फडणवीस सरकारची ‘विकसित महाराष्ट्र २०४७’च्या दिशेने वाटचाल

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे; महायुती सरकारच्या वर्षपूर्ती निमित्त विशेष संवाद


मुंबई : “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ चे व्हिजन निश्चित करून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालील सरकार दिशेने पावले उचलत आहे. शेती, पायाभूत सुविधा, सिंचन, उद्योग, रोजगार निर्मिती, सामाजिक न्याय, सुरक्षा या प्रत्येक क्षेत्रात महायुती सरकारने क्रांतीकारी निर्णय घेऊन विकासाची गती वाढवली आहे. महायुती सरकारमुळे महाराष्ट्राची शाश्वत विकासाच्या दिशेने दमदार वाटचाल सुरू आहे”, असे प्रतिपादन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी केले.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारला शुक्रवारी एक वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्त मुंबईमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपचे मुंबई अध्यक्ष अमीत साटम, प्रदेश सरचिटणीस आ. विक्रांत पाटील, प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, रघुनाथ पांडे, प्रतिक करपे आदी उपस्थित होते.


बावनकुळे म्हणाले की, अतिवृष्टीग्रस्तांना ३२ हजार कोटींचे पॅकेज, दुष्काळी उपाययोजना लागू तसेच पीककर्ज वसुलीला स्थगिती देण्याचे आदेश देऊन सरकारने शेतकऱ्यांना दिलासा दिला. पीकविमा आणि भरपाई प्रक्रियेला गती देण्यात आली. पशुसंवर्धन आणि मत्स्यव्यवसायाला कृषीचा दर्जा देण्यात आला. सिंचनक्षमता वाढवण्यावर भर देण्यात आला. नदीजोड प्रकल्पांना मान्यता देऊन निधीची तरतूद करण्यात आली. उपसा सिंचन प्रकल्पांना कोट्यवधींचे निधी मंजूर करण्यात आले. जलयुक्त शिवार २.० अंतर्गत वर्षभरात ३७ हजार १६६ कामे पूर्ण करण्यात आली.

पायाभूत सुविधांवर सर्वाधिक भर


पायाभूत सुविधांच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर करून पायाभूत यंत्रणा सक्षम करण्याला प्राधान्य दिले. समृद्धी महामार्ग पूर्णत: खुला करण्यात आला. शक्तीपीठ महामार्ग, वाढवण बंदर, ऑफशोअर विमानतळ यांचे नियोजन करण्यात आले. १०० गावांत सौरग्राम योजना, नागपूरमध्ये राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्था, मेट्रो ११ ला मान्यता, मुंबईत २३८ लोकल गाड्यांच्या खरेदीसाठी ४ हजार ८२६ कोटींचा निधी, रेल्वे सेवेच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर करण्यात आला असेही बावनकुळे यांनी नमूद केले.

Comments
Add Comment

डॉ. अविनाश ढाकणे यांनी स्वीकारला महापालिका अतिरिक्त आयुक्त पदाचा कार्यभार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) म्हणून डॉ. अविनाश ढाकणे यांनी

१० टोलनाक्यांवर नवीन टोल प्रणाली सुरू

गडकरी यांची लोकसभेत माहिती मुंबई : देशातील वाहनचालकांना आणि प्रवाशांना मोठी दिलासा देणारी घोषणा केंद्रीय

महावितरणमध्ये एआय तंत्रज्ञानाच्या आधारित डिजीटलायझेशन

तांत्रिक किचकट अडचणी दूर होणार मुंबई : राज्यात सौर ऊर्जेसह नवीनीकृत ऊर्जा स्त्रोतांच्या ‘डिजिटल ट्वीन’

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मेट्रो २ ‘ब’च्या पहिल्या टप्प्याच्या लोकार्पणाची प्रतीक्षा कायम

मुंबई : मेट्रो २ ब मार्गिकेतील मंडाले ते डायमंड गार्डन टप्प्याच्या संचलनासाठी मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे

बुरख्याच्या परवानगीसाठी आंदोलन

मुंबई  : गोरेगावमधील विवेक एज्युकेशन सोसायटीच्या विवेक विद्यालय-कनिष्ठ महाविद्यालयाने कपड्यांबाबत आचारसंहिता