सकाळच्या सत्रात शेअर बाजारात मार्केट करेक्शन! आयटीमुळे आणखी गडगडण्यापासून वाचला पण‌.... सेन्सेक्स ८४ व निफ्टी २९.३० अंकाने घसरला

मोहित सोमण: सकाळी इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात किरकोळ घसरण होताना दिसत आहे. प्रामुख्याने शेअर बाजारातील ही घसरण जगभरातल्या शेअर बाजारातील प्राईज करेक्शन चिन्हांकित करत आहे. युएस बाजारातील बॅक टू बॅक वाढीनंतर घसरणीकडे कौल सुरु झाल्यानं आशियाई बाजारासह भारतीय शेअर बाजारात आज सपाट अथवा किरकोळ घसरणीकडे कल दिसत आहे. सत्राच्या सुरुवातीला सेन्सेक्स सेन्सेक्स ८४ व निफ्टी २९.३० अंकांने घसरला आहे. सेन्सेक्स व निफ्टी बँक निर्देशांकातही बाजार घसरणीकडेच लोटला गेल्याने बाजाराला आधारपातळी मिळू शकली नाही. सुरूवातीच्या कलात आयटी (०.३३%), मिडिया (०.३५%) वगळता इतर निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात घसरण झाली असून सर्वाधिक घसरण रिअल्टी (०.७२%), पीएसयु बँक (०.६१%),ऑटो (०.३२%), मिड स्मॉल हेल्थकेअर (०.४८%) निर्देशांकात सर्वाधिक घसरण झाली आहे. निफ्टी व्यापक निर्देशांकात स्मॉलकॅप ५० (०.४४%),स्मॉलकॅप २५० (०.४४%), मायक्रोकॅप २५० (०.५१%) निर्देशांकात सर्वाधिक घसरण झाली आहे. आज विशेष उल्लेख म्हणजे अस्थिरता निर्देशांक (VIX Volatility Index) हा ४.०२% उसळला.


अनपेक्षितपणे घसरलेल्या पीसीई (Personal Consumption Expenditure) आकडेवारीमुळे शुक्रवारी युएस बाजारात रॅली झाली ज्यामुळे दरकपातीची आशा लागली होती. त्यानंतर मात्र या आठवड्यात येणाऱ्या फेडरल बैठकीकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागल्याने या आठवड्यात निकालापर्यंत अस्थिरता कायम राहू शकते. सुरूवातीच्या कलात आशियाई बाजारात संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. आज ब्लू चिप्स शेअर्ससह मिड व स्मॉल कॅप शेअर्समध्ये घसरण कायम राहिल्याने घसरणीकडे भारतीय बाजाराला कल दिसतो. किंबहुना आयटी शेअर्समध्ये झालेल्या वाढीमुळे थोडा दिलासा गुंतवणूकदारांना मिळत आहे. परदेशी गुंतवणूकदारांनी वाढवलेल्या रोख विक्रीचा परिणाम आज बाजारात कायम राहतो का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


सकाळच्या सत्रात सर्वाधिक वाढ एल अँड टी टेक्नॉलॉजी (३.९१%), सेंच्युरी फ्लायबोर्ड (२.८१%),असाही इंडियन ग्लास (२.१३%), एआयए इंजिनिअरिंग (२.१२%), आवास फायनांशियल (२.००%) समभागात झाली असून सर्वाधिक घसरण रिलायन्स पॉवर (४.३३%), इंटरग्लोब एव्हिऐशन (३.७२%), होनसा कंज्यूमर (३.१२%), एबी रिअल इस्टेट (२.८५%), डेटा पँटर्न (२.७४%), गोदरेज प्रोपर्टी (१.८२%), हिरो मोटोकॉर्प (१.८०%), सम्मान कॅपिटल (१.७७%) समभागात झाली आहे.


बाजारपूर्व परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक रणनितीकार डॉ वी के विजयाकुमार म्हणाले आहेत की,' येत्या काळात बाजारात अस्थिरता येण्याची शक्यता आहे. मजबूत आर्थिक वाढ आणि उत्पन्न वाढीचे संकेत बाजारपेठेला आधार देत आहेत. या वर्षी अर्थव्यवस्थेला मिळालेल्या मोठ्या प्रमाणात राजकोषीय आणि आर्थिक प्रोत्साहनामुळे जीडीपी वाढीमध्ये तीव्र पुनरुज्जीवन झाले आहे, जे दुसऱ्या तिमाहीतील ८.२% जीडीपी वाढीच्या छाप्यातून दिसून येते आणि आरबीआयने आर्थिक वर्ष २६ च्या जीडीपी वाढीचा ७.३% पर्यंतचा आढावा घेतल्याने बाजारासाठी चांगले संकेत मिळतात. कमी चलनवाढीमुळे कमी जीडीपी डिफ्लेटरने नाममात्र जीडीपी वाढ आणि कॉर्पोरेट उत्पन्न वाढीवर परिणाम केला आहे. परंतु प्रमुख निर्देशकांवरून हे स्पष्ट होते की आर्थिक वर्ष २७ मध्ये सुमारे १५% उत्पन्न वाढ साध्य करता येईल. हे बाजारासाठी सकारात्मक आहे. तथापि, काही मजबूत नकारात्मक बाबी देखील आहेत ज्यांचा बाजारावर परिणाम होऊ शकतो. रुपयाचे सततचे अवमूल्यन एफआयआयना बाजारात सतत विक्री करण्यास भाग पाडत आहे. आणखी एक प्रमुख घटक म्हणजे जपानी बाँड उत्पन्नातील वाढ, ज्यामुळे येन कॅरी ट्रेडमध्ये पुन्हा एकदा उलटफेर होऊ शकतो. थोडक्यात, उच्च अस्थिरतेची शक्यता आहे.'

Comments
Add Comment

वंदे मातरमला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने लोकसभेत चर्चा

नवी दिल्ली : भारताचे राष्ट्रीय गीत असलेल्या वंदे मातरमच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त संसदेत एक विशेष चर्चा

यावर्षीचा शेवटचा पोको C85 5G उद्या भारतात लाँच होणार

मुंबई: लोकप्रिय ब्रँड पोकोने पोको सी८५ ५जी च्‍या लाँचची घोषणा केली असून उद्यापासून हा स्मार्टफोन बाजारात दाखल

भारतात २६५ दशलक्ष सायबर हल्ल्यांची नोंद

मुंबई: क्विक हील टेक्‍नॉलॉजीज लिमिटेडची उद्योग शाखा सेक्‍यूराइटने इंडिया सायबर थ्रेट रिपोर्ट २०२६ प्रकाशित

गोवा पब आग दुर्घटना; २५ जणांची ओळख पटली

पणजी : गोव्याच्या अर्पोरा परिसरातील Birch by Romeo Lane या पबमध्ये रविवारी मध्यरात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास भीषण आग

Pune Press Club : पुणे प्रेस क्लबसाठी सेनापती बापट मार्गावर प्रशस्त जागा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय!

* महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुढाकार * आठ हजार चौ.फुटावर सुसज्ज इमारत उभारणार नागपूर : पुणे पत्रकार

मिलिंद साठे राज्याचे नवे महाधिवक्ता, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

नागपूर : राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांच्या राजीनाम्यानंतर नवे महाधिवक्ता म्हणून मिलिंद साठे यांच्या