नागपूरला मिळणार आधुनिक मासळी बाजार- मुख्यमंत्र्यांनी मानले मंत्री नितेश राणेंचे आभार; नाथूबाबा यांचे नाव देण्याबाबत सकारात्मक विचार

नागपूर : "प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत नागपूर शहरात आधुनिक मासळी बाजार केंद्र उभारले जाणार आहे. आमचे नेते नितीन गडकरी नेहमी म्हणतात, की आमच्या शहरात मच्छीमार्केट, मटन मार्केट हे आधुनिक असायला हवेत. कारण, या व्यवस्था चांगल्या नसल्या, तर लोकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो. मी मंत्री नितेश राणे यांचे आभार मानेन, की त्यांच्या विभागाने नागपूर शहरासाठी आधुनिक मासळी बाजार तयार करण्याचा निर्णय घेतला आहे", असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.


परमवीरचक्र विजेत्या सैनिकांना समर्पित 'वंदे मातरम् उद्याना'चे लोकार्पण शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत नागपूर शहरात उभारल्या जाणाऱ्या आधुनिक (घाऊक आणि किरकोळ) मासळी बाजार केंद्राचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाइन माध्यमातून करण्यात आले. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे, आमदार प्रवीण दटके यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. या आधुनिक मासळी बाजाराचे काम जेव्हा पूर्ण होईल, तेव्हा तेव्हा विक्रेते आणि ग्राहकांना त्याचा मोठा फायदा होईल. या मार्केटला नाथूबाबा यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी आहे. त्याबाबत लवकरच निर्णय करू, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.




प्रकल्पाची वैशिष्ट्ये काय?


- हा आधुनिक मासळी बाजार ५ एकर क्षेत्रावर विकसित होईल. यात ३.६ × ४ मीटर आकाराचे एकूण ६० घाऊक व किरकोळ विक्री गाळे, दुचाकी-चारचाकी वाहनांसाठी पुरेसे पार्किंग, प्रशासकीय ब्लॉक आणि उपहारगृह, ७ टन क्षमतेचे कोल्ड स्टोरेज, १२ ते १५ मीटर रुंद कॉंक्रिट रस्ते, वीज-पाणी पुरवठा, तसेच स्वतंत्र पुरुष-महिला प्रसाधनगृहे अशा मूलभूत सुविधा असतील. हा प्रकल्प शहरातील मासळी विक्रेत्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार असून, रस्त्यांवरील अस्वच्छता आणि अनियोजित मत्स्यविक्रीच्या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा मिळणार आहे.


- केंद्र व राज्य सरकारच्या संयुक्त पुरस्कृत योजनेतून हा प्रकल्प राबविला जात आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, एकूण २१.०५५८ कोटी इतका खर्च अपेक्षित आहे. यात केंद्राचा वाटा ८.९६५४ कोटी, राज्याचा ५.९७६९ कोटी आणि नागपूर महानगरपालिकेचा ६.११३५ कोटी रुपये आहे. पर्यावरणपूरक बाबींनाही यात प्राधान्य देण्यात आले आहे.


- यात २० केएलडी क्षमतेचा सिव्हेज ट्रीटमेंट प्लँट, ३० केएलडीचा एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लँट, कचरा व्यवस्थापनासाठी रेंडरिंग प्लँट, पर्जन्यजल संचयन, अग्निशामक यंत्रणा, सौर ऊर्जा, सीसीटीव्ही आणि कंपाउंड वॉल यांचा समावेश आहे. या सुविधांमुळे बाजार स्वच्छ, सुरक्षित व टिकाऊ बनेल.



फायदा काय होणार?


सध्या नागपूरमध्ये मासळी विक्री मुख्यतः रस्त्यावर किंवा असंघटित पद्धतीने होते. त्यामुळे स्वच्छता आणि वाहतूक समस्या उद्भवतात. भाडेवाडी येथील हा आधुनिक बाजार विशेषतः पूर्व आणि दक्षिण नागपूरातील विक्रेत्यांसाठी उपयुक्त ठरेल. १० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर शहराला पहिला पूर्ण सुसज्ज मासळी बाजार मिळणार असल्याने विक्रेते व ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Comments
Add Comment

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय