मोहित सोमण: थोड्याच वेळात आरबीआयच्या रेपो दराबाबत आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा वित्तीय पतधोरण समितीची निकाल जाहीर करतील. तीन दिवसीय बैठकीची इतिश्री आज झाल्याने अखेर रेपो दरात २५ बेसिस पूर्णांकाने कपात होईल का व्याजदर स्थिर राहील याची प्रचिती सकाळी १० वाजता येईलच तत्पूर्वी सावधगिरीचा पवित्रा बाळगल्याने इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळच्या सत्रात उघडल्यावरच बाजारात सावधगिरीचे संकेत मिळाले आहेत. सेन्सेक्स २४ अंकाने व निफ्टी २ अंकाने घसरला आहे. सकाळी विशेषतः गुंतवणूकदारांचे लक्ष बँक निर्देशांकात केंद्रित झालेले असून सुरूवातीच्या कलात सेन्सेक्स बँक मात्र २२.४५ अंकाने व २२.२५ अंकाने उसळला आहे. आज रेपो व्याजदरात कपात सर्वसामान्यांसाठी कर्जाचे व्याजदर स्वस्त होऊ शकतात. बहुतांश तज्ञांच्या मते बाजारात रेपो व्याजदर स्थिर राहू शकतात कारण रेपो दरपूर्व दुसऱ्या तिमाहीतील अनपेक्षितपणे वाढलेली ८.२% जीडीपी वाढ व दुसरीकडे महागाईत झालेली लक्षणीय घसरण पाहता व २२ सप्टेंबरपासूश लागू झालेली जीएसटी कपात पाहता बाजारात तरलता कायम असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे महागाई ४% पातळी खाली असल्याने हे दर कायम राहू शकतात. तज्ञांच्या मते आरबीआय अधिक लक्ष घसरणाऱ्या रूपयांकडे देऊन जीडीपी वाढीबरोबर महागाई नियंत्रण व अर्थव्यवस्था अधिक लवचिक होण्यासाठी प्रयत्न करेल. खरं तर मागील वित्तीय पतधोरण समितीच्या बैठकीदरम्यान मल्होत्रा यांनी आगामी सत्रात दरकपातीला 'वाव' असल्याचे संकेत दिले होते. काही तज्ञांच्या मते ही दरकपात होणार असून २५ बेसिसने कमी करून ५.५०% वरून ५.२५% वर रेपो दर येऊ शकतो.
फेब्रुवारी महिन्यपासून तीन बैठकीतील १०० बीपीएसने कपात आरबीआयने केली आहे. मात्र गेल्या पतधोरण बैठकीत आरबीआयने व्याजदर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला होता. जेव्हा धोरणाची भूमिका 'तटस्थ' ठेवण्यात आली होती.
शेअर बाजारात गेल्या तीन दिवसात मोठ्या प्रमाणात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक काढून घेतली. वित्तीय तूटीतही भर पडल्याने रूपयांच्या स्थिरीकरणाला फटका बसल्याने रूपयाने ९० रूपये प्रति डॉलर पातळी गाठली होती. आज रेपो दरात कपातीकडे गुंतवणूकदारांचे लक्ष असणार असून याशिवाय आयटी, टेलिकॉम, फार्मा, मेटल, रिअल्टी या क्षेत्रातील निर्देशांकांनाही महत्व प्राप्त होऊ शकते.
ऑक्टोबरच्या धोरणात, एमपीसीने रेपो दर ५.५०% वर अपरिवर्तित ठेवला आणि धोरणात्मक भूमिका 'तटस्थ' ठेवली. आरबीआयने आर्थिक वर्ष २०२६ च्या जीडीपी वाढीचा अंदाज पूर्वीच्या ६.५% वरून ६.८% पर्यंत वाढवला आणि आर्थिक वर्ष २०२६ च्या सीपीआय चलनवाढीचा अंदाज पूर्वीच्या ३.१% वरून २.६% पर्यंत कमी केला.
सकाळच्या सत्रातील सुरुवातीला सर्वाधिक वाढ एससीआय (२.६७%), दीपक नायट्रेट (२.३६%), झेन टेक्नॉलॉजी (२.१५%), हिमाद्री स्पेशल (२.०४%) समभागात झाली असून सर्वाधिक घसरण कँमस सर्विसेस (८०.४४%), काईन्स टेक (६.६२%), सफायर फूडस (३.६५%), इंडिया सिमेंट (३.३४%) समभागात झाली आहे.