Special Stock Market Outlook: गेल्या आठवड्यात बाजारात सकारात्मकत आठवड्यात काय काय घडले? पुढील आठवड्यात काय निरिक्षण महत्वाचे जाणून घ्या एका क्लिकवर

मोहित सोमण: शेअर बाजारात सकारात्मकता कायम असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. सलग दुसऱ्यांदा शेअर बाजारात निर्देशांकात वाढ झाली असल्याचे आकडेवारीत स्पष्ट झाले. जागतिक अस्थिरता, शेवटच्या दोन दिवशी वाढलेली परदेशी गुंतवणूकदारांची विक्री, तिमाही निकालातील अस्थिरता असे अनेक घटक असूनही एकूणच पाहिल्यास तरीही निर्देशांकात सुधारणा कायम आहे. आकडेवारीनुसार, सेन्सेक्स आठवड्यात ०.५०% व निफ्टी ०.३९% वाढला आहे. प्रामुख्याने चांगल्या बँकिग, फायनांशियल सर्विसेस, आयटी, एफएमसीजी या शेअर्सच्या जोरावर निर्देशांकाने तेजी दर्शविली आहे. दरम्यान प्रायव्हेट बँक,ऑटो, मेटल, रिअल्टी, कंज्यूमर ड्युरेबल्स, केमिकल्स या शेअर्समध्ये झालेल्या घसरणीचा फटकाही बाजारात बसला. प्रामुख्याने या निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी आपली रोख गुंतवणूक सुरूवातीला काढून घेतली होती. आठवड्याच्या मध्यात पुन्हा गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक वाढवली दरम्यान घरगुती गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक आठवड्यातील अखेर वगळता कायम राखली आहे. अद्याप भारताबद्दल युएस टॅरिफ शुल्काबाबत अनिश्चितता, तसेच मध्यपूर्वेतील, रशिया युक्रेन संघर्ष व त्यातून कच्च्या तेलाचा वाद अशा आव्हानांचाही बाजारात सामना करावा लागला आहे. एकूणच पाहता बाजारात सकारात्मकता भावना कायम होत्या. विशेषतः सत्राच्या अखेरीस गुंतवणूकदारांनी आठवड्यात मोठा प्रतिसाद दिला.


तत्पूर्वी अमेरिकेतील महागाई, रोजगाराची आकडेवारी खराब आली असली तरी फेड व्याजदरात कपातीवरील अनिश्चितेमुळे व युएस शटडाऊनमुळे आकडेवारी पुढे ढकलली गेली. परंतु नुकत्याच जाहीर झालेल्या विना शेती (Non Farm) पेरोल रोजगार आकडेवारी जाहीर झाल्याने पुन्हा एकदा डिसेंबर व्याजदरकपातीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. तर सोन्याच्या चांदीच्या दरात मोठी अस्थिरता कायम राहिली. तर रशिया युक्रेन समेट घडवण्यासाठी युएस प्रयत्नशील असल्याने कच्च्या तेलाच्या किंमती नियंत्रित राहून किंबहुना मोठ्या प्रमाणात घसरल्या. भारतीय बाजारात रुपया मात्र डॉलरच्या मागणीमुळे सातत्याने घसरत आहे. आरबीआयच्या हस्तक्षेप भूमिकेनंतर त्यात आता सकारात्मक बदल होऊ शकतो परंतु परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक काढून घेतल्याने एकूण निर्देशांकात तयणख फटका बसला. परवा निफ्टीने २६२०० पातळी पार केली असली तरी पुन्हा एकदा ती २६१०० पातळीपेक्षा खाली आली होती. सेन्सेक्सनेही परवा ४४६.२१ अंकांने उसळत ८५६३२ आकडा पार केला होता. प्रोविजनल आकडेवारीनुसार, काल घरगुती गुंतवणूकदारांनी (Domestic Institutional Investors) १४९०८ कोटींची गुंतवणूक केली असून परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून १४५८५ कोटींची विक्री केली. त्यामुळे रोख विक्री घरगुती गुंतवणूकदारांकडून ३१६१ कोटींची झाली असून रोख विक्री परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून १७६६ कोटींची झाली आहे.


