धक्कादायक! पुण्यात उघड झाला 'आलिशान कार कर्ज घोटाळा', ईडीच्या तपासात समोर आला स्टेट बँकच्या व्यवस्थापकाचा हात

पुणे: अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीच्या मुंबई विभागाच्या कार्यालयाने पुण्यामध्ये मोठी कारवाई केल्याचे समोर आले आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या युनिव्हर्सिटी रोड शाखेत झालेल्या १९.३८ कोटी रुपयांच्या 'आलिशान कार' कर्ज घोटाळ्याप्रकरणी ही छापेमारी करण्यात आली. या कारवाईमध्ये ईडीने बनावट कागदपत्रांचा वापर करून खरेदी केलेल्या आणि फसव्या कर्जाच्या पैशातून मिळालेल्या अनेक उच्च दर्जाच्या आलिशान चारचाकी जप्त केल्या आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, ईडीने २६ नोव्हेंबर दरम्यान पुण्यातील १२ निवासी आणि व्यावसायिक जागांवर छापेमारी केली. ईडीने ही चौकशी पुणे आणि शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आलेल्या एफआयआरच्या आधारे सुरू केली होती. ज्यामध्ये २०१७-२०१९ दरम्यान स्टेट बँकच्या युनिव्हर्सिटी रोड शाखेतील मुख्य व्यवस्थापक असलेल्या अमर कुलकर्णी यांनी ऑटो लोन काउन्सलर आदित्य सेठिया आणि काही निवडक कर्जदारांसोबत संगनमत करून बनावट कागदपत्रांच्या आधारे महागडे कार लोन मंजूर करत बँकेची फसवणूक केल्याचे आरोप होते.




अनेक आरोपींनी बनावट दस्तऐवजांचा वापर करून आलिशान कार कर्ज घेतले आणि बँकेची कोट्यवधींची फसवणूक केली. यासाठी मुख्य व्यवस्थापक अमर कुलकर्णी यांनी बँकेच्या लेंडिंग पॉलिसीकडे दुर्लक्ष करून या कर्जाची शिफारस केली. तसेच बँकेत बनावट आणि वाढीव रकमेची कोटेशन्स सादर करून कर्जाची रक्कम जास्त दाखवता येईल आणि चुकीच्या पद्धतीने मंजुरी मिळू शकेल अशी व्यवस्था केली. यामुळे अनेक प्रकरणांमध्ये कोणतीही पडताळणी न करता मोठ्या रक्कम मंजूर करण्यात आली. या कर्ज घोटाळ्यामध्ये बीएमडब्लू, वोल्वो, मर्सिडीज, रेंज रोव्हर अशा गाड्या खरेदी केल्याचे समोर आले आहे.


दरम्यान, या गाड्या घेण्यासाठी बँक अधिकाऱ्यांची संगनमताने बनावट दस्तऐवजांचा वापर झाल्याचे स्पष्ट झाले. या कारवाईत अनेक कर्जदारांनी खरेदी केलेली जमीन आणि इतर मालमत्ता, तसेच इतर आलिशान गाड्या जप्त करण्यात आल्यात. मोठ्या प्रमाणात इनक्रिमिनेटिंग दस्तऐवज, खोटी कोटेशन्स, फर्जी कागदपत्रे आणि इतर नोंदीही आढळून आल्यात. हे सर्व मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा कलम १७ अंतर्गत जप्त करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

पुणे : कोथरुडमध्ये उबाठा उमेदवाराचा भाजपमध्ये प्रवेश

पुणे : महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत कोथरुड विधानसभा मतदारसंघात उबाठा गटाला मोठा धक्का बसला आहे. प्रभाग

पुण्यात हायव्होल्टेज सामना; आंदेकर कुटुंबाकडे किती मालमत्ता? प्रतिज्ञापत्रातून खुलासा

आगामी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर प्रभाग क्रमांक २३ मध्ये जोरदार सामना पहायला मिळणार

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर धावत्या खाजगी बसला भीषण आग

बुलढाणा : समृद्धी महामार्गावर भीषण अपघातांचे आणि आगीच्या घटनांचे सत्र थांबता थांबत नाहीये. आज पुन्हा एकदा

भटक्या कुत्र्यांचा हैदोस; पुण्यात पिसाळलेल्या कुत्र्याच्या चाव्यामुळे ४० जण जखमी

पुणे : पुणे जिल्ह्यातील चाकण परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने अक्षरशः हैदोस माजवत अनेक जणांना चावा घेतला आहे. या

उसतोड पूर्ण झाली आणि घरी परतताना रस्त्यातच परिवाराचा अपघात ; काळीज पिळवटणारी घटना

महाराष्ट्रात गेल्या काही महीन्यांपासून वाहनांच्या अपघातीच्या घटना होत असल्याच पहायला मिळत आहेत. तसंच एका

माणगावात मोफत दिव्यांग शिबिराचे आयोजन

२०० दिव्यांगांना आधुनिक कृत्रिम मॉड्युलर पाय मोफत. आयोजकांची माणगाव मध्ये पत्रकार परिषदेतून माहिती. माणगाव :