वरळी विधानसभेत प्रभाग आरक्षित झाल्याने मनसेची पंचाईत

भाजप, शिवसेनेच्या वाट्याला येणार प्रत्येकी तीन प्रभाग


यंदा वरळीत भाजप कमळ फुलवणार?


सचिन धानजी मुंबई : दक्षिण लोकसभा मतदारसंघातील वरळी विधानसभेमध्ये उबाठाचे माजी मंत्री आदित्य ठाकरे हे आमदार असले तरी यंदा या विधानसभेत भाजपचे कमळ फुलवण्याचा निर्धार पक्षाने केला आहे. या विधानसभेत भाजपच्या वाट्याला तीन आणि शिवसेनेच्या वाट्याला तीन प्रभाग येण्याची शक्यता आहे. तर उबाठाच्या चार नगरसेवक असले तरी या विधानसभेत मनसेने तीन प्रभागांमध्ये दावेदारी केली आहे. यंदा ठाकरेंची युती झाली असली तरी प्रभाग महिला आरक्षित झाल्याने मनसेच्या इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. त्यामुळे निवडणूक रिंगणात कुणाला उतरवायचा आणि किती प्रभागांमध्ये तडजोड करायची असा प्रश्न असून शेवटच्या क्षणाला मनसे दोन प्रभागांमध्ये समाधान मानण्याची शक्यता आहे.


वरळी विधानसभेमध्ये उबाठाचे चार नगरसेवक आणि शिवसेनेच्या दोन नगरसेवकांचा समावेश आहे. उबाठाच्या चार नगरसेवकांमध्ये दोन माजी महापौर, एक माजी उपमहापौर आणि माजी बेस्ट समिती अध्यक्षांचा समावेश आहे. तर संतोष खरात आणि दत्ता नरवणकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे शिवसेनेचे दोन माजी नगरसेवक आहेत. या वरळी विधानसभेत भाजपाचा एकही नगरसेवक नसून मागील निवडणुकीत भाजपा तीन पराभूत उमेदवार दुसऱ्या स्थानावर होते. त्यामुळे यंदा शिवसेनेला तीन आणि भाजपला तीन जागा सोडल्या जाण्याची शक्यता असून यावेळी कोणत्याही परिस्थितीत भाजपचा नगरसेवक निवडून आणण्याचा निर्धार पक्षाने केला आहे.


लोकसभा निवडणुकीत वरळी विधानसभेतील मतदान




  1. उबाठा शिवसेना उमेदवार अरविंद सावंत यांचे मतदान : ६४ हजार८४४

  2. शिवसेना उमेदवार यामिनी जाधव यांचे मतदान : ५८ हजार१२९


वरळी विधानसभा २०२४ मधील मतदान




  1. आदित्य ठाकरे उबाठा शिवसेना : ६३,३२४

  2. मिलिंद देवरा, शिवसेना : ५४, ५२३

  3. संदीप देशपांडे, मनसे : १९,३६७


प्रभाग निहाय कशी आहे स्थिती


 प्रभाग १९३
हा पुन्हा एकदा ओबीसी झाला असून सलग तिसऱ्यांदा ओबीसी झाला आहे. या प्रवर्गातून पुन्हा एकदा माजी उपमहापौर हेमांगी वरळीकर यांचा दावा फिक्स झाला आहे. हा प्रभाग यापूर्वी कायमच अनुसूचित जातीकरता आरक्षित राहत होता; परंतु पुन्हा ओबीसी झाल्याने उबाठा विरोधात शिवसेना असे चित्र या प्रभागात दिसण्याची शक्यता आहे. या प्रभागात भाजपकडे उमेदवार नसल्याने हा प्रभाग शिवसेनेच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे आणि याठिकाणी शिवसेनेच्या उपविभाग अध्यक्षा निकिता घडशी यांचे नाव चर्चेत आहे.


 प्रभाग क्रमांक १९५
हा प्रभाग मागील वर्षी अनुसूचित जातीकरता आरक्षित असला तरी यंदा हा प्रभाग पुन्हा ओबीसी राखीव झाला आहे. त्या आधी हा प्रभाग खुला प्रभाग होता. या प्रभाग शिवसेनेकडे राखला जाणार असून हा प्रभाग उबाठाकडे जाण्याची शक्यता आहे. या प्रभागात शिवसेनेकडून दत्ता नरवणकर, भाजपकडून विजय बांदिवडेकर आणि उबाठाकडून विजय भणगे यांची नावे चर्चेत आहेत.


