुंबईत विकासकामांच्या उद्घाटनांचा धडाका मुंबई : मुंबई महापालिकेत गेल्या पाच

कुंभमेळ्यासाठी झटपट पटापट भटजी व्हा फटाफट

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कौशल्य विकास विभागाकडून पूजाविधी आणि पौराहित्य शॉर्ट टर्म कोर्सला

महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा; ठाण्यात भारतातील सर्वांत उंच व्हिवींग टॉवर, स्नो पार्क उभारणार

मुंबई : मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स आणि कोस्टल रोडची मोकळी जागा मिळून एकूण २९५ एकरवर जागतिक दर्जाचे सेंट्रल

महसूल विभागाचे ३ महत्वाचे निर्णय, शेतकऱ्यांना होणार फायदा; चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

मुंबई : महसूल विभागाने शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी दिलासादायक असे तीन महत्त्वाचे निर्णय घेतले असून

सोन्याचा 'कहर' एक दिवसात सोने १४७० रूपये प्रति ग्रॅममागे वाढले १३५००० पातळी पार 'या' जागतिक संकेतामुळे आता पुढे काय? वाचा

मोहित सोमण:सलग दुसऱ्यांदा सोन्याने प्रचंड मोठी उसळी घेतली आहे. मोठ्या प्रमाणातील अस्थिरतेचा फटका सोन्यातील

अखेर प्रतीक्षा संपली! मुंबई, पुणे, नागपूरसह २९ शहरांत 'इलेक्शन'चा धुराळा; निकाल कधी ? वाचा सविस्तर

मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या आणि राज्याच्या राजकारणाचे लक्ष वेधून घेतलेल्या राज्यातील २९