या आठवड्यातील एफआयआय गुंतवणूकीबाबत आम्हाला प्रतिक्रिया देताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक रणनितीकार डॉ वी के विजयाकुमार म्हणाले आहेत की,'नोव्हेंबरमध्ये काही दिवसांतच एफआयआयने मोठी विक्री कमी केली आणि खरेदीदारही झाले असले तरी एफआयआयच्या क्रियामध्ये कोणताही स्पष्ट ट्रेंड नाही. २२ नोव्हेंबरपर्यंत एकूण एफआयआय विक्रीचा आकडा १५२४३ कोटी रुपये होता.नोव्हेंबरमध्ये आतापर्यंत ११४५४ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह प्राथमिक बाजारपेठेतून एफआयआय खरेदी/गुंतवणूक करण्याचा दीर्घकालीन ट्रेंड सुरू आहे. २०२५ साठी आतापर्यंत एक्सचेंजेसद्वारे एकूण एफआयआय विक्रीचा आकडा २०९४४४ कोटी रुपये आहे. आणि प्राथमिक बाजारपेठेसाठी एकूण खरेदीचा आकडा ६५७४७ कोटी रुपये आहे. (सर्व डेटासाठी स्रोत: एनएसडीएल) इतर बाजारपेठांच्या तुलनेत भारताच्या कमी कामगिरीमुळे भारतातील विक्री व्यापार आणि इतर बाजारपेठांमध्ये खरेदी व्यापाराला गती मिळाली, विशेषतः अमेरिका, चीन, तैवान आणि दक्षिण कोरिया यासारख्या बाजारपेठांमध्ये, ज्यांना सध्या सुरू असलेल्या एआय व्यापाराचे लाभार्थी मानले जाते. तथापि, नॅस्डॅकमध्ये अलिकडच्या काळात झालेल्या तीव्र सुधारणा, विशेषतः एआय-संबंधित स्टॉकमध्ये, एआय स्टॉकमधील बबल चिंतेला बळकटी मिळाली आहे.


पुढे जाऊन, एफआयआय एआय ट्रेड कमी होत चालल्याने आणि भारतीय इक्विटीजच्या सुधारत्या शक्यतांमुळे विक्री कमी होण्याची शक्यता आहे. भारतातील कॉर्पोरेट कमाईला तिसऱ्या तिमाहीच्या निकालांच्या हंगामात गती मिळण्याची आणि २०२६ मध्ये वेग येण्याची शक्यता आहे. या घटकांच्या संयोजनामुळे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (FII) ची जावक (Outflow) उलटण्याची क्षमता आहे. निफ्टी लवकरच नवीन उच्चांक गाठेल आणि अमेरिका आणि भारत यांच्यातील व्यापार करारामुळे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार पुन्हा भारतीय बाजारात येऊ शकतात.'


भारतातील अर्थव्यवस्था तेजीत असल्याचे वेळोवेळी स्पष्ट झाले होते. उदाहरणार्थ अमेरिकेने ५०% कर लादला असला तरी आयएमएफच्या अहवालात भारताच्या आर्थिक वर्ष २६ च्या जीडीपी वाढीचा अंदाज ६.४% वरून ६.६% पर्यंत वाढवला होता. तसेच देशांतर्गत चलनवाढ ०.२५% च्या विक्रमी नीचांकी पातळीवर घसरली आहे हे देखील सकारात्मकतेचे लक्षण आहे.


मात्र त्या तुलनेत युएस एप्रिलच्या नीचांकी पातळीपेक्षा अमेरिकन बाजार २५-३०% पेक्षा जास्त चढताना आपण पाहिले आहे आणि भारताने विकसित बाजारपेठांपेक्षा कमी कामगिरी केली असली तरी मोठ्या प्रमाणात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार भारताकडे आकर्षित होत आहे. व्यापारी गरजा, मोठी संधी, उदयोन्मुख बाजारपेठ परवडणारे मूल्यांकन अशा अनेक कारणांमुळे भारताचे बाजारपेठ वाढत आहे. आकर्षक मूल्यांकन, मजबूत कमाई आणि एफआयआयच्या परताव्याने निर्देशांकातील मजबूत बदल दर्शवते यांचे उत्तम उदाहरण म्हणजे नुकत्याच झालेल्या एका अहवालातील माहितीनुसार भारतातील सेन्सेक्समध्ये आगामी काळात मोठ्या प्रमाणात वाढ होईल. 'इंडिया स्ट्रॅटेजी' या नव्या अहवालात मॉर्गन स्टॅनले जागतिक गुंतवणूक रिसर्च संस्थेने म्हटले आहे. सेन्सेक्स डिसेंबर २०२६ पर्यंत १०७००० पातळी पार करेल व बेस लाईन टार्गेट किमान ९५००० पातळी असेल असे अहवालात म्हटले गेले आहे. आर्थिक वर्ष २०२५-२८ या कालावधीत कंपाऊंड ग्रोथ (वाढ) इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) १९% वाढेल असेही अहवालात म्हटले गेले होते. निफ्टीतही मोठी वाढ अपेक्षित आहे.


