भिवंडी-निजामपूर पालिका आणि एमसीईडी यांच्यात सामंजस्य करार

भिवंडी : भिवंडी निजामपूर शहर पालिका आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) यांच्यात शहरातील महिलांसाठी कौशल्य विकास, लघुउद्योजकता प्रोत्साहन, डिजिटल सक्षमीकरण आणि स्थानिक रोजगार निर्मिती या उद्देशाने नुकताच एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार पालिका मुख्यालयात करण्यात आला. हा करार महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त अनमोल सागर आणि एमसीईडीचे कार्यकारी संचालक विक्रांत बगाडे यांच्या उपस्थितीत स्वाक्षरीत झाला. या उपक्रमांतर्गत शहरातील आर्थिकदृष्ट्या गरजू, उद्योजकतेची इच्छा असलेल्या आणि प्रगतिशील महिलांसाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. प्रारंभी २१ वर्षे वयावरील ५०० महिलांना प्रशिक्षण देण्याचे नियोजन आहे. प्रशिक्षणानंतर व्यवसाय सुरू करण्यासाठी मार्गदर्शनही दिले जाणार आहे. या कार्यक्रमाच्या वेळी अतिरिक्त आयुक्त नयना ससाणे, उपायुक्त (समाजकल्याण)विक्रम दराडे, महिला व बाल विकास विभाग प्रमुख मिलिंद पळसुळे तसेच एमसीईडीचे विभाग प्रमुख - समन्वय प्रदीप इंगळे उपस्थित होते.


पालिकेच्या महिला कल्याण विभागांतर्गत खालील गटांतील महिलांना प्रशिक्षणाची संधी :




  1. वंचित व अल्पसंख्याक समुदायातील महिला

  2. पुनर्वसनाची गरज असलेल्या देहव्यापारातून बाहेर पडू इच्छिणाऱ्या महिला

  3. शिक्षण सोडलेल्या शाळा/महाविद्यालयीन तरुणी

  4. नुकतेच शिक्षण पूर्ण केलेल्या तरुणी


प्रशिक्षणातील ६ मुख्य ट्रेड:


फॅशन / ज्वेलरी डिझाईन
बुटीक, ब्युटी आणि वेलनेस सेवा
फूड प्रोसेसिंग व पाककला उत्पादने
हस्तनिर्मित साबण, मेणबत्त्या, नॅपकिन, बुके आणि अरोमा उत्पादने
पॉवरलूम आधारित कौशल्य विकास
लॉजिस्टिक्स ऑपरेशन्स आणि डेटा एन्ट्री.

Comments
Add Comment

ठाण्यात 'जय श्रीराम'वाला महापौर बसवा; नाहीतर 'हिरवे' गुलाल उधळतील!

मंत्री नितेश राणे यांचा इशारा ठाणे : ''एकीकडे संविधानाच्या गोष्टी करायच्या आणि दुसरीकडे धर्माच्या नावाने

मुरबाड तालुक्यात १५ जानेवारीला विज्ञान प्रदर्शन

मुरबाड :मुरबाड तालुक्यातील धसई येथे १५ जानेवारी २०२६ रोजी भव्य विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सेवा

निवडणूक कर्तव्य टाळणाऱ्या पवार स्कूलच्या ८० कर्मचाऱ्यांवर गुन्हा

कल्याण: कल्याण–डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ चे कामकाज पारदर्शक, सुरळीत आणि विहित वेळेत

कल्याण पूर्वेतील अपक्ष उमेदवाराच्या प्रचारात बलात्कारातील आरोपी

कल्याण : कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी पोलीस स्टेशन परिसरात आज तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. २१ वर्षीय एअर

ठाण्यात महायुतीचा वचननामा जाहीर

ठाणे स्मार्ट व ग्लोबल शहर बनवण्याचा निर्धार ठाणे  : महायुतीने ठाणे महानगरपालिका निवडणुकीसाठी आपला वचननामा

मंत्री नितेश राणे आज ठाण्यात

सीताराम राणे यांचा करणार प्रचार ठाणे  : ठाणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ५-ड चे भाजप-शिवसेना-रिपाई महायुतीचे