हिवाळी अधिवेशनाआधी केंद्र सरकारची सर्वपक्षीय बैठक

मुंबई : हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी संसदेचे कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले आहे. संसदीय कामकाज मंत्री किरेन रीजिजू हे संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी संसदेच्या दोन्ही सभागृहातील राजकीय पक्षांच्या सदस्यांची बैठक घेणार आहेत. मंत्री किरेन रिजिजू यांनी सर्व पक्षांच्या नेत्यांना पत्राद्वारे बैठकीसाठी आमंत्रण दिले असून ही बैठक सोमवारी, ही सर्वपक्षीय बैठक, २४ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता, नवी दिल्लीत संसद भवन ॲनेक्स या इमारतीच्या मुख्य समिती कक्षात होईल. संरक्षणमंत्री श्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार आहे.


संसदेचे हिवाळी अधिवेशन २५ नोव्हेंबर २०२४ रोजी सुरू होईल आणि सरकारी कामकाजाच्या अत्यावश्यक गरजांनुसार, अधिवेशन २० डिसेंबर २०२४ रोजी संपणार आहे. २६ डिसेंबर २०२४ रोजी असलेला संविधान दिन साजरा करण्याच्या निमित्ताने, लोकसभा आणि राज्यसभा या संसदेच्या दोन्ही सभागृहांची बैठक होणार नाही


तसंच केंद्र सरकार या अधिवेशनात सादर करण्यात येणाऱ्या विधेयकांची माहितीही विरोधकांना देणार आहे. याशिवाय हिवाळी अधिवेशन सुरळीत पार पडण्यासाठी विरोधी पक्षांकडून सहकार्याचं आवाहनही केंद्र सरकार करणार आहे.या बैठकीत आगामी अधिवेशनात चर्चेसाठी येणाऱ्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार असून दोन्ही सभागृहांचे कामकाज कोणत्याही अडथळ्याशिवाय पार पडावे यासाठी सरकार एकमत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. यावेळी संसदेत एक देश, एक निवडणूक यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे.


हिवाळी अधिवेशनात कायदेविषयक कामे वेळेत पूर्ण व्हावीत, चर्चा अधिक परिणामकारक व्हावी आणि विरोधकांसोबत समन्वय साधून सत्र व्यवस्थित चालावे, यासाठी ही सर्वपक्षीय बैठक महत्त्वाची ठरणार आहे.


Comments
Add Comment

इस्रोच्या ब्लूबर्ड ब्लॉक-2 चे यशस्वी प्रक्षेपण

श्रीहरिकोटा : भारतीय अवकाश संशोधन संस्थाने नुकतेच एका ऐतिहासिक मोहिमेचे प्रक्षेपण केले आहे. श्रीहरिकोटा येथील

दिल्लीतील प्रदूषणावर निर्णायक कारवाई

८०० कारखाने बंद करण्याचा दिल्ली सरकारचा निर्णय नवी दिल्ली : दिल्लीतील प्रदूषणावर निर्णायक कारवाई करण्याच्या

राजस्थानातील १५ गावांमध्ये महिलांना स्मार्टफोन वापरण्यास बंदी

पंचायतीच्या ‘तुघलकी’ फरमानावरून उलट-सुलट चर्चा जालोर : राजस्थानच्या जालोर जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि अजब

बडगाम NIA न्यायालयाचा मोठा निर्णय, अमेरिकेत राहणाऱ्या काश्मिरी लॉबिस्टची जमीन जप्त

बडगाम : जम्मू काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यातल्या एनआयए कोर्टाने मंगळवारी एक मोठा निर्णय दिला. अमेरिकेत राहणाऱ्या

पोलिसांसमोर २२ नक्षलवादी आले शरण

मलकानगिरी : मलकानगिरी जिल्ह्यात ओडिशा पोलिसांसमोर २२ नक्षलवादी शरण आले. आपल्या हातातील शस्त्र टाकून माओवादी

एनआयए प्रमुख सदानंद दाते होणार महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक

नवी दिल्ली : पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत अतिरेकी हल्ला केला होता. या