भिवंडीत विकासकाकडून १०० कोटींचा घोटाळा?

फसवणूक झालेल्या कुटुंबाचे आ. संजय केळकर यांना साकडे


ठाणे  : भिवंडीजवळील खारबाव येथे सुरू असलेल्या इमारत बांधकामामध्ये घरे आणि गाळे विकत घेण्यासाठी सुमारे तीन हजार नागरिकांनी संबंधित विकासकाकडे ८० टक्क्यांहून अधिक रक्कम दिली. गेल्या १५ वर्षांत विकासक घरे देण्यात असमर्थ ठरला असून तब्बल १०० कोटींचा घोटाळा उघडकीस आला आहे. आज या कुटुंबांने आमदार संजय केळकर यांची भेट घेत त्यांना याप्रकरनी मदत करण्यासाठी साकडे घातले. खोपट येथील भाजप कार्यालयात आयोजित 'जनसेवकाचा जनसंवाद' या कार्यक्रमात सदर कुटुंबाने आ.केळकर यांना निवेदन दिले. आ. केळकर यांनी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे.न्याय मिळत नाही तोपर्यंत सदर कुटुंबाच्या पाठीशी ठाम उभा राहणार असल्याचे आश्वासन दिले आहे.


सन २०११ ते २०१७ या काळात बिल्डर श्री महावीर पटवा आणि कन्स्ट्रक्शन कंपनीमार्फत भिवंडीजवळील खारबाव आणि पायेगाव येथे इमारत बांधकाम सुरू होते. कमी दरात घरे आणि दुकानाचे गाळे देण्याचे आमिष विकासकाने दाखवल्याने काही जणांनी गुंतवणुक करत ८० टक्के रक्कम जमा केली. मात्र त्यांना घरे मिळाली नाहीत. दरम्यान विकासकाने बनावट शासकीय कागदपत्रे करून बांधकाम केल्याचे स्पष्ट झाल्याने २०१५ साली जिल्हाधिकारी कार्यालयाकडून या बांधकामावर कारवाई करण्यात आली. आर्थिक गुन्हे शाखेच्या माहितीनुसार, या प्रकल्पात सुमारे ३ हजार नागरिकांनी १०० कोटींहून अधिक रकमेची फसवणूक झाल्याचे नागरिकांनी सांगितले.


सदर विकासकावर गुन्हे दाखल करून त्याची मालमत्ता ताब्यात घेण्यात आली असली तरी फसवणूक झालेल्या कुटुंबांना त्यांचे पैसे परत मिळाले नसल्याने लोक हवालदिल झाले आहेत. आ. केळकर म्हणाले कि, ''या प्रकरणात फसवणूक झालेल्या तक्रारदारांना अद्याप सरकारी वकील देण्यात आलेला नाही.


विकासकाची मालमत्ता विकून त्यातून नागरिकांचे पैसे लवकर मिळावेत यासाठी मी प्रयत्न करणार आहे.'' यावेळी माजी उपमहापौर अशोक भोईर, परिवहन सदस्य विकास पाटील, ठाणे जिल्हा हाउसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, माजी नगरसेवक भरत चव्हाण, महेश कदम, ॲड. अल्केश कदम आदी उपस्थित होते.

Comments
Add Comment

एसी ऑफिस सोडून मातीच्या गोण्या उचलल्या!

मोखाडा गटविकास अधिकाऱ्यांचे जलसंधारणासाठी श्रमदान मोखाडा : सरकारी योजना केवळ कागदावर किंवा आदेशापुरत्या

तलावपाळीवर नववर्षाचे स्वागत गंगा आरतीने !

३१ डिसेंबरच्या रात्री कार्यक्रम; वाराणसीहून पंडितांना आमंत्रण ठाणे : ठाणे शहर येत्या नवीन वर्षाच्या

ठाण्यात भाजप-शिंदे गटात जागावाटपाच्या वाटाघाटी

भाजपची ५० जागांची मागणी ठाणे : आगामी ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गट आणि भाजप

अंबरनाथमध्ये २०८ बोगस मतदार !

भाजपचा शिवसेनेच्या शिंदे गटावर आरोप, पोलीस चौकशी सुरू अंबरनाथ : अंबरनाथ नगरपरिषदेच्या निवडणुकीदरम्यान खळबळजनक

Mira-Bhayandar Leopard Attack : होणाऱ्या नवरीवर बिबट्याची झडप: चेहऱ्यावर गंभीर जखमा अन्…नेमकं काय घडलं त्या घरात? मीरा भाईंदर हादरलं!

मीरा भाईंदर : पुणे आणि नागपूरनंतर आता मुंबईलगतच्या मीरा भाईंदर शहरात बिबट्याच्या वावराने मोठी खळबळ उडाली आहे.

पुलाच्या कामामुळे कल्याणमध्ये वाहतूक मार्गात २० दिवस बदल , वालधुनी उड्डाणपुलावर काम सुरू

कल्याण : कल्याण पश्चिम आणि कल्याण पूर्वेला जोडणारा वालधुनी उड्डाणपूल दुरुस्तीच्या कामासाठी काही काळ