स्मृती मानधना-पलाश मुच्छल लग्नाची 'ही' तारीख पंतप्रधानानीचं केली उघड

मुंबई : स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्या लग्नाबाबतची चर्चा अनेक दिवसापासून रंगत होती. मात्र आता त्यांच्या विवाहाची तारीख आणि ठिकाण दोन्ही स्पष्ट झाले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभेच्छा पत्रामुळे या दोघांनी गुपित ठेवलेली माहिती पुढे आली आहे. स्मृती आणि पलाशच्या रिलेशनशिपबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता होती. दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सुरू असल्या तरी त्यांनी कधीही यावर बोलणे टाळले. दरम्यान, एका पत्रकार परिषदेत पलाशला स्मृतीबद्दल प्रश्न विचारला असता त्याने सांगितले होते की स्मृती ही इंदूरचीच सून होणार आहे. यामुळे त्यांच्या नात्याला अप्रत्यक्षपणे पुष्टी मिळाली होती.


लग्न कुठे होणार, याबाबतही अनेक अंदाज बांधले जात होते. पण स्मृतीने महाराष्ट्रातच लग्न करण्याचा निर्णय घेतल्याने दोघांचा विवाह सांगलीत होणार असल्याची माहिती समोर आली. सुरुवातीला विवाहाची तारीख २० नोव्हेंबर अशी चर्चेत होती. त्यामुळे त्या दिवशी चाहते सोशल मीडियावर त्यांच्या फोटोची वाट पाहत होते.


मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्मृती आणि पलाश यांना शुभेच्छा देत एक पत्रक प्रसिद्ध केले. त्या पत्रकात लिहिलेल्या तपशीलानुसार त्यांचा विवाह २३ नोव्हेंबरला होणार आहे. दोघांनीही हा दिवस गुप्त ठेवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पंतप्रधानांच्या शुभेच्छांमुळे हे सिक्रेट अखेर उघड झाले. भारताच्या वर्ल्ड कप विजयावेळी पलाश मैदानात उपस्थित होता. विजयानंतर दोघांनी एकमेकांना भेटून कॅमेऱ्यासमोर सेलिब्रेशन केले होते. त्यानंतर त्यांच्या लग्नाच्या चर्चांना अधिकच जोर आला.

Comments
Add Comment

स्मार्ट सिटीच्या धर्तीवर अयोध्येचा विकास

लखनऊ / अयोध्या : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या दूरदर्शी नेतृत्वाचा परिणाम म्हणून अयोध्येचा स्मार्ट सिटी

विधेयक मंजुरीसाठी राष्ट्रपती, राज्यपालांवर वेळेचं बंधन नाही; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना राज्य किंवा केंद्र

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच जिल्हा परिषदांचा कार्यक्रम

आरक्षणासाठी निवडणूक आयोग पुन्हा लॉटरी काढण्याची शक्यता नवी दिल्ली : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या

CM Nitish Kumar Bihar : CM नितीश कुमारांकडे फक्त २१ हजारांची रोख रक्कम! पाटण्यात नावावर घर नाही, तरीही नितीश कुमार यांची एकूण संपत्ती किती?

पाटणा : बिहारच्या राजकारणाला गेल्या दोन दशकांपासून एकच चेहरा व्यापून राहिला आहे, तो म्हणजे नितीश कुमार यांचा. ते

कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचे मोठे विधान! राज्यातील राजकारणावर चर्चांना उधाण

कर्नाटक: एकीकडे बिहारमध्ये आज नितीशकुमार यांनी दहाव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तर दुसरीकडे

शिक्षकांच्या मानसिक छळाला कंटाळून सांगलीच्या विद्यार्थ्याची मेट्रो स्टेशनवर उडी मारून आत्महत्या

दिल्ली : सांगली जिल्ह्यातील दहावीचा विद्यार्थी शौर्य प्रदीप पाटीलने शिक्षकांच्या सातत्यपूर्ण मानसिक छळाला