मोहित सोमण: सनटिव्ही टीव्ही नेटवर्कने आज आपला तिमाही निकाल जाहीर केला आहे. कंपनीला इयर ऑन इयर बेसिसवर कामकाजातून मिळणाऱ्या महसूलात (Revenue from Operations) गेल्या वर्षीच्या तिमाहीतील १२५६.७९ कोटींच्या तुलनेत या तिमाहीत ११६७.९९ कोटी वाढ झाली आहे. तर कंपनीच्या निव्वळ करोत्तर नफ्यात (Net Profit after tax PAT) इयर ऑन इयर बेसिसवर ३९८.१७ कोटींच्या तुलनेत या तिमाहीत मात्र ३२९.७९ कोटीवर घसरण झाली आहे. म्हणजेच ही घसरण १७.७% होती.
याखेरीज कंपनीच्या निकालातील माहितीनुसार, कंपनीच्या निव्वळ विक्रीत इयर ऑन इयर बेसिसवर २९.८६% वाढ झाली असून गेल्या वर्षीच्या तिमाहीतील ९००.१६ कोटींच्या तुलनेत या तिमाहीत ११६८.९९ कोटींवर वाढ नोंदवली. कंपनीच्या ईबीटा (EBITDA) गेल्या वर्षीच्या तुलनेत ६९२.९६ कोटी तुलनेत २७.१८% वाढत या तिमाहीत ८८१.३१ कोटींवर वाढला आहे.
कंपनीच्या ईपीएस (Earning per share EPS) मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर गेल्या वर्षीच्या तिमाहीतील १०.३९ रूपयावरून या तिमाहीत ९ रुपयांवर घसरण झाली आहे. कंपनीच्या एकूण उत्पन्नात (Total Comprehensive Income) इयर ऑन इयर बेसिसवर गेल्या वर्षीच्या तिमाहीतील ३९८.२० कोटी तुलनेत या तिमाहीत ३२९.७८ कोटीवर घसरण झाली.