मोहित सोमण:जागतिक पातळीवरील रॅलीचा फायदा आजही भारतात कायम राहू शकतो. प्री ओपन सत्रात सेन्सेक्स ३०० अंकांने व निफ्टी ७३ अंकाने उसळला आहे. अनुकुल वातावरण प्री ओपन बाजारात दिसत आहे. प्रामुख्याने बाजारातील चढउताराचा 'सिलसिला' आज मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात वाढच अपेक्षित आहे. विशेषतः जागतिक बाजारपेठेत आर्टिफिशियल इंटेलिजन्स शेअर व त्यातील बुडबड्याबद्दल हवा निर्माण झाल्याने बाजारात आयटी शेअर सलग दोन दिवस घसरले असले तरी सलग दोन दिवसात पुन्हा एविडिया व इतर आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये झालेल्या मजबूत वाढीमुळे कालही युएस बाजारात रॅली झाली आहे. एनविडिया शेअर अतिरिक्त ५% उसळल्याने बाजारात आणखी वाढ झाली. तीच परिस्थिती भारतीय बाजारात राहिल का हे पाहणे महत्त्वाचे ठरेलच तत्पूर्वी फेड व रेपो दरात कपातीचे संकेत मिळत असल्याने बँक शेअरही तेजीत दिसत आहे. काही प्रमाणात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी आपली रोख विक्रीही कमी केल्याने निर्देशांकात स्थैर्य मिळत असले तरी आगामी आर्थिक आकडेवारी, निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकातील कंपन्यांची कामगिरी यांचा परिणाम बाजारात प्रभावी ठरू शकतो.
प्री ओपन सत्रात मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे बाजारातील सपोर्ट लेवल दिवसभरात कायम राहण्याची चिन्हे आहेत कारण आज सकाळी गिफ्ट निफ्टीतही समाधानकारक वाढ झाली होती.
प्री ओपन बाजारात डीसीएम श्रीराम (६.०४%), नेटवेब टेक्नॉलॉजी (४.९३%), एनबीसी (४.२९%), चोला इन्व्हेसमेंट अँड फायनान्स (३.५७%),जेपी पॉवर वेंचर (३.४०%), पीसीबीएल केमिकल्स (३.२८%), अदानी एनर्जी सोल्यूशन (२.८६%), सोनाटा सॉफ्टवेअर (२.६९%), क्लीन सायन्स (२.५१%), टाटा कम्युनिकेशन (२.३४%), झेंसार टेक्नॉलॉजी (२.३३%) समभागात वाढ झाली आहे.
प्री ओपन बाजारात आयनॉक्स इंडिया (३.३६%), अदानी एंटरप्राईजेस (३.२१%), क्रिष्णा इन्स्टिट्यूट (१.७७%), फिनोलेक्स इंडस्ट्रीज (१.२२%), ग्राफाईट इंडिया (१.१५%), रेनबो चाईल्ड (१.१३%), ब्लू स्टार (१.११%), सेंच्युरी फ्लायबोर्ड (१.०३%), भारती एअरटेल (१.०१%), आय आयएफएल फायनान्स (१%), त्रिवेणी इंजिनिअरिंग इंडस्ट्रीज (०.९५%) समभागात झाली आहे.