सध्या युएस बाजारातील मोठी हालचाल आयटी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स शेअर्समध्ये सुरु आहे. मोठ्या प्रमाणात या तंत्रज्ञान शेअर्समध्ये वाढ झाल्याने युएस बाजारातील वाढ होत असली तरी अनिश्चिततेमुळे तितक्यात वेगाने घसरणही झाली आहे. गुंतवणूकदार आता या क्षेत्रातील अनिश्चितता आणि संभाव्य अतिमूल्यांकनामुळे पैसे गुंतवण्याबद्दल चिंतेत आहेत ज्यामुळे जागतिक बाजारपेठेत चिंतेचे वातावरण आहे तथापि मोतीलाल ओसवालने आपल्या अहवालात म्हटले होते की,'भारतीय बाजारपेठांसाठी, कोणत्याही एआयला चिंतेचे कारण म्हणून पाहू नये कारण जर आपण नोव्हेंबर महिन्यात आपल्या बाजाराच्या कामगिरीकडे पाहिले तर ते चांगले कामगिरी करत आहे परंतु वर्षभर आपण कमी कामगिरी करत आहोत कारण आपण एआय थीम चुकवली आहे तर इतर सर्व बाजारांनी चांगली कामगिरी केली आहे परंतु आता आपल्याला भीती आणि अतिमूल्यांकनाची चिन्हे दिसत असल्याने, ते आपल्यासाठी सकारात्मक असू शकते.'


तथापि, गुंतवणूकदार उत्साहित नाहीत कारण पोर्टफोलिओ तितके चांगले काम करत नाहीत. गेल्या काही दिवसांपासून निवडक ब्लू चिप स्टॉकमध्येच तेजी असली तरी एकूण हेवी वेट शेअरमध्ये हालचाल पास्ता व्यापक बाजारात स्मॉल आणि मिडकॅप स्टॉक चालू असलेल्या रॅलीमध्ये भागीदार नव्हते. परंतु तरीही तिमाही कमाई, जीएसटी कपातीमुळे मागणी आणि धोरण स्थिरतेतील आणखी परिवर्तन या पार्श्वभूमीवर मोतीलाल ओसवाल रिसर्च मते, गुंतवणूकदारांचा दृष्टीकोन सकारात्मक राहतो. जोपर्यंत निफ्टी २५७००/२५८०० पातळीपेक्षा जास्त राहतो, तोपर्यंत डिप्सवर खरेदी करण्याची रणनीती नाकारता येत नाही. यासह मी तुम्हाला आमचा साप्ताहिक पोर्टफोलिओ आढावा सादर करतो.


पुढील आठवड्यात बाजारात काय महत्वाचे?


कमाईचा हंगाम संपल्यानंतर खास ट्रिगर नसताता. असतात जे बाजाराच्या कामगिरीवर परिणाम करतात. सध्या विशेष ट्रिगर नसले तरी सुध्दा नवीन घडामोडींचा बाजारात परिणाम होईल विशेषतः सर्वाधिक परिणाम भूराजकीय कारणांमुळे होऊ शकतो. पीएमआयची किरकोळ घसरणीची आकडेवारी असली तरी अद्याप अनेक रिपोर्ट येणे व डिसेंबरची दरकपात, आरबीआयचे रेपो दर कपातीबाबत नवे भाष्य यावर अद्याप नवा कल स्पष्ट झालेला नाही. त्यामुळे आताच बाजाराचा मूड स्पष्ट करणे संयुक्तिक ठरणार नाही.


