खाडीत सुटकेसमध्ये आढळला तरुणीचा मृतदेह; आरोपीचा शोध सुरु

कल्याण : कल्याण परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शीळ रोडलगतच्या देसाई खाडीत एका सुटकेसमधून तरुणीचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. राज्यात वाढत्या खून प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर या घटनेमुळे कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


प्राथमिक माहितीनुसार मृत तरुणीचे वय अंदाजे 28 ते 30 वर्षे दरम्यान असल्याचे सांगितले जाते. तिची हत्या करून मृतदेह सुटकेसमध्ये ठेवून खाडीत टाकण्यात आला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे.


घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून फॉरेन्सिक टीमकडून महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यात आले आहेत. डाकघर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवला असून, या अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. अद्याप मृत तरुणीची ओळख पटलेली नसून, हेच पोलिसांसाठी सर्वात मोठे आव्हान बनले आहे.


तरुणीची ओळख नसल्याने आरोपीचा शोध घेणे अवघड झाले आहे. यासाठी पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे व इतर शक्यता तपासत आहेत. पुढील काही तासांत किंवा दिवसांत या प्रकरणात महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते.

Comments
Add Comment

श्री मलंगगड यात्रेसाठी पोलीस प्रशासन सज्ज

अप्पर आयुक्तांकडून सुरक्षेचा सखोल आढावा कल्याण : ठाणे जिल्ह्यातील प्रमुख श्रद्धास्थान असलेल्या श्री मलंगगड

धारण तलावाच्या स्वच्छतेकडे महापालिका सतर्क

तलावांच्या स्वच्छतेसाठी खारफुटी हटवण्याचा प्रस्ताव नवी मुंबई : मुसळधार पावसात नवी मुंबईमध्ये पुरस्थिती

ठाण्याच्या महापौर निवडणुकीवर अनिश्चिततेचे सावट

ठाणे : ठाणे महापालिकेच्या निवडणूक निकालानंतर आता महापौर पदासाठीची निवडणूक जाहीर झाली असून, ३० जानेवारी रोजी

बारामती विमान अपघातात पीएसओ विदीप जाधव यांचा मृत्यू

ठाणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा बारामतीत विमान अपघातात मृत्यू झाला. याच

अंबरनाथ शहरात घरपट्टी थकबाकीदारांसाठी अभय योजना लागू

अंबरनाथ : शहरातील मालमत्ता कर थकबाकी असलेल्या नागरिकांना अंबरनाथ नगर परिषद प्रशासनाने अभय योजना राबविण्याचा

मीरा-भाईंदरमध्ये १०० कोटींचा ‘विचित्र’ पूल!

व्हिडीओ व्हायरल; एमएमआरडीएचे स्पष्टीकरण भाईंदर : मीरा–भाईंदरमध्ये एमएमआरडीएने उभारलेल्या सुमारे १०० कोटी