दक्षिण आफ्रिकेने केलेल्या पराभवाचा बदला भारत एकदिवसीय मालिकेत घेणार ?

रांची : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका रविवार ३० नोव्हेंबर २०२५ पासून सुरू होत आहे. मालिकेतील पहिला सामना रविवार ३० नोव्हेंबर २०२५ रोजी झारखंडमधील जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम कॉम्प्लेक्समध्ये दुपारी १:३० वाजता सुरू होईल. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका दक्षिण आफ्रिकेने ०-२ अशी जिंकली. दोन्ही सामन्यात भारताचा लाजीरवाणा पराभव झाला. या पराभवाचा बदला भारत एकदिवसीय सामन्यांची मालिका जिंकून घेणार का ? याचीच सध्या चर्चा आहे.


सलामीची जोडी म्हणून भारताकडून रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल हेच खेळण्याची शक्यता आहे. विराट कोहली तिसऱ्या क्रमाकांवर खेळण्याची शक्यता आहे. श्रेयस अय्यर आणि तिलक वर्मा यांच्यापैकी एकजण चौथ्या क्रमांकावर तर पाचव्या क्रमांकावर केएल राहुल खेळण्याची शक्यता आहे.


दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी केएल राहुल भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे.


वेळापत्रकानुसार रविवार ३० नोव्हेंबर २०२५ पासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू होणार आहे. मालिकेतील पहिला सामना झारखंडमधील जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम कॉम्प्लेक्समध्ये ३० नोव्हेंबर रोजी दुपारी १:३० वाजता सुरू होईल.


भारत आणि दक्षिण आफ्रिका एकदिवसीय सामन्यांमध्ये ९४ वेळा एकमेकांसमोर आले आहेत. दक्षिण आफ्रिकेने ९४ पैकी ५१ सामने जिंकले आहेत तर भारतीय संघाने ४० सामने जिंकले आहेत आणि तीन सामने अनिर्णित राहिले आहेत. भारतीय संघाने घरच्या मैदानावर १८ सामने जिंकले आहेत, तर दक्षिण आफ्रिकेने २६ सामने जिंकले आहेत. परदेशात, भारतीय संघाने १२ सामने जिंकले आहेत, तर दक्षिण आफ्रिकेने १४ सामने जिंकले आहेत. तटस्थ ठिकाणी झालेल्या सामन्यांपैकी १० सामने भारताने आणि ११ सामने दक्षिण आफ्रिकेने जिंकले आहेत.


एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ


केएल राहुल (कर्णधार/यष्टीरक्षक), रिषभ पंत (उपकर्णधार/यष्टीरक्षक), रोहित शर्मा, विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, ऋतुराज गायकवाड, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंह और ध्रुव जुरेल


भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका




  1. पहिला सामना - ३० नोव्हेंबर २०२५ - रांची, झारखंड

  2. दुसरा सामना - ०३ डिसेंबर २०२५ - रायपूर, छत्तीसगड

  3. तिसरा सामना - ०६ डिसेंबर २०२५ - विशाखापट्टणम (वायझॅग), आंध्र प्रदेश

Comments
Add Comment

Indian Team Schedule : जुलै महिन्यात भारतीय संघ किती सामने खेळणार ? जाणून घ्या संपू्र्ण वेळपत्रक; इंग्लंडमध्ये किती सामने होणार ?

मुंबई : भारतीय संघ पुढच्या महिन्यात (जुलै) इंग्लंच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात दोन दिग्गज पुनरागमन करणार

Vaibhav Sooryvanshi : आयर्लंडविरुद्धच्या मालिकेत वैभव सूर्यवंशी रचणार इतिहास ! रोहित- हार्दिकचा विक्रम मोडणार ?

Mumbai: भारत आणि आयर्लंड यांच्यात आज (२६ जून) पासून दोन सामन्यांच्या टी-२० मालिकेची सुरुवात होणार आहे. या मालिकेचा

FIFA WORLDCUP 2026 : ऑस्ट्रेलियाची बाद फेरीत धडक; पॅराग्वेच्याही आगेकूचची शक्यता

सँटा क्लारा, कॅलिफोर्निया : ऑस्ट्रेलिया आणि पॅराग्वे यांच्यातील सामना गोलशून्य (०-०) बरोबरीत सुटल्यामुळे 'सॉकरूस'

FIFA WORLDCUP 2026 : जपान आणि स्वीडनची बाद फेरीत धडक; सामना १-१ ने अनिर्णित

अर्लिंग्टन, टेक्सास : जपान आणि स्वीडन यांच्यातील अटीतटीचा सामना १-१ असा बरोबरीत सुटला असला तरी, या निकालासह

FIFA WORLDCUP 2026 : डच संघाचा दणदणीत विजय; ट्युनिशियाला नमवून विश्वचषकाच्या बाद फेरीत अव्वल स्थान

कॅन्सस सिटी, मिसूरी: पावसाळी हवामान आणि विजांच्या कडकडाटाच्या व्यत्ययानंतरही नेदरलँड्सने ट्युनिशियावर ३-१ असा

FIFA WORLDCUP 2026 : इक्वेडोरची ऐतिहासिक कामगिरी; जर्मनीवर मात करत विश्वचषकाच्या बाद फेरीत धडक

ईस्ट रदरफोर्ड, एनजे : गोंझालो प्लाटाच्या निर्णायक गोलच्या जोरावर इक्वेडोरने बलाढ्य जर्मनीवर २-१ ने विजय मिळवत