ठाण्यात हिवाळ्यात उष्म्याचा कहर! तापमान ३५° अंशाच्या पुढे

उष्मा आगामी दोन-तीन दिवसांत आणखी वाढण्याचे संकेत


ठाणे : जोमदार पावसामुळे यंदाच्या हिवाळ्यात आल्हाददायक गारवा जाणवेल, अशी अपेक्षा नागरिकांनी ठेवली होती. मात्र नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ठाण्यात उष्म्याने अक्षरशः कहर केला असून गुरुवारी शहराचा कमाल पारा ३५ अंश सेल्सियस पर्यंत नोंदवला त्यामुळे ऐन थंडीत ‘ऑक्टोबर हिट’चा तडाखा ठाणेकरांच्या अंगावर पडला आहे.


गेल्या तीन-चार दिवसांपासून तापमानात सातत्याने भर पडत असून दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. ३०° सेल्सियसपासून थेट ३५ ° पर्यंतच्या उडीनं हिवाळ्याची चाहूलच हरवली आहे.


येत्या ४८ ते ७२ तासांत तापमान आणखी वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पहाटे हलकीशी थंडी आणि दुपारी डोळ्यांत आग ओकणारा उन्हाचा तडाखा ठाणेकर या विसंगत हवामानाला अक्षरशः कंटाळले आहेत. जमिनीतील ओलावा, सूर्याची तीव्रता आणि कोरडे गरम वारे, यामुळे तापमानात झपाट्याने वाढ झाली आहे. “सध्या दिसत असलेली तापमानवाढ तात्पुरती आहे. काही दिवसांत पारा खाली येऊन चांगली थंडी पडेल. जमिनीतील ओलावा आणि हवामानातील बदलांमुळे हा उकाडा वाढला आहे. असल्याचे सांगण्यात येत आहे.


ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडील तापमान नोंद


दिनांक          कमाल    किमान
२१ नोव्हेंबर    ३३.२       २१.६
२२ नोव्हेंबर    ३४.२      २२.७
२३ नोव्हेंबर    ३४.७     २३.६
२४ नोव्हेंबर    ३४.८     २३.७


Comments
Add Comment

कल्याण पूर्व-पश्चिम जोडणारा स्व. आनंद दिघे उड्डाणपूल बंद

कडोंमपाकडून पुलाच्या डांबरीकरण व दुरुस्तीच्या कामास सुरुवात कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने

ठाण्यात तस्कराला बेड्या; पाच कोटींचे चरस पकडले

ठाणे: पश्चिम बंगालमधून चरसची विक्री करण्यासाठी आलेल्या तस्कराला ठाणे गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. शनवर

बोईसरच्या श्रीकृष्ण मंदिर तलावात काळ्या मानेची टिबुकली

दुर्मीळ परदेशी पाहुण्याच्या आगमनाने पक्षीप्रेमी आनंदित प्रशांत सिनकर ठाणे : हिवाळ्याच्या आगमनासोबतच बोईसरला

शिवसेना व रिपब्लिकन सेनेची युती

रिपब्लिकन सेनेचा ११ वा वर्धापन दिन ठाणे : ''२५ वर्षांपूर्वी ठाण्यात आनंद दिघे यांनी भीमशक्ती आणि शिवशक्तीची

हार्बरच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, बेलापूर-पनवेलदरम्यान १२ तासांचा ब्लॉक

बेलापूर : हार्बर मार्गावरील पनवेल येथे विविध अभियांत्रिकी कामं करायची असल्यामुळे बेलापूर ते पनवेल दरम्यान बारा

कॅप्सुल गोळ्यांमध्ये अळ्या!

महिला रुग्ण हादरली, डॉक्टरही थक्क कल्याण : कल्याणमध्ये अॅसिडिटीच्या त्रासासाठी दिलेल्या गोळ्यांमध्ये अळ्या