 प्रभाग क्रमांक १९६
हा प्रभाग यंदा महिला आरक्षित झाला असून विद्यमान नगरसेवक आशीष चेंबूरकर यांना आता घरी बसावे लागणार आहे. या प्रभागात मुख्य दावेदारी उबाठा शिवसेना असून हा प्रभाग भाजपच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे. उबाठाच्यावतीने आकर्षिता अभिजित पाटील यांचे नाव चर्चेत आहे. तर भाजपच्यावतीने इच्छुक उमेदवाराचे नाव चर्चेत नाही.


 प्रभाग क्रमांक १९७
हा प्रभाग महिला आरक्षित असून मनसेच्या तिकिटावर निवडून आलेले पण पुढे उबाठा शिवसेनेकडे गेलेल्या दत्ता नरवणकर हे नगरसेवक होते. पण नरवणकर हे सध्या शिवसेनेत आहेत. त्यामुळे या प्रभागात शिवसेनेचा दावा आहे. या प्रभागातून शिवसेनेकडून वनिता नरवणकर,अनिता नायर, मनसेच्यावतीने रचना विकास साळवी, उबाठाच्यावतीने श्रावणी छोटू देसाई आणि भाजपच्यावतीने विमल पवार यांची नावे चर्चेत आहे. हा प्रभाग उबाठा ऐवजी मनसेला सुटला जाण्याची शक्यता आहे.


 प्रभाग क्रमांक १९८
हा प्रभाग ओबीसी महिला करता राखीव झाला आहे. या प्रभागात माजी महापौर स्नेहल आंबेकर या नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या; परंतु या प्रभागात मनसेचे प्राबल्य असल्याने उबाठाऐवजी हा प्रभाग मनसेला सुटण्याची शक्यता आहे. या प्रभाग मनसेच्यावतीने अस्मिता येडगे, उबाठाच्यावतीने आबोली गोपाळ खाड्ये, भाग्यश्री संदीप वरखडे आदींची नार्वे चर्चेत आहे. हा प्रभाग शिवसेनेच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे.


 प्रभाग क्रमांक १९९
हा प्रभाग महिला आरक्षित झाला असून हा प्रभाग आधी ओबीसी महिला आणि त्यानंतर सलग दुसऱ्यांदा महिला आरक्षित झाला आहे. हा प्रभाग उबाठा शिवसेना आणि भाजपाला सोडला जाण्याची शक्यता आहे. उबाठाकडून विद्यमान नगरसेविका आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह अबोली खाड्ये, समृद्धी कोयंडे, मनसेच्यावतीने संगीता दळवी आणि शिवसेनेच्यावतीने वंदना गवळी आणि भाजपकडून आरती पुगांवकर यांच्या नावाची चर्चा आहे.

Comments
Add Comment

महापालिकेच्या मालमत्ता विभागांमध्ये वर्षांनुवर्षे अधिकारी एकाच जागेवर, विकासकांची साठेलोटे असल्याचा बीआयटी चाळीतील भाडेकरुंचा आरोप

मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्या मालमत्ता विभागात मागील १६ वर्षांपासून अधिकारी कार्यरत असून यातील

दादर पश्चिमेची वाहतूक कोंडी सुटणार

जे. के. सावंत मार्ग जोडणारा येलवे रस्ता सेनापती बापट मार्गाला जोडणार मुंबई : एलफिन्स्टन पूल बंद करण्यात आल्याने

मुंबईत आधीपासूनच ८ ठिकाणी भटक्या श्वानांचे निर्बिजीकरण, लसीकरण

मुलुंडमध्ये विरोध झाल्याने महापालिका अधिकारी झाले अवाक् मुंबई : महानगरपालिकेच्या सहकार्याने मुंबईत एकूण ८

भरती परीक्षेच्या निकालानंतर चार दिवसांत नियुक्तीपत्र

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रशासनाला निर्देश मुंबई (प्रतिनिधी) : शासकीय सेवांमध्ये विविध पदांच्या

राज्यात अनेक जिल्ह्यांना आज थंडीचा इशारा

मुंबई : राज्यात सर्वदूर तापमानाचा पारा कमालीचा घसरला आहे. गेले अनेक दिवस थंडीचा कडाका कायम असून मंगळवारी (दि. १८

लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेस ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ

मुंबई - मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील महिलांची ई-केवायसी प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर सुरू असताना, अलिकडे