नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेला इन्क्यूबेशन सेंटर म्हणून मान्यता

मुंबई: विदर्भातील नवउद्योग (स्टार्टअप) परिसंस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी यांनी त्यांच्या सहाय्यित इन्क्यूबेशन सेंटरसाठी दोन दिवसीय धोरणात्मक कार्यशाळेचे आयोजन केले. या कार्यशाळेत राज्यभरातील इन्क्यूबेशन सेंटर प्रमुख, शैक्षणिक संस्था तसेच परिसंस्थेतील विविध घटक सहभागी झाले.


या कार्यशाळेत महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी आणि नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्था यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाली. यामुळे भारतीय व्यवस्थापन संस्था, नागपूर यांना अधिकृतपणे महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्या सहाय्यित इन्क्यूबेशन सेंटर म्हणून मान्यता देण्यात आली. या धोरणात्मक समावेशामुळे विदर्भातील नवोपक्रम, उद्योजकता आणि नवउद्योगांच्या वाढीस मोठी चालना मिळणार आहे.


कौशल्य, रोजगार, उद्योजकता नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी राज्यात मजबूत व सर्वसमावेशक नवउद्योग परिसंस्था उभारण्याबाबत शासनाची कटिबद्धता अधोरेखित केली. अशा संस्थात्मक सहकार्यांमुळे नवउद्योगांना योग्य मार्गदर्शन, साहाय्य व संधी उपलब्ध होऊन प्रादेशिक विकासास हातभार लागेल, असे त्यांनी नमूद केले.


कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा वर्मा यांनी प्रारंभिक टप्प्यातील नवोपक्रमकर्त्यांना साहाय्य देण्यासाठी संस्थात्मक क्षमता वाढ महत्त्वाची असल्याचे सांगितले. जिल्हा व स्थानिक पातळीवर नवोपक्रम विकसित करण्यासाठी सक्षम इन्क्यूबेशन प्रणाली आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.


महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकांत पाटील यांनी सांगितले की, राज्यात २९ सहाय्यित इन्क्यूबेशन सेंटरचे मजबूत जाळे उभे करण्यात आले असून ते नवउद्योगांना कल्पनांपासून विस्तारक्षम उपक्रमांपर्यंत पोहोचण्यास मदत करत आहेत. तसेच इन्क्यूबेशन सेंटरनी परस्पर ज्ञान, कौशल्य व संधींची देवाणघेवाण करत सहकार्यपूर्ण परिसंस्था निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


या कार्यशाळेत इन्क्यूबेशन पद्धती अधिक सक्षम करण्याबरोबरच दीर्घकालीन शाश्वततेवरही भर देण्यात आला. अटल नाविन्यता मिशनचे माजी संचालक आणि नीति आयोगाचे अतिरिक्त सचिव रमणन रमणाथन, आयएसबीएचे अध्यक्ष प्रसाद मेमन यांच्या सत्रांमध्ये इन्क्यूबेशन सेंटरची आर्थिक, कार्यात्मक व धोरणात्मक शाश्वतता सुनिश्चित करण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.


महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्या इन्क्यूबेशन केंद्रामध्ये नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेचा समावेश झाल्यामुळे विदर्भातील नवउद्योजकांना मार्गदर्शन, उद्योगसाखळीशी जोडणी आणि नवोपक्रम साहाय्य अधिक प्रभावीपणे उपलब्ध होणार आहे. या उपक्रमामुळे इच्छुक उद्योजकांसाठी नव्या संधी निर्माण होऊन महाराष्ट्राची देशातील अग्रगण्य नवउद्योग केंद्र म्हणून ओळख अधिक बळकट होणार आहे.

Comments
Add Comment

Ahilyanagar : जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान ; निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह, राजकीय वातावरण तापले

अहिल्यानगर (राहुरी प्रतिनिधी) : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Ahilyanagar District Central Cooperative Bank) होवू घातलेल्या

Ahilyanagar : श्रीरामपूरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई; एमडी तस्कर जेरबंद, अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर (श्रीरामपूर) : श्रीरामपूर शहरात अंमली पदार्थांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने सलग दुसऱ्या दिवशी मोठी

Ketan Agrawal Murder Case : 'मला त्याला स्लो पॉयझन देऊन मारायचं होतं..';केतन हत्याकांड प्रकरणातील 'त्या' गुप्त कटामागचा मास्टरमाइंड कोण?

केतन अग्रवाल हत्याकांडात धक्कादायक दावा; 'स्लो पॉयझन' देण्याचाही कट असल्याची तपासात चर्चा पुणे : केतन

Minister Radhakrishna Vikhe Patil : मतदार यादीत घुसखोरांना जागा नाही ; पुनरिक्षण मोहिमेत कार्यकर्त्यांनी पुढे या : ना. राधाकृष्ण विखे पाटील

Ahilyanagar (Shevgaon) : मतदार यादीची सखोल पुनरिक्षण मोहीम भविष्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे.सरकारी स्तरावर काम सुरू असले

Wardha Murder : वर्ध्यात काळजाचा थरकाप उडवणारी घटना! 12 वर्षांच्या मुलीची दगडाने ठेचून निर्घृण हत्या; नराधमांनी ओलांडल्या क्रूरतेच्या सर्व सीमा

वर्धा : वर्धा  (wardha) जिल्ह्यातील रोठा गावातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली

Pune Metro : पुणेकरांसाठी गुड न्यूज! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोला नवा मुहूर्त; वाहतूक कोंडीतून लवकरच सुटका!

पुणे : पुण्यातील ट्रॅफिक जॅम, विशेषतः हिंजवडी आयटी पार्क परिसरात होणाऱ्या रोजच्या वाहतूक कोंडीने त्रस्त