अवघ्या २० मिनिटांत अब्जाधीश झाला, असं काय घडलं त्या भारतीय माणसासोबत ?

नवी दिल्ली : प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आलेला आनंदाचा क्षण कधी दुःखात आणि संकटात बदलेल हे सांगता येत नाही . एका पुरुषासोबत असंच झालं आहे. एक ३६ वर्षांचा पुरुष नेहमीप्रमाणे सकाळी उठला आणि दिवसाची सुरुवात करू लागला. घरातलं अन्न संपलंय त्यामुळे खाण्यासाठी काहीतरी विकत आणा असे पत्नीने त्याला सांगितले. यावर पतीने उत्तर दिले की, आठवडा झाला माझ्याकडे काम नाही... खिशात पैसा नाही...


यावर पत्नीने त्याला उत्तर दिले की, “ सीएसपी सेंटरमध्ये जा आणि तुमचं अकाउंट चेक करा . त्यात काही पैसे असतील. ते काढून रेशन घेऊन या .” पत्नीने सांगितल्याप्रमाणे पती बँकेत गेला. बँकेत जाऊन त्याने तिथल्या स्टाफला खात्यात किती शिल्लक आहे ते विचारले. पुढे म्हणाला... ५०० असतील तर २०० द्या. बँक कर्मचाऱ्याने तपासले तर संबंधित व्यक्तीच्या खात्यात ६०० कोटी रुपये जमा होते. हे पाहताच बँक कर्मचाऱ्याला धक्काच बसला, तो व्यक्ती सुद्धा हैराण झाला .


ही घटना बिहारमधील बक्सर जिल्ह्यातील राजपूर या गावात घडली आहे आणि पुरुषाचं नाव जितेंद्र साह असं आहे. खात्यात ६०० कोटी आहेत हे कळल्यानंतर जितेंद्र बँक कर्मचाऱ्याला म्हणाला, ‘साहेब 200 रुपये तरी द्या..’ यावर सीएसपी सेंटरचा कर्मचारी म्हणाला, ” जर मी तुला एक रुपयाही दिला तर माझी नोकरी जाईल. तुझ्यावर कारवाई होऊ शकते. आम्हाला याबद्दल पोलिसांना कळवावं लागेल.” त्यानंतर पुढच्या २० मिनिटांत त्याचं खातं फ्रिझ केलं जातं.


बँक मॅनेजर आणि पोलिसांनी याला तांत्रिक बिघाड असल्याचं म्हंटलं आहे आणि त्यावर तपास चालू आहे . गुन्हा उघडकीस येईपर्यंत त्यांना त्रास दिला जाणार नाही असे आश्वासन पोलिसांनी कुटुंबाला दिले आहे, पोलिसांचा या प्रकरणी तपास सुरु आहे.

Comments
Add Comment

संजय गांधी.. माधवराव सिंधिया ते अजितदादा; विमान अपघातात देशाने मोठे नेते गमविले

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामतीत विमान अपघातात मृत्यू झाला. लँडिंग करताना

भारतीय उद्योगांसाठी युरोपीयन बाजारपेठ

९० टक्के वस्तूंवर शुल्क माफ करारामुळे दोन्ही देशांच्या आर्थिक संबंधांना बळ नवी दिल्ली : भारत आणि युरोपीयन

भारताला नुकसान पोहोचवणे, हाच पाकिस्तानचा अजेंडा

नवी दिल्ली : भारताने संयुक्त राष्ट्र परिषदेत पाकिस्तानवर जोरदार हल्ला चढवला आहे. ‘पाकिस्तानने नेहमीच विनाकारण

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात

१ फेब्रुवारीला सादर होणार अर्थसंकल्प गुरुवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आर्थिक सर्वेक्षण सादर

‘मदर ऑफ ऑल डील’वर स्वाक्षरी

भारत व युरोपियन युनियनमध्ये मुक्त व्यापार कराराची अधिकृत घोषणा नवी दिल्ली : भारत आणि युरोपियन युनियनमध्ये

Jammu And Kashmir : जम्मू-श्रीनगर महामार्गावर बस आणि ट्रकची भीषण धडक; CRPF जवानांसह चौघांचा मृत्यू, अनेक जखमी

जम्मू-काश्मीर : जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी काळाने भीषण घाला घातला. उधमपूर जिल्ह्यात एक