अंधेरी एमआयडीसीमध्ये रासायनिक गळती

एकाचा मृत्यू, दोघांची प्रकृती गंभीर


मुंबई : अंधेरी (पूर्व) येथील एमआयडीसी परिसरातील भंगारवाडी येथे शनिवारी दुपारी एक मजली गाळ्यामध्ये अचानक वायूगळती सुरू झाली आणि त्यात तिघांना श्वास गुदमरल्यामुळे त्रास होऊ लागला. तिघांना रुग्णालयात दाखल केले असता एकाचा मृत्यू झाला, तर दोघांची प्रकृती गंभीर आहे.


मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन विभागाने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी संध्याकाळी ५ वाजता ही घटना घडली. रासायनिक गळती सुरू झाल्यामुळे अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. रासायनिक गळतीचा शोध सुरु असून कारण अद्याप समजू शकलेले नाही. अग्निशमन दलाबरोबरच एनडीआरएफ दलालाही सतर्क ठेवण्यात आले आहे. या दुर्घटनेत तीन जणांना वायुगळतीमुळे श्वासोच्छवास घेण्यास त्रास झाला. त्यांना तातडीने होली स्पिरिट रुग्णालयात हलविण्यात आले. रुग्णालयातून मिळालेली माहितीनुसार अहमद हुसेन (२०) याला रुग्णालयात आणल्यावर मृत घोषित करण्यात आले, तर नौशाद अन्सारी (२८) आणि सबा शेख (१७) या दोघांना अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. या प्रकरणी अग्निशमन दल पुढील तपास करीत असून शोधकार्य सुरू आहे. रासायनिक गळतीचा स्रोत आणि प्रकार शोधण्याचे काम सुरू असल्याचे अग्निशमन दलाने सांगितले.


Comments
Add Comment

वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरमचे १९-२० डिसेंबरला मुंबईत आयोजन

जगभरातील अग्रणी उद्योगपती, व्यावसायिक आणि विचारवंत यांना एकत्र आणणारे व्यासपीठ मुंबई : वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक

शीळफाटा येथे उड्डाणपुलाच्या कामानिमित्त निळजे-दातिवलीदरम्यान ब्लॉक

मुंबई : डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन प्रकल्पासाठी शीळ फाटा येथील उड्डाणपूल हटविण्याच्या कामासाठी,

मुंबईतील धूर ओकणाऱ्या कारखान्यांना टाळे बसणार

वायू प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी भरारी पथकांची नियुक्ती मुंबई : मुंबईतील वाढलेली प्रदूषणाची मात्रा कमी

मुंबई महापालिकेतील आरक्षणाची मर्यादा ३४ टक्के…

८५ हरकती सादर, लवकरच निवडणूक होणार मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी

पुण्यातील कचरावेचक कामगार अंजू माने यांनी १० लाखांची बॅग परत करून दिला मानवतेचा संदेश

पुणे : जिथे दैनंदिन जीवनात पैशासाठी लोक अनेकदा अनैतिक मार्ग स्वीकारताना दिसतात, तिथे पुण्यातील एका मेहनती

Local Train Block : मध्य रेल्वेवर आजपासून १२ दिवसांचा ब्लॉक! चाकरमान्यांसाठी महत्त्वाची बातमी: 'या' लोकल रद्द, घरातून निघण्यापूर्वी 'हे' वेळापत्रक तपासा!

मुंबई : मुंबईच्या लाखो चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वेच्या लोकल वाहतुकीत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. रेल्वे