हे घ्या…. ट्रम्प यांच्या घोषणेनंतर लगेच तांदूळ निर्यात कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त ७% घसरण

मोहित सोमण: डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोषणेनंतर तांदूळ उत्पादक कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. एलटी फूडस, जीआरएम ओव्हरसीज, एडब्लूएल अँग्री बिझनेस, केआरबीएल यांसारख्या शेअर्समध्ये आज घसरण झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी डंपिंग विरोधात कार्यवाही करत भारत व इतर देशातील तांदूळ निर्यातदारांवर अतिरिक्त शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतल्याने त्याचा फटका आज भारतीय तांदूळ कंपनीच्या शेअर्समध्ये जाणवला. युएस मधील शेतकरी फेडरेशन व शेतकी उत्पादक व तज्ञांचे शिष्टमंडळाने डोनाल्ड ट्रम्प यांना व्हाईटहाऊसमध्ये भेटल्यानंतर युएस शेतकऱ्यांच्या उत्पादनात नुकसान टाळण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. भारत व व्हिएतनाम कॅनडा या देशातील तांदूळ युएस पेक्षा स्वस्त स्पर्धात्मक दरात उपलब्ध असल्याने मोठ्या प्रमाणात युएस बाजाराचे नुकसान झाले असा दावा ट्रम्प यांनी केला ज्याचा फटका राईस शेअर्समध्ये वाढलेल्या 'सेल ऑफ' मुळे होत आहे.


सकाळच्या सत्रात एलटी फूडस ३.४८% घसरत ३७९.८० रूपये प्रति शेअरवर व्यवहार करत असून उर्वरित जीआरएम ओव्हरसीज (१.५४%), एडब्लूएल अँग्री बिझनेस (०.८४%) सारख्या शेअर्समध्ये घसरण सुरू आहे. सकाळच्या सत्रात सुरुवातीला शेअर ७% कोसळले होते. खरं तर अलीकडच्या पार पडलेल्या विश्लेषणात्मक बैठकीत एलटी फूड्सने (एलटीएफओ) त्यांच्या मध्यम मुदतीचा आशावादी अंदाज व्यक्त केला होता. तसेच उत्पादनातील निर्यातीत सापेक्षता दर्शविली होती ज्यामध्ये मुख्य आणि उदयोन्मुख उत्पादन विभागांमध्ये मजबूत वाढीची अपेक्षा केली गेली असे असले तरी कंपनीने जागतिक स्तरावर आपला ठसा वाढविण्यासाठी या प्रादेशिक तांदळाच्या प्रकारांना अमेरिकन बाजारपेठेत सादर करण्याची योजना आखली असतानाच आता वाढत्या अतिरिक्त करामुळे तांदूळ निर्यातांना मोठ्या प्रमाणात नुकसानास सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळेच संभाव्य शुल्क आकारणीचा या योजनांवर परिणाम होऊ शकतो ज्या कारणाने आज बाजारात तांदूळाचे शेअर सेल ऑफ वाढल्याने मोठ्या पातळीवर घसरले आहेत.

Comments
Add Comment

राज्यात ठिकठिकाणी महापौर पदासाठी रस्सीखेच

प्रमुख महापालिकांत सत्तास्थापनेचे गणित बनले गुंतागुंतीचे ठाण्यात ‘अडीच वर्षां’वरून तणाव कोल्हापूर, अकोला,

विदेशी गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र भारताचे गेट वे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्याच्या सर्व भागासाठी, वैविध्यपूर्ण क्षेत्रात गुंतवणूक येणार दावोसमध्ये महाराष्ट्र पॅव्हेलियन सज्ज,

राजपत्रात नावे घोषित न झाल्याने कोकण भवनातील नगरसेवकांची नोंदणीच लांबली

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईचा महापौर कोण होणार आणि कधी होणार याची चर्चा रंगली असली तरी प्रत्यक्षात अद्यापही

नोबेल मिळत नाही म्हणून संतापले ट्रम्प, केली धक्कादायक कृती

वॉशिंग्टन डीसी : जागतिक महाशक्ती अशी ओळख मिरवणाऱ्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं वागणं दिवसागणिक

नितीन नवीन होणार भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष

नवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आणि बिहारचे माजी आरोग्यमंत्री नितीन नवीन यांची भाजपच्या

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी भाजपचे चिपळूणमधील उमेदवार जाहीर

जि.प.साठी तीन, तर पं.स. साठी सात उमेदवार निवडणूक रिंगणात भाजपचे नेते माजी आमदार डॉ. विनय नातू, भाजपचे नेते प्रशांत