ठाण्यात ११ डिसेंबरपर्यंत दररोज ३० टक्के पाणीकपात

पाइपलाइन फुटल्याने पुरवठा विस्कळीत


ठाणे : कळवा फाटा परिसरात महानगर गॅस कंपनीकडून सुरू असलेल्या कामादरम्यान आठवड्याच्या शेवटी शहराला पाणीपुरवठा करणारी १ हजार मिमी व्यासाची मुख्य जलवाहिनी फुटल्याने ठाणे महापालिकेने शहरात ११ डिसेंबरपर्यंत दररोज ३० टक्के पाणी कपातीची अंमलबजावणी केली आहे. ही जलवाहिनी पीसे धरणातून टेमघर जलशुद्धीकरण केंद्राकडे पाणी नेते. शनिवारी सकाळी ही गंभीर घटना घडली. पालिका अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, साधारण दोन दिवस दुरुस्तीचे काम सुरू ठेवूनही जलवाहिनी जुनी व प्री-स्ट्रेस्ड काँक्रीटची असल्याने पूर्ण दुरुस्तीला आणखी ३ दिवस लागण्याची शक्यता आहे.


पाणीपुरवठा मोठ्या प्रमाणात घटल्याने महापालिकेने ११ डिसेंबरपर्यंत झोननिहाय पुरवठा प्रणाली लागू केली आहे, ज्यामुळे सर्व प्रभागांना तुलनेने समसमान पाणी मिळू शकेल. नागरिकांना कमी दाबाने व अनियमित वेळेत पाणी येण्याची शक्यता असल्याचेही कळवण्यात आले आहे. तसेच, नियमित पुरवठा पूर्ववत होईपर्यंत पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन प्रशासनाने नागरिकांना केले आहे. ठाणे महापालिका सुमारे २५ लाख लोकसंख्येसाठी विविध स्रोतांमधून दररोज ५९० एमएलडी पाणी उपसा करते. मात्र, पाइपलाइन नेटवर्कमधील गळती आणि कथित चोरीमुळे प्रत्यक्ष उपलब्धता ही अपेक्षेपेक्षा कमी पडत असल्याचीही माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

Comments
Add Comment

ठाणे घोडबंदर रोडवर आज वाहतूक कोंडीची शक्यता

दुरुस्तीच्या कामांमुळे जड वाहनांना प्रवेशबंदी ठाणे : ठाण्याचा घोडबंदर रोडवर उद्या (ता. ७) मोठ्या प्रमाणात वाहतूक

डोंबिवलीत १०७ तितर पक्ष्यांचा मृत्यू

डोंबिवली : डोंबिवली पूर्व येथील मोठगाव–ठाकुर्ली सातपुल परिसरात आज अचानक १०७ तितर पक्षी मृतावस्थेत आढळले आहेत.

भिवंडी-निजामपूर पालिका आणि एमसीईडी यांच्यात सामंजस्य करार

भिवंडी : भिवंडी निजामपूर शहर पालिका आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) यांच्यात शहरातील महिलांसाठी

भाईंदरमध्ये मराठी माणसाला घर देण्यास नकार !

बिल्डर लॉबीची अजब वागणूक भाईंदर : मराठी विरुद्ध अमराठी वादाचे भाईंदरमध्ये पडसाद उमटले आहेत. भाईंदरमध्ये एका

कल्याण - डोंबिवलीतील विकासकामांसाठी निधी उपलब्ध

डोंबिवली: कल्याण-डोंबिवलीतील कामांना गती देण्यासाठी राज्य नगर विकास विभागाच्या माध्यमातून तब्बल १६ कोटी

MCCL : डोंबिवलीत क्रिकेटचा महाधमाका!

डोंबिवली - डोंबिवली जिमखाना ग्राउंडवर यंदा क्रिकेट आणि ग्लॅमरचा अनोखा संगम पाहायला मिळणार आहे. मराठी मनोरंजन