रस्त्यांच्या कडेसह मोकळ्या जागांवर वृक्षरोपणावर अधिक भर

बांबूची झाडे अधिक प्रमाणात लावली जाणार


महापालिका बनवणार बांबूच्या झाडांची नर्सरी


मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्यावतीने आता वायू प्रदूषण नियंत्रणासाठी तसेच पर्यावरणदृष्ट्या परिसर हरित राखण्यासाठी रस्त्याच्या कडेसह मोकळ्या जागांमध्ये बांबूची झाडे लावली जाणार आहे. मोकळ्या जागांवर अतिक्रमण होवू नये यासाठी बांबूची झाडे लावणे योग्य ठरणार असून ही बांबूची झाडे केव्हा कापता येत असल्याने अशाप्रकारची झाडे लावण्यावर भर दिला जाणार आहे. यासाठी महापालिकेच्यावतीने बांबूच्या झाडांची नर्सरी तयार केली जाणार असल्याचे महापालिका प्रशासनाच्यावतीने अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ अविनाश ढाकणे यांनी सुतोवाच केले आहे.


मुंबईतील पूर्व उपनगरातील रस्त्याच्या कडेला बांबू लावण्याचा प्रकल्प बारगळला असला तरी भविष्यात रस्त्याच्या कडेला झाडे लावण्यात आल्यानंतर कापण्यात येणारे निर्बंध लक्षात घेता बांबूची झाडे लावण्याचा विचार असल्याचे डॉ ढाकणे यांनी स्पष्ट केले. मुंबईतील अनेक मोकळ्या जागा तसेच रस्त्याच्या कडेला आता बांबूची झाडे लावण्याचा विचार आहे. त्यादृष्टीकोनातून आढावा घेतला जात आहे. मोकळ्या झाडांवर झाडे लावण्याऐवजी बांबू लावल्यास त्याची वाढ जलदगतीने होते, तसेच त्यामुळे पर्यावरणपुरक वातावरण तयार होते, शिवाय हे बांबू कधीही कापून जागा मोकळी करून देता येतात. यासाठी कोणत्याही प्रकारच्या परवानगी लागत नाही. त्यामुळे भविष्यात काही मोकळे भूखंड असल्यास तिथेही बांबू लावले जातील असे डॉ ढाकणे यांनी स्पष्ट केले.





कमी जागेमध्ये जास्त बांबू लागत असल्याने तसेच ते टिकावू असल्याने बांबूची झाडे लावण्यावर भर दिला जाईल. यासाठीच्या जागा निश्चित करण्याच्या सूचना उद्यान विभागाला दिल्या असल्याचेही त्यांनी सांगितले. बांबू केव्हाही काढून टाकता येत असल्याने याची झाडे लावणे सहज सोपे आहे, ज्यामुळे पर्यावरणाचे संतुलनही राखण्यास मदत होईल,असेही त्यांनी स्पष्ट केले. या बांबूसोबतच काही रस्त्याच्या कडेला आणि मोकळ्या जागांवर झाडे लावण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे. त्यासाठीच्या सूचना संबंधित विभागाला दिल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

Comments
Add Comment

महालक्ष्‍मी येथील उड्डाणपुलाचे काम ५५ टक्के पूर्ण

अतिरिक्‍त आयुक्‍त (प्रकल्‍प) अभिजीत बांगर यांच्‍याकडून स्‍थळ पाहणी मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महालक्ष्‍मी

महानगरपालिकेच्‍या शालेय विद्यार्थ्यांना नौकानयन क्रीडा प्रशिक्षण

मुंबई( विशेष प्रतिनिधी) : जपानमधील नागोया येथे होणाऱ्या २०२६ आशियाई क्रीडा स्पर्धांच्या पार्श्वभूमीवर भारतातील

महापौरपदासाठी भाजपमधील केरकर,शिरवडकर,कोळी, सातम, गंभीर, तावडे यांच्या नावाची चर्चा

मुंबई : मुंबईच्या महापौर पदासाठी सर्वसाधारण महिला प्रवर्ग करता आरक्षित झाला आहे. मुंबई महापालिकेत भाजपा शिवसेना

मुंबई महापालिकेत भाजप शिवसेनेचा एकच गट?

स्वीकृत नगरसेवकांसह समित्यांमधील बदलणार समिकरणे मुंबई : मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीमध्ये

राज्यातील 'त्रिभाषा सूत्रा'साठी समितीला मुदतवाढ

मुंबई: राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अनुषंगाने राज्यातील शाळांमध्ये 'त्रिभाषा धोरण' निश्चित करण्यासाठी

प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळांमध्ये देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत -शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

मुंबई - भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त येत्या 26 जानेवारी रोजी राज्यातील सर्व माध्यमाच्या, सर्व