सांगलीत स्मृती मंधानाच्या लग्नाआधी अनपेक्षित घटना; वडिलांची तब्येत बिघडल्याने विवाह सोहळा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलला

सांगली : भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मंधाना आणि पलश मुच्छल यांच्या विवाह सोहळ्यात एक अनपेक्षित विघ्न आले. लग्न समारंभाची थाटामाटात तयारी सुरू असताना स्मृतीच्या वडिलांची प्रकृती अचानक बिघडली. त्यामुळे विवाह सोहळा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आला आहे.


सकाळी नाश्ता करताना श्रीनिवास मंधाना यांची तब्येत बिघडली. काही वेळातच त्यांची प्रकृती अधिकच खराब झाली. त्यामुळे त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होईल असे सांगितले असले तरी, पूर्ण बरे होण्यासाठी काही वेळ लागणार असल्याची शक्यता आहे.


दुपारी ३.३० वाजता स्मृती आणि पलाशच्या विवाहाचा मुहूर्त ठरलेला होता. परिसरात मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था आणि आकर्षक सजावट करण्यात आली होती. मात्र, स्मृतीच्या वडिलांची तब्येत बिघडल्याची माहिती मिळताच लग्नस्थळी सर्व तयारी थांबवण्यात आली. फार्म हाऊसची सजावट काढण्याचे काम सुरू झाले आहे. कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे.


स्मृती मंधानाचा तिच्या वडिलांवर खूप जीव आहे. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होईपर्यंत लग्नाचा कोणताही कार्यक्रम करू नये, असा निर्णय तिने घेतला आहे. कुटुंबीयांनीही हा निर्णय मान्य केला आहे. विवाह सोहळा पुढे कधी होणार याबाबत अद्याप तारीख निश्चित नाही.

Comments
Add Comment

मुथुस्वामीचे पहिले शतक आणि जॅन्सनची दमदार खेळी; दक्षिण आफ्रिकेने उभारला ४८९ धावांचा डोंगर

गुवाहाटी : गुवाहाटी येथे सुरू असलेल्या भारत–दक्षिण आफ्रिका दुसऱ्या कसोटी सामन्यात पाहुण्या संघाने दुसऱ्या

भारत–दक्षिण आफ्रिका मालिकेआधी दुखापतींचे सावट; गिल आणि अय्यर दोघेही एकदिवसीय मालिकेबाहेर

मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. आधीच

मुंबईच्या मतदारयादीत ११ लाख दुबार मतदार

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारयादीबाबत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

मुंबईत भाजप विरोधात मविआ मनसेला सोबत घेऊन लढणार ?

मुंबई : राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुका जवळ आल्याने सर्व राजकीय वातावरण पुन्हा तापू लागले आहे. अनेक

पंकजा मुंडेंचे दौरे रद्द; PA च्या पत्नीची आत्महत्या, नातलगांचा हत्येचा आरोप

मुंबई : वरळीत प्रमोद महाजन यांची त्यांच्याच भावाने प्रवीणने हत्या केली. काही महिन्यांनतर प्रवीण महाजन ब्रेन

भाजपवर दबाव टाकण्यासाठी शिवसेनेची राजस्थानमध्ये नवी खेळी

जयपूर : महाराष्ट्रात २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली. यानंतर राज्यात