मुंबईच्या मतदारयादीत ११ लाख दुबार मतदार

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारयादीबाबत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महानगरपालिकेने प्रकाशित केलेल्या प्रारूप मतदारयादीत तब्बल ११ लाखांपेक्षा जास्त मतदारांची नावे एकापेक्षा अधिक ठिकाणी असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता टिकवणे हे निवडणूक आयोगासमोर मोठे आव्हान आहे.


प्रारूप यादी तपासताना ११,०१,५०५ मतदार दुबार असल्याचे आढळले. विशेष म्हणजे, यापैकी सुमारे एक लाख मतदारांची नावे तीन किंवा चार वेगवेगळ्या यादीत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामध्ये सर्वाधिक संख्या पश्चिम उपनगरांची (४,९८,५९७) असून, पूर्व उपनगरात ३,२९,२१६ आणि मुंबई शहरात २,७३,६९२ दुबार नोंदी आढळल्या आहेत.


मतदारयादीवरील हरकती आणि सूचनांसाठी २७ नोव्हेंबर ही अंतिम तारीख जाहीर करण्यात आली आहे. तर ५ डिसेंबरला अंतिम मतदारयादी प्रसिद्ध होणार आहे. मुंबईतील एकूण मतदारसंख्या १ कोटी ३ लाख ४४ हजार ३१५ इतकी असून, त्यापैकी ११ लाखांहून अधिक नावे पुनरावृत्तीची असल्याने निवडणूक आयोग आणि महापालिका या दोघांवरही दुरुस्तीचे मोठे दडपण आले आहे.


महापालिकेने दुबार मतदारांची समस्या दूर करण्यासाठी काही उपाययोजना जाहीर केल्या आहेत. प्रारूप मतदारयादीत जे मतदार दुबार नोंदले गेले आहेत, त्यांची नावे स्वतंत्रपणे चिन्हांकित करण्यात आली आहेत. अशा मतदारांना स्वतःहून आपले अतिरिक्त नाव वगळण्याची संधी दिली जाणार असून, अंतिम यादी जाहीर होण्यापूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, मतदानाच्या दिवशी जर एखाद्या मतदाराची दुबार नोंदणी आढळली, तर त्या व्यक्तीकडून दुसरीकडे मतदान केले नसल्याचे प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात येईल. महापालिकेच्या या उपाययोजनांमुळे मतदारयादीतील चुका कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

मुंबईचा पश्चिम आणि पूर्व द्रुतगती महामार्ग पावसाळ्यापूर्वी समतल करा; उपमहापौरांची आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी

मुंबई: मुंबई महानगरातील रस्त्यांची स्थिती अधिक सुधारण्यासाठी पश्चिम व पूर्व द्रुतगती महामार्ग तसेच प्रमुख

महापालिकेच्यावतीने मुंबई क्लीन लीग स्पर्धा; स्वच्छता विषयक स्पर्धेच्या नोंदणीचा अक्षय कुमार यांच्या उपस्थितीत शुभारंभ

मुंबई: मुंबई अधिक स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याच्या अनुषंगाने, महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने

मुंबई वॉटर मेट्रो जलवाहतूक प्रकल्पाला गती देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

मुंबई : "मुंबई महानगर प्रदेशात जलप्रवासी वाहतुकीसाठी वॉटर मेट्रो प्रकल्प तीन टप्प्यात कार्यान्वित करण्यात

आमदार हेमंत पाटील यांनी मांडली 'लव्ह जिहाद' आणि 'लोकसंख्या नियंत्रणाची' आग्रही भूमिका

विधान परिषदेत धर्मांतर विरोधी विधेयकावर चर्चा मुंबई : विधान परिषदेत आज धर्मांतर विरोधी विधेयकावर अत्यंत

धर्मांतर हा श्रद्धेचा विषय, व्यवहाराचा नाही!"; विधान परिषदेत आमदार प्रवीण दरेकरांची ठाम भूमिका

मुंबई: "धर्म हा केवळ मानवी श्रद्धेचा भाग असून त्याचा व्यवहारासाठी किंवा स्वार्थासाठी वापर करणे चुकीचे आहे.

राज्यातील कालबाह्य ८० कायदे रद्द

विधेयक मंजूर; मुंबई फटक्यांची शिक्षा रद्द करण्याचा अधिनियम रद्द मुंबई : महाराष्ट्रातील कालबाह्य झालेले ८०