प्रतिनिधी: युएस व भारत यांच्यातील' ट्रेड डील' आता पूर्णत्वास येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण नवी दिल्लीतील वाणिज्य (व्यापार( विभागाचे सचिव राजेश अग्रवाल यांनी आज लवकरच या व्यापारी करार या वर्षाच्या अखेरीस पूर्ण होईल असे विधान केले आहे. नव्या माहितीनुसार,'प्रथम गरज आहे ती म्हणजे फ्रेमवर्क ट्रेड डील, जी परस्पर शुल्कांना तोंड देण्यास सक्षम आहे' असे भारताचे व्यापार सचिव राजेश अग्रवाल यांनी फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या एका कार्यक्रमात म्हटले.
भारत युएस यांच्यातील संबंध अतिरिक्त टॅरिफ मुद्यावर चांगले राहिलेले नाहीत हे सर्वश्रुत आहे परंतु तरीही वेळोवेळी युएस राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकमेकांची स्तुतीही केली आहे. ही अडलेली व्यापारी चर्चा आता निर्णायक पातळीवर पोहोचल्याची शक्यता झाला आहे. युएसने भारतावर एकूण ५०% टॅरिफ कर लावला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात दोन्ही देशांच्या व्यापाऱ्यांना याचा नाहक त्रास झाला. रशियन तेलाच्या खरेदीत कपात करण्याच्या अटीवर अमेरिकेन कर कमी करण्याचे वेळोवेळी सांगितले होते तर भारताकडून देशाच्या हितासाठी जो योग्य निर्णय घेतला जाईल जिथून वाजवी दरात मिळेल तिथून व्यापार करार केला जाईल असे यापूर्वीच म्हटले गेले होते. मात्र गेल्या महिन्यात रिलायन्स रिफायनरीने रशियन तेल आयातीत कपात केली होती.
याविषयी अधिक बोलताना,'मला वाटते की मी एवढेच म्हणू शकतो की आम्ही जवळ आहोत, आम्ही बहुतेक मुद्दे सोडवण्याचा प्रयत्न केला आहे' असे अग्रवाल अग्रवाल म्हणाले आहेत. उर्वरित कोणत्याही समस्या राजकीय पातळीवर सोडवता येतील असाही उल्लेख त्यांनी केला होता.'आम्ही खूप आशावादी आहोत आणि या कॅलेंडर वर्षात आपल्याला तोडगा निघेल अशी खूप आशा आहे' ते पुढे म्हणाले आहेत.
ऑक्टोबरमध्ये भारताची व्यापार तूट ४१.६८ डॉलर अब्जच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचली होती. नुकत्याच एका कार्यक्रमात वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल म्हणाले आहेत की,' भारत जागतिक व्यापार विस्तारत आहे आणि सध्या अमेरिका आणि युरोपियन युनियनसह विविध भागीदारांसह मुक्त व्यापार करारांवर (FTA) वाटाघाटी करत आहे'. माहितीप्रमाणे भारत युएसकडून झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून ५० देशांशी एफटीएसाठी चर्चेत आहे. नुकतेच कॅनडाशी व इस्त्राईलशी भारत व्यापारी करारासाठी चर्चेत असल्याचे समजले होते.