मुंबईतील कुर्ला परिसरात गॅस पाइपलाइन गळतीमुळे लागली आग

मुंबई : कुर्ला पश्चिमे येथील विनोबा भावे नगरमधील एलआयजी कॉलनीच्या मागे असलेल्या मुबारक इमारतीत दुपारी गॅस पाइपलाइनमधून गळती झाली. या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही.


महानगर गॅस लिमिटेडच्या (एमजीएल) गॅस पाइपलाइनमध्ये गळती होऊन, मुबारक इमारतीच्या तळमजल्यावर अचानक आग लागली. गॅसच्या गळतीमुळे आग लागल्याने परिसरात मोठा धूर पसरला, आणि नागरिकांमध्ये घबराट पसरली.


घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दलाच्या तातडीच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. आणि आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.


घटनास्थळी किमान चार अग्निशमन दलाच्या गाड्या आणि इतर बचाव यंत्रणा तैनात करण्यात आल्या होत्या. तसेच, महानगर गॅस लिमिटेडचे तज्ज्ञ देखील हजर होते.


गॅस पाइपलाइनमधील गळती त्वरित थांबवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना राबवण्यात आल्या.


गॅस पाइपलाइन गळतीमुळे आग लागण्याच्या घटना मुंबईसारख्या शहरी परिसरात घडत असतात. गॅस कंपन्या आणि अन्य संबंधित विभागांनी यापुढे अशा घटनांमध्ये जलद प्रतिसाद देण्यासाठी अधिक प्रभावी उपाययोजना तयार कराव्यात अशी भावना व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीतून पीडितांच्या न्यायाची हमी

मुंबई : ब्रिटिशकालीन फौजदारी कायद्यांमध्ये डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील पुरावे गृहीत धरण्याची तरतूद

मुंबईतील चारकोप परिसरात दिवसाढवळ्या गोळीबार, एक जण गंभीर जखमी

मुंबई : मुंबईतील चारकोप परिसरात आज दुपारी २ वाजता गोळीबार झाला. या गोळीबारात एक व्यक्ती जखमी झाला असून त्याला

केंद्र सरकारची स्वच्छता मोहीम, रेशन यादीतून काढली २.२५ कोटी अपात्र नावं!

मुंबई : केंद्र सरकारद्वारे समाजातील गरीब कुटुंबांना योग्य अन्न पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी रेशन योजना लागू

मुंबईतील १३ प्रभागांमध्ये समान आरक्षणाची हॅट्रीक, सलग तिसऱ्या निवडणुकीतही आरक्षण राहिले सारखेच

मुंबई (सचिन धानजी): मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५करता प्रभाग आरक्षण सोडत जाहीर झाली. या प्रभाग

महापालिकेचे वादग्रस्त कचरा खासगीकरणाचे कंत्राटाची निविदा अंतिम, कंपन्यांनी सुमारे ३२ ते ३४ टक्के अधिक दराने लावली बोली

मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्या सफाई खात्याच्यावतीने कचरा उचलण्यासाठी वाहनांसह मनुष्यबळ

अतिक्रमण तोडलेल्या गोरेगाव मुलुंड जोड रस्त्यांचा भाग अडथळामुक्त, या रस्त्यावरुन प्रवास करता येणार सुरळीत

मुंबई (खास प्रतिनिधी): उत्तर मुंबईमध्ये पश्चिम आणि पूर्व उपनगरांना जोडणारा गोरेगाव- मुलंड लिंक रोड विकसित