पहिल्या तिमाहीत भारताची अर्थव्यवस्था ७.८% ने वाढली ती पाच तिमाहींमधील ती सर्वात वेगवान ठरली होती. ती अपेक्षेपेक्षाही वाढली होती परंतु बाजार करेक्शनसह नवे ट्रिगर नसल्याने तिमाहीच्या दुसऱ्या तिमाहीत आता वाढ मंदावण्याची अपेक्षा आहे परंतु ती तज्ञांच्या अजूनही ७% पातळीच्यावर राहण्याची शक्यता आहे जी सकारात्मक ठरू शकते. एचएसबीसी कंपोझिट (एकत्र)उत्पादन,सेवा पीएमआय,परकीय चलन साठा, औद्योगिक उत्पादन, बँककर्ज वाढ आणि पायाभूत सुविधा उत्पादन यासारख्या इतर डेटा रिलीझवर बारकाईने बाजार लक्ष ठेवणार आहे.फेडचे अधिकृत भाषण, एस अँड पी ग्लोबल कंपोझिट/मॅन्युफॅक्चरिंग पीएमआय, रिटेल सेल्स, प्रोड्यूसर प्राइस इंडेक्स, हाऊसिंग प्राइस इंडेक्स, पर्सनल कंझम्प्शन एक्सपेंडिचर बेरोजगारीचे दावे या जागतिक आकडेवारीचे निकाल इत्यादी ट्रिगरही बाजारातील चाचपणीसाठी मूलभूत ठरतील.


नुकतेच वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी सकारात्मक घडामोडींचे संकेत दिले आहेत. संतुलित दृष्टिकोन सिद्ध झाल्यानंतर लवकरच चांगली बातमी येईल असे ते म्हणाले होते.मार्चपासून आतापर्यंत वाटाघाटीच्या सहा फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. अद्याप निकाल स्पष्ट झालेला नाही.मोठी अपडेट म्हणजे युक्रेनचे अध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांनी रशियासोबत शांतता योजनेवर काम करण्यास सहमती दर्शविल्याने ब्रेंट क्रूड ऑइलमध्ये आठवड्यात सर्वात मोठी घसरण झाली होती .


बाजारात कुठल्या निर्देशांकात लक्षपुर्वक पाहणे महत्त्वाचे!


इतर ट्रिगरसह आयटी, तेल व गॅस, एफएमसीजी, बँक व फायनांशियल सर्विसेस क्षेत्रीय शेअर्समध्ये लक्ष घालणे गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर ठरेल.

Comments
Add Comment

Dharashiv Accident : सोलापूर-हैदराबाद महामार्गावर क्रुझरचा भीषण अपघात; धाराशिवमध्ये ५ जणांचा जागीच मृत्यू

धाराशिव : सोलापूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर धाराशिव जिल्ह्यात आज शनिवारी (२२ नोव्हेंबर २०२५) सकाळी एक भीषण

Smruti Mandhana : स्मृती मंधानाच्या लग्नसराईला भारतीय महिला संघाची हजेरी! सोशल मीडीयावर मज्जा मस्तीचे व्हिडीओ व्हायरल

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मंधाना आणि पलाश यांच्या विवाहसोहळ्याची धामधूम सध्या जोरात

Nashik Ring Road : नाशिककरांना 'ट्रॅफिक जॅम' मधून मुक्ती! ६६ किमी लांबीचा रिंग रोड कसा असेल? ८,००० कोटींचा प्रोजेक्ट पूर्ण आराखडा!

नाशिक : नाशिक शहराचा जसजसा विकास झाला, तसतशी शहरात वाहतूककोंडीची समस्या देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गेल्या

India's Forex Reserves: भारताच्या परदेशी चलनसाठ्याचे मजबूत कमबॅक थेट ५.३२७ अब्ज डॉलरने 'इतक्या' वर वाढ

मुंबई: परदेशी चलन साठ्यात (Foreign Exchange Reserves) गेल्या आठवड्यातील घसरणीनंतर या आठवड्यात जोरदार वाढ झाली आहे. आरबीआयने

दिल्ली क्राईम ब्रँचची धडक कारवाई, आयएसआयशी संबंधित ४ आंतरराष्ट्रीय शस्त्र तस्करांना अटक

नवी दिल्ली: दिल्ली गुन्हे शाखेने पाकिस्तानी आयएसआयशी जोडलेल्या आंतरराष्ट्रीय शस्त्र तस्करीच्या टोळीतील चार

Dondaicha Nagar parishad Election : ७३ वर्षांचा इतिहास मोडला! दोंडाईचा नगर परिषद पहिल्यांदाच बिनविरोध; रावल यांनी कोणते 'गुप्त राजकारण' केले?

धुळे : राज्याचे पणन व राज शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल (Jaykumar Rawal) यांनी धुळे (Dhule News) जिल्ह्यातील राजकारणात एक नवा