Smriti Mandhana Palash Muchhal : 'ती' म्हणाली 'हो'! डीवाय पाटील स्टेडियमवर 'रोमान्सचा सिक्सर', पलाश मुच्छलनं स्मृतीला गुडघ्यावर बसून केलं प्रपोज; व्हिडिओ पहाच

मुंबई : क्रिकेटपटू स्मृती मंधाना (Smriti Mandhana) आणि संगीतकार तथा चित्रपट निर्माता पलाश मुच्छल (Palash Muchhal) लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. या बहुप्रतिक्षित लग्नाची तारीखही जाहीर झाली असून, २३ नोव्हेंबर रोजी हे दोघे विवाह करणार आहेत. दरम्यान, या जोडप्याने नुकताच आपला साखरपुडा उरकल्याची घोषणा केली. स्मृतीने इन्स्टाग्रामवर 'हटके' अनाउन्समेंट केल्यानंतर, आता पलाश मुच्छलने एक रोमांचक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामुळे चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या व्हिडीओमध्ये पलाश त्याची होणारी बायको स्मृती मंधानाला चक्क क्रिकेटच्या मैदानात गुडघ्यावर बसून प्रपोज (Proposal) करताना दिसत आहे. पलाशने मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमवर स्मृतीला हे खास सरप्राईज दिले. कॅमेऱ्यात कैद झालेल्या या क्षणामध्ये स्मृतीसोबतच पलाशही काहीसा इमोशनल झाल्याचं पाहायला मिळत आहे. या दोघांच्या केमिस्ट्रीवर त्यांचे चाहते सध्या प्रेमाचा वर्षाव करत आहेत. पलाशने शेअर केलेला हा रोमँटिक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हे दोघेही आता २३ नोव्हेंबर रोजी आयुष्याच्या एका नव्या इनिंगला सुरुवात करणार आहेत.



गुडघ्यावर बसून घातली अंगठी



अशातच, लग्नापूर्वी पलाशने स्मृतीला दिलेले रोमँटिक सरप्राईज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पलाश मुच्छलने आपल्या ऑफिशियल इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा भावनिक क्षण शेअर केला आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला पलाश आणि स्मृती डीवाय पाटील स्टेडियममध्ये एन्ट्री करताना दिसतात. विशेष म्हणजे, स्मृतीचे डोळे पट्टीने झाकलेले आहेत आणि पलाश तिला हात पकडून क्रिकेटच्या मैदानात घेऊन येतो. स्मृतीने डोळ्यावरची पट्टी काढताच तिला आश्चर्याचा मोठा धक्का बसतो. तेवढ्यात पलाशने वेळ न दवडता गुडघ्यावर बसून तिला प्रपोज केले. त्याने स्मृतीला लाल गुलाबांच्या फुलांचा गुच्छ दिला आणि अंगठी घालून आपल्या प्रेमाची कबुली दिली. हा क्षण इतका भावनिक होता की, स्मृती खूपच इमोशनल झाली, तर पलाशही काहीसा भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. स्मृतीने तात्काळ पलाशला मिठी मारून आपल्या भावना व्यक्त केल्या. हा व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस उतरला असून, त्यावर प्रेमाचा वर्षाव सुरू आहे. यानंतर २३ नोव्हेंबरला हे दोघे विवाहबंधनात अडकणार आहेत.



स्मृती मंधाना ज्याच्याशी लग्न करत आहे, तो पलाश मुच्छल कोण?


२२ मे १९९५ रोजी मध्य प्रदेशातील इंदूर येथे जन्मलेला पलाश मुच्छल हा एका मारवाडी कुटुंबात वाढला. या कुटुंबासाठी संगीत ही जवळजवळ मातृभाषाच आहे. त्याची मोठी बहीण पलक मुच्छल ही बॉलिवूडमधील एक लोकप्रिय पार्श्वगायिका आहे. बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवून पलाशने संगीत क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली. त्याने हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे प्रशिक्षण घेतले आहे. विशेष म्हणजे, पलाशने अशा वेळी संगीत रचना (Music Composition) करण्याचा प्रयोग सुरू केला, जेव्हा त्याच्या वयाची बहुतेक मुले त्यांच्या आवडी-निवडी शोधत होती. पलाशने खूप लहान वयातच फिल्ममेकर म्हणूनही नाव कमावले आहे. मुच्छल भावंडे त्यांच्या धर्मादाय कार्यासाठी देखील ओळखली जातात. हृदय शस्त्रक्रियेची गरज असलेल्या वंचित मुलांसाठी निधी उभारण्यात पलाश आणि पलक हे दोघेही मोठा वाटा उचलतात. हा तरुण आणि यशस्वी संगीतकार आता स्मृती मानधनासोबत विवाहबंधनात अडकणार आहे.

Comments
Add Comment

Mumbai Local Train Fire : ब्रेकिंग : विद्याविहार ते कुर्ल्या दरम्यान लोकलच्या डब्याने घेतला पेट; विद्याविहारहून CSMT कडे जाणारी 'स्लो' लोकल सेवा विस्कळीत

मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या मध्य रेल्वेवर आज ऐन गर्दीच्या वेळी एक थरारक घटना घडली. कुर्ला आणि

राज्यात १५ जानेवारीला सार्वजनिक सुट्टी, शाळा-सरकारी कार्यालये राहणार बंद

मुंबई  : राज्यात सध्या महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडाला आहे. १५ जानेवारी रोजी २९ महापालिकेसाठी

ईव्हीएम सुसज्ज करण्याच्या कामाची राज्य निवडणूक आयुक्तांकडून पाहणी

मुंबई : राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज विल्सन महाविद्यालयास भेट देऊन बृहन्मुंबई महानगरपालिका

पाणंद रस्ते समितीत सह अध्यक्षांसह परिषद सदस्य अन पाच प्रगतशील शेतकरी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय योजना प्रभावी करण्याचे चंद्रशेखर चंद्रशेखर बावनकुळे यांचे

धक्कादायक! बापाचं संतापजनक कृत्य, चोरीच्या संशयावरून पोटच्या मुलाला दिले....

मुंबई : मुंबईच्या गोरेगाव परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गोरेगाव येथे वडिलांनी आपल्याच मुलांना

Ambarnath News : अंबरनाथचे काँग्रेसचे १२ नगरसेवक भाजपच्या वाटेवर; मोठी खळबळ

अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे.