उष्मा आगामी दोन-तीन दिवसांत आणखी वाढण्याचे संकेत
ठाणे : जोमदार पावसामुळे यंदाच्या हिवाळ्यात आल्हाददायक गारवा जाणवेल, अशी अपेक्षा नागरिकांनी ठेवली होती. मात्र नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ठाण्यात उष्म्याने अक्षरशः कहर केला असून गुरुवारी शहराचा कमाल पारा ३५ अंश सेल्सियस पर्यंत नोंदवला त्यामुळे ऐन थंडीत ‘ऑक्टोबर हिट’चा तडाखा ठाणेकरांच्या अंगावर पडला आहे.
गेल्या तीन-चार दिवसांपासून तापमानात सातत्याने भर पडत असून दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. ३०° सेल्सियसपासून थेट ३५ ° पर्यंतच्या उडीनं हिवाळ्याची चाहूलच हरवली आहे.
येत्या ४८ ते ७२ तासांत तापमान आणखी वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पहाटे हलकीशी थंडी आणि दुपारी डोळ्यांत आग ओकणारा उन्हाचा तडाखा ठाणेकर या विसंगत हवामानाला अक्षरशः कंटाळले आहेत. जमिनीतील ओलावा, सूर्याची तीव्रता आणि कोरडे गरम वारे, यामुळे तापमानात झपाट्याने वाढ झाली आहे. “सध्या दिसत असलेली तापमानवाढ तात्पुरती आहे. काही दिवसांत पारा खाली येऊन चांगली थंडी पडेल. जमिनीतील ओलावा आणि हवामानातील बदलांमुळे हा उकाडा वाढला आहे. असल्याचे सांगण्यात येत आहे.
ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडील तापमान नोंद
दिनांक कमाल किमान २१ नोव्हेंबर ३३.२ २१.६ २२ नोव्हेंबर ३४.२ २२.७ २३ नोव्हेंबर ३४.७ २३.६ २४ नोव्हेंबर ३४.८ २